गृहप्रवेश - गृहप्रवेश करण्यापूर्वी

नवीन घर घेतल्यावर वास्तुशांत करावयाचे नसल्यास गृहप्रवेश विधी करून राहायला जाता येते.


गृहप्रवेश करण्यापूर्वी

यजमानाने स्वच्छ धूतवस्त्र परिधान करावीत. शिरोभूषण असावे. कपाळी कुंकुम तिलक लावला. स्वतः गणपतीची, कुलदेवतेची तस्बीर घ्यावी. यजमान पत्‍नीने नवीन वस्‍त्र नेसून, अलंकृत होऊन मंगलकलश हाती घ्यावा. (मंगलकलश म्हणजे - चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या, त्यात पाणी, गंध, अक्षता, फूल, दूर्वा, तुळस, बेल, पैसे सुपारी, कलशाच्या मुखावर आंब्याचा टहाळा ठेवावा त्यावर नारळ ठेवावा. कलशाला बाहेरच्या बाजूला कुंकवाच्या पाच उभ्या रेषा काढाव्यात.) आपल्या समवेत असणार्‍यांपैकी एकाने घंटा, झांजा घ्याव्यात. एकाने नवी केरसुणी घ्यावी, बरोबर पूजासाहित्य घ्यावे नंतर नव्या वास्तूत/ब्लॉक मध्ये प्रवेश करावा.

गृहप्रवेश ( गणपति, नवग्रह, वरुण पूजन )
(आवश्यक साहित्य )

हळद कुंकू, रांगोळी, गुलाल, उदबत्ती, नीरांजन,  ( तूप, वाती )
समई ( तेल, वाती ) काडयापेटी. घंटा, झांज / टाळ

१) तांदूळ १॥ किलो, पाट ४, पाटावर शाल १, हात पुसण्यासाठी रुमाल १, तांबे २, ताम्हने ३, वाटया ६, फुलपात्रे ३               पळ्या / चमचे २, गणपती व कुलदेवतेचे फोटो, पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर ).

२) कापूर १ डबी, सुपार्‍या २५, खोबर्‍याची वाटी १, गूळ, नारळ १०, जानवी ५, खारीक ६, बदाम ६, अत्तर, विडयाची पाने २५, फळे ५ प्रकारची, केळी, नवी केरसुणी.

३) विविध फुले, तुळशी, बेल, दूर्वा, हार ४, गजरे ४, आंब्याचे टहाळे ३, सुटे पैसे रु.१० ( १ रु., ५०, २५ पैशांची नाणी ), वस्त्र, कापड २॥ मीटर. कुलदेवतेची ओटी, सुवासिनीची ओटी, गुरुजींची दक्षिणा

प्रवेश केल्यावर -

पूजकाचे मुख पूर्वेकडे होईल अशी सोईस्कर जागा, नव्या केरसुणीने स्वच्छ करावी. गोमूत्र शिंपडावे. पाट मांडून रांगोळी घालावी, त्यावर किंचित्‌ गुलाल टाकावा. पाटावर तांदूळ ठेवून त्यावर आपण आणलेला मंगल कलश ठेवावा.

वरीलप्रमाणे सर्व तयारी झाल्यावर पूजेला आरंभ करावा.


Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP