श्री वेंकटेश्वर - पदे ९१ ते १००

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


९१
भज सुरेश, व्यंकटेश, श्रीश, शेषतल्पका ।
नाश करी त्रिविध ताप, सुखवि स्वनत भाविका ॥ध्रु.॥
व्यंकटेशवास गिरीं, जाय तेथ नमन करी ।
गाय गाय नाम नरा, त्वरित हरिल पातकां ॥१॥
सेव सुरवरादिसुरा, हेतु स्वजनपूर्णकां ।
साक्षता कलींत नाथ प्रणत-मोक्षदायका ॥२॥

९२
पहा पहा बहुकाळ यातना । भोग भोगुनि विटलो मना ।
सांप्रत दृढ धरिले चरणां । प्रात:काळीं या हेतू ॥५॥

९३
जय देव जय देव शेषाचलवासी ।
आरती ओवाळु तुमचे चरणांसी ॥

९४
मम मानस सुखकर्ता, हर्ता दुष्टांचा ।
सुलभ भक्तालागी, शास्ता नष्टांचा ॥
भयमोचक स्वामी, पालक विश्वाचा ।
पांडवपालक, इंद्रियचालक, बाळक नंदाचा ॥

९५
पंचफणा शिखरीं देव श्रीहरी ।
सन्मुख हनुमंत उभा असे द्वारीं ॥
गरुड सेवा करी चरणीं निरंतरीं ।
कोटितीर्थ जाण त्रिमलगिरीवरी ॥१॥
जय देव जय देव जय व्यंकटरमणा ।
आरती ओवाळू, तुजविण उद्धर ना ॥ध्रु.॥

९६
जय विजय दोन्ही द्वारपाल द्बारीं ।
देव एक म्हणूनी दाखवितो परी ( ? ) ॥
चतुर्भुज मंगलमूर्ती दिसती साजिरी ।
वैकुंठीचा राजा सखा श्रीहरी ॥२॥

९७
देखिली मंगलमूर्ती, बरवा उत्साह ।
प्रसन्न झाला तिमया देवाधिदेव ॥
विप्र कोटि चरणीं मागतसे ठाव ।
तयाला प्रसन्न त्रिमलगिरिराव ॥३॥

९८
अपांपतिसुतापते गिरिनिवासिया ईश्वरा ।
अगा भुवनसुंदरा अघहरा कृपासागरा ॥
तुझ्याविण रिता नसे मुळिच ठाव या भूवरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥१॥
अलास जगतीतलावरि पतीत तारावया ।
असे असुन ये स्थलीं तुज न ये दिनाची दया ॥
सदैव धरिसी कसे धनहिनास देवा दुरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥२॥

९९
जगत्त्र तुझे शिशू असुनि माय त्या तू खरी ।
तुझ्याविण कृपा वदे, करिल कोण बाळावरी ? ॥
त्यजून शिशुला कधी जननि ती न राहे दुरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥३॥
धनाढय अवघे अधी करुनिया जगा ठेवणे ।
अल्यास मग वंदण्या धन सुखें तया मागणे ॥
दिसेल तरि ही कृती तव जगास देवा, बरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥४॥

१००
उदारपण आपुले गिरिवरी तुवां सोडिले ।
सराफपण, जे नसे उचित, ते वृथा घेतले ॥
ब्रिदास अपुल्या नको कमिपणा अणूं यापरी ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥५॥
पदांवरि तुझ्या तुझी मुळि न मालकी राहिली ।
असे असुन ती अम्हां गिरिस पारखी जाहली ॥
कधी परत घेति का सुजन ते दिलेले तरी ? ।
नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP