वास्तुशांती - अंगहोम

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu doshas.


अंगहोम - ( आज्याहुति )

ॐ इमंमेवरुणश्रुधीहवमद्याच मृडय । त्वामवस्युराचकेस्वाहा । वरुणायेदंनमम ॥

ॐ तत्वायामिव्रह्मणावंदमानस्तदाशास्तेयजमानोहविर्भिः । अहेडमानोवरुणेहबोध्युरुश समान आयुः प्रमोषीः स्वाहा । वरुणायेदं न मम ॥

ॐ त्वंनोअग्नेवरुणस्यविद्वान्देवस्यहेडोवयासिसीष्ठाः । यजिष्ठो वह्नितमः शोशुचानो विश्वाद्वेषा सिप्रमुमुग्ध्यस्मत्स्वाहा । अग्नीवरुणाभ्यामिंद न मम ॥

ॐ सत्वंनोअग्नेवमोभवोतीनेदिष्ठोअस्याउषसोव्युष्टौ । अवयक्ष्वनोवरुण रराणोवीहिमृडीक सुहवोन एधिस्वाहा । अग्नीवरुणाभ्यमिदंन न मम ।

ॐ त्वमग्नेअयास्ययासन्मनसाहितः । अयासन्हव्यमूहिषेयानोधेहिभेषज स्वाहा । अयसेग्नय इदं न मम ॥

ॐ प्रजापतेनत्वदेतान्यन्योविश्वाजातानिपरिता बभूव । यत्कामास्तेजुहुमस्तन्नोअस्तुव स्यामपतयो रयीणा स्वाहा । प्रजापतय इदं न मम ॥

स्विष्टकृद्धोमः ( हवनासाठी घेतलेले तूप १ पळीभर अन्य चरु = भात, व असल्यास अन्य हवनीयद्रव्याची आहुती द्यावी. )

ॐ यदस्यकर्मणोत्यरी रिचंयदवान्यूनमिहाकरं । अग्निष्टत्स्विष्टकृत् विद्वानत्सर्वं स्विष्ट सुहुतंकरोतुमे । अग्नयेस्विष्टकृते सुहुतहुते, सर्वहुत आहुतीनां, कामाना समर्धयित्रे, स्वाहा । अग्नयेस्विष्टकृत इदंन मम ।

शुल्ब प्रहरणं ( शुल्ब = इध्म्याला बांधलेली दर्भाची दोरी. ) तिची शेवटची गाठ सोडून, दोरी प्रोक्षणीपात्रात धुऊन ( ओली करुन ) अग्नीला अर्पण करावी. व हात धुवावे.

ॐ रुद्राय पशुपतयेस्वाहा । रुद्रायपशुपतय इदंनमम । उदकस्पर्शः ।

स्थंडिलासभोवती दक्षिण, पश्चिम, व उत्तर, दिशांना परिधि ठेवले आहेत. त्यांना मध्यभागी । दर्वीने थोडे थोडे तूप लावावे.

परिध्यंजनं - मध्यमं, दक्षिणं उत्तरंच ।

स्थंडिलाभोवती ईशान्य दिशेकडून आरंभ करुन स्थंडिलाभोवती प्रदक्षिण क्रमाने पाणी फिरवावे.

ॐ यथाहतदवसवो गौर्यंचितपदिषिताममुंचतायजत्राः । एवात्वमस्मत् प्रमुंचाव्य हः प्रातार्यग्नेप्रतरान्न आयुः ।

आज्यस्थालीच्या खालीअसलेल्या दर्भापैकी २/३ दर्भव स्थंडिलाच्या भोवती चारही दिशांना ठेवलेल्या ४/४ दर्भांपैकी एक, एक दर्भ घेऊन ते नीट जुळवून त्यांचा अग्रभाग डाव्या हाताने व मुळाजवळचा भाग उजव्या हाताने ( बोटांनी ) धरावा. नंतर त्या दर्भांच्या अग्र भाग १) दर्वीत बुडवावा. मध्य व मूल भाग ( बुंध ) आज्यस्थालीत बुडवावा. नंतर २) अग्रे दर्वीत बुडवावीत. पुनः मध्यव मूल आज्यस्थालीत बुडवावीत. त्यानंतर ३) मूल व मध्यभाग आज्य स्थालीत बुडवून, अग्रे दर्वीत बुडवावीत. एक दर्भ डाव्या हातात ठेऊन उरलेले ३ दर्भ अग्नीला अर्पण करावेत.

बर्हिभ्यः परिस्तरणेभ्यश्च,
कानिचित् तृणान्यादाय, दर्व्यामग्राण्यनक्ति, ।

१) अग्राणि दर्व्याम् मध्यानि मूलानि आज्यस्थाल्यां
२) अग्राणिदर्व्यां, मध्यानिमूलनिचाज्यस्थाल्यां ।
३) मूलानिमध्यानिचाज्यस्थाल्यां अग्राणि दर्व्यां ।

एकं तृण मवशिष्य सर्वं प्रह्वत्य,

डाव्या हातातील एक दर्भ उजव्या हाताने अग्नीला अर्पण करावा. व म्हणावे.

सर्पेभ्यः स्वाहा । सर्पेभ्य इदं न मम । एतत्, एतत् एतत् ।

नंतर आचार्यांनी स्वतःच्या नाकाला, डोळयांना व नंतर अंगठा व तर्जनी यांचा जमिनीला स्पर्श करुन हात धुवावा.

घ्राणं, चक्षुः पृथिवीं चालभ्य अप उपस्पृश्य । परिधीन् प्रहरति

परिधि अग्नीला अर्पण करावेत.

पश्चिमेकडील परिधिप्रथम अर्पण करावा.

परिधीन् प्रहरति मध्यमं मध्ये करोति ।

दक्षिण उत्तर दिशेकडीलपरिधि उजव्या व डाव्या हाताने एकाच वेळी अर्पण करावेत.

सहेतरौ प्रहरति ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP