वास्तुशांती - प्रायश्चित्त होम

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu doshas.


प्रायश्चित्त होम ( आज्याहुति )

ॐ अनाज्ञातंयदाज्ञातंयज्ञस्यक्रियतेमिथु ।अग्नेतदस्यकल्पयत्व हिवेत्थयथातया स्वाहा । अग्नय इदं न गम ।

ॐ पुरुषसंमितो यज्ञोयज्ञः पुरुषसंमितः । अग्नेतदस्यकल्पयत्व हिवेत्ययथातथ स्वाहा । अग्नय इदं न मम ।

ॐ यत्पाकत्रामनसादीनदक्षानयज्ञस्यमन्वतेमर्तासः । अग्निष्टद्धोताक्रतुविद्विजानन् यजिष्ठोदेवा ऋतुशो यजातिस्वाहा । अग्नय इदं न मम ।

ॐ त्वंनोअग्नेवरुणस्यविद्वानदेवस्यहेडो वयासिसीष्ठाः । यजिष्ठोवह्नितमः शोशुचानोविश्वाद्वेषा सिप्रमुमुग्ध्यस्मत् स्वाहा । अग्नीवरुणाम्यामिदं न मम ।

ॐ सत्वंनोअग्नेवमोभवोती नेदिष्ठोअस्याउषसोव्युष्टौ । अवयक्ष्वनोवरुण रराणोवीहिमृडीक सुहवोनएधिस्वाहा । अग्नीवरुणाभ्यामिदं न मम ।

ॐ यत इंद्र भयामहेततोनो अभयं कृधि । मघवन्छग्धितवतन्न उतयेविदिवषोविमृधोजहिस्वाहा । इंद्रायेदं न मम ।

ॐ स्वस्तिदाविशस्पतिर्वृत्रहाविमृधोवशी । वृषेन्द्रः पुरएतुनः स्वस्तिदा अभयंकरः स्वाहा । अभयंकरायेदं न मम ।

ॐ त्र्यंबकंयजामहे सुगंधिंपुष्टि वर्धनं । उर्वारुकमिवबंधनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात्स्वाहा । त्र्यंबकायेदं न मम ।

ॐ इदं विष्णुर्विचक्रमेत्रेधानिदधेपदं । समूढमस्यपा सुरेस्वाहा । विष्णव इदं न मम ।

ॐ भूः स्वाहा । अग्नय इदं न मम ।
ॐ भुवः स्वाहा । वायव इदं न मम ।
ॐ सुवः स्वाहा । सूर्याय इदं न मम ।
ॐ महः स्वाहा । बृहस्पतय इदं न मम ।
ॐ जनः स्वाहा । वरुणायेदं न मम ।
ॐ तपः स्वाहा । इंद्रायेदं न मम ।
ॐ सत्य स्वाहा । विश्वेभ्यो देवेभ्य इदं न मम ।

विविध प्रायश्चित्त होम - ( आज्याहुति )

आचार्यांनी आज्याहुति द्याव्यात ( उदक सोडावे )

अस्मिन् कर्मणि मक्षिका, केश, कीटक, पतंग, पिपीलिकादि, उपघातदोष परिहारार्थंव्दे मिंदाहुती होष्यामि ।

ॐ यन्म आत्मनोमिंदाभूदग्निस्तत्पुनराहार्जातवेदा विचर्षणिस्वाहा । मिंदवतेग्नय इदं न मम ।

ॐ पुनरग्निश्चक्षुरदात्पुनरिंद्रोबृहस्पतिः । पुनर्मेअश्विनायुवंचक्षुराधत्तमक्ष्योः स्वाहा ॥

मिंदवतेग्नयासदं न मम । ( उदक सोडावे )

अस्मिन्कर्मणिस्वराक्षरपदवर्णभ्रेषन्यूनातिरिक्तदोष परिहारार्धं आभिर्गार्भि रित्याज्याहुतिं होष्यामि ।

ॐ आभिर्गार्भियदतोन उनमाप्यायय हरिवो वर्धमानः । यदास्तोतृभ्योमहिगोत्रारुजासिभूयिष्ठभाजोअधतेस्यामस्वाहा । इंद्राय हरिवत इदं न मम ( उदक सोडावे )

अस्मिन् कर्मणि स्वाहाकार, अवदानप्रमाणात् न्यूनातिरिक्त दोष परिहारार्थं " अतिरिक्त " मित्येकां आज्याहुति होष्यामि ।

ॐ अतिरिक्तंन्यूनेजुहोमिन्यूनम्तिरिक्तेजुहोमि । सम समेजुहोमिस्वाहा कृताहुतिरेतुदेवान् स्वाहा । देवेभ्य इदं न मम । ( उदक सोडावे )

यानंतर बलिदान करावे. स्थंडिला भोवती ८ दिशांना केळीच्या पानाचे लहान लहान तुकडे ठेऊन त्यावर इंद्रादि अष्ट दिकपाल (८) भूमि ( पश्चिमेकडे ) व आकाश ( पूर्व दिशेकडे ) अशी भाताची एकूण १० मुटकुळी ठेऊन, त्यावर गुलाला टाकावा व त्या त्या दिशांच्या देवतांना उद्देशून मंत्रोच्चार पूर्वक बलिदान करावे.

ग्रहपीठाजवळ शक्त्यनुसार अधिप्रत्यधि देवतांसह प्रत्येक ग्रहासाठी बली व दीप तसेच वास्तु पीठाजवळ शिरव्यादि देवतांना उद्देशून एकाद्रोणात पायस बलि ( भातावर दूध व साखर घालून ) द्यावा. वास्तु व चरवर्‍यादि देवतांना वरील प्रमाणे भाताची मुटकुळी ठेवून त्यावर गुलाल व उडीद वाहून दिवा ( कापूर ) लावून मंत्रपूर्वक बलिप्रदान करावे.

अष्ट दिक्पाल्स देवता, भूमि, आकाश, नवग्रहमंत्र म्हणावे अधिप्रत्यधिदेवता सहित असा उच्चार करावा.

क्रतुसंराक्षक देवतांना नाम मंत्राने बलिदान करावे. शिख्यादि देवताभ्योनमः असे म्हणून बलिदान करावे. वास्तुदेवतेसाठी मंत्रपूर्वक व चरक्यादिदेवताभ्यो नमः असे म्हणून बलिदान करावे. आचार्य किंवा यजमान यांनी संकल्पपूर्वक बलिदान करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP