मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३

मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


जय देव जय देव जय भैरवनाथा ।
सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ध्रु.॥
भैरवनाथा, गौरव दे मज भजनाचें ।
रौरव संकट नाशी जननानिधनाचें ॥
निशिदिनिं देवा, दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरव पदनखचंद्रीं करि मन मन साचें ॥१॥

भवभयभंजन सज्जनरंजन गुरुदेवा ।
पदरजअंजन लेतां प्रकटे निजठेवा ॥
जेव्हां दर्शन देसी, भाग्योदय तेव्हां ।
अनंत पुण्यें साधे, लाधे तव सेवा ॥२॥

कलिमलशमना, दानवदमना, दे पाणी ।
डमरूरव अमरांतें निर्भय सुखदानी ॥
काशीरक्षक तक्षकमालाधर, चरणीं-।
तोडर मिरवी अरिगण-मस्तकिं मनकर्णीं ॥३॥

लक्ष्मी करुणाचक्षीं अनुचर निजपक्षीं ।
भक्षी दुष्टां नष्टां, सुष्टां संरक्षी ॥
साक्षी कर्माकर्मीं जगदंतरकुक्षीं ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥४॥

सोनारीपुरधामीं भैरव कुलस्वामी ।
स्मरतां सत्वर पावसि संकटहर नामीं ॥
इच्छित देसी दासां जो जो जें कामी ।
मुक्तेश्वरीं हेतु निश्चल कुलधर्मी ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP