TransLiteral Foundation

श्री वेंकटेश्वर - पदे २११ ते २२३

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


पदे २११ ते २२३
२११
श्रीलसद्‍ विलासलोलशेषतल्पसायकम्‍
शैलकन्यकास्यचंद्रचंद्रिकाचकोरकम्‍  ।
फालनेत्रवह्रिदग्धपंचबाणरूपकम्‍
कालहस्तिनायकं सुखप्रदायकं भजे ॥१॥

२१२
गंगाधराय गरुडध्वजसंनुताय
मांगल्यदाय महितोरगभूषणाय ।
संगीतलोलहदयाय सदाशिवाय
श्रीकालहस्तिनिलयाय नम: शिवाय ॥१॥

२१३
पतीतपावन नाम ऐकुनी आलो मी दारा ।
पतीतपावन न होसि म्हणुनी जातो माघारा ॥

२१४
सुवर्णमुखि, संसेवे सुवर्णाभं पयस्तव ।
सुवर्णशोभिवदनं कुरु मामंब निर्मलम्‍ ॥

२१५
शैवा: श्रीवेंकटेश! त्वयि परमशिवं भावयन्तो भजन्ते ।

२१६
विदेहमधुरे सर्वसाक्षी । चित्‍ शक्ती स्वयंभ मीनाक्षी ।
मीनमार्गेंचि सुलक्षी । वंदिली ते आदिअंबा ॥
चित्तचोरटा अभिनव । पाहिला तो अळगिरीचा देव ।
पुण्यदायक अनुभव । निर्मळ प्रवाह सेविला ॥
विज्ञानजंबुवृक्षमूळीं । आपोलिंग चित्कल्लोळजळीं ।
चित्प्रकाशाच्या राउळीं । पहिलें जंबुलिंग ते ॥...
स्वबोधशेषाचळनिवासी । प्रत्यक्ष भूवैकुंठ तेजोराशी ।
सुवर्णदेवालयीं चिद्‍ विलासी । पाहिला आत्मा वेंकटेश ॥
ज्ञाप्तिसुखसत्तापवन । आलें काळहस्तीचें दर्शन ।
भाव गोपीचंदनीं प्रगटोन । असे तो कृष्ण उडपेचा ॥

२१७
चित्रशिलानगराधीश्वरो निरंतरदृढभक्तिपूतपदव्यावर्तितो-
पानकूर्चाचरितनिर्माल्यविसर्जनगंडूषजलभिषेको किंचित्‍
भक्षितशेषमांसोपचारसमर्पणाद्यल्पोपचारसंकल्पसंतोषित-
सांबाशिवभक्ताग्रगण्यवनेचरवंशसंभूतो भूपालमणि :
पंपेशरथावलोकनकौतुकेन समागतो वर्तते ।

२१८
काळहस्तीश, तुझें महत्त्व
काय मी वर्णू? ( पल्लवी )
काळसंहार तुज दिल्हें तें
एकाचें अक्षय होतें याकरितां ( अनुपल्लवी )
सतत उष्ण पाणी
सदाशिव, तुझे मस्तकीं घातल्यास
वितत शिरसीं त्यांचें
विमल गंगेस ठेविलें त्यास ॥१॥
सरस भक्तीने तुज नेत्र
समर्पिल्यास हरा!
परम दया केली त्यास
पंधरा डोळे दिधले याकरितां ॥२॥
हरिणमांस नैवेद्य
आदरें समर्पिल्यास
करीहरण दिल्हें त्याग
काळहस्तीश, याकरिता ॥३॥

२१९
क्षेत्र जगिं आहे पवन ।
वास करी श्रीकालहस्तीश्वर जेथे रिझून ॥ध्रु.॥
सेतूहुनि वीस योजन ।
उत्तरभागीं द्बिशत योजने ते काशीहून ॥
दक्षिण दिशेस जाण ।
सुवर्णमुखरी वाहे उत्तरवाहिनी होऊन ॥
त्या नदीचे पूर्वतीरीं । आहे लिंगाकार गिरी ।
तोचि प्रत्यक्ष शूलधारी । उमारमण ॥१॥

२२०
माघ व वैशाख मासीं ।
प्रदक्षिणा जे करिती मुक्ती लाभे तयांशी ॥
कलियुगीं गौखर्णेशी ।
तारी तेथे कालहस्तीश्वर तो भक्तांशी ॥
त्याशि कोळी सर्प हत्ती । पावले पूजुनि मुक्ती ।
मणउनि श्रीकालहस्ती । मणवि सगुण ॥२॥

२२१
‘कोणी येक कण्ण मण्णार ।
तेथे होता ईश्वरभक्त येक बेडर ।
खेळुनी नित्य शिकार । धनुर्बाणासहित येउनि लिंगासमोर ॥
श्रीकलहस्तीशा पुजून । करूनि मांसनिवेदन ।
जात होता अनुदित । नियमाने ॥३॥

२२२
कोणी येक दिवशीं शंभूने ।
भक्ती पहाया खचितेसे केले विमान ।
ऋषींनी केले पलायन ।
तैं लिंगावरि व्याधें केले शरीर वित्तानें ॥
तैं देवीं स्वर्गाहुनी । पुष्पवृष्टी केली रिझुनी ॥
झाला बेडर धन्य भुवनीं । शिवार्चनें ॥४॥

२२३
सरोग पाहुनी शिवनयन ।
आपला डोळा उघडूनि त्याला दिधला व्याधाने ॥
दुज्या शिवनयनीं चरण ।
ठेवुनि, दुसरा डोळा व्याधें देतां भक्तीने ॥
धरूनि त्याचा हस्त शिवाने ।
त्याला दिधले मुक्तिस्थान ।
त्याचे सशस्त्र केले दर्शन । शरब्जीने ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-03-14T00:14:21.8670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खंडपलीरोई

  • स्त्री. उप्तन्नाची एक बाब . ' परगणें मजकूर येथील आईना व सायेर व खंडपलीरोई या बाबेपैकीं निमे .' - समारो १ . २२१ . 
RANDOM WORD

Did you know?

पुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात ? पूजेत वापरू नयेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.