श्री उमाहेमावती व्रत - आरती

उमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.


आरती क्र.१

जय देवी जय देवी उमाहेमावती माते ।
तुझ्या कृपाप्रसादे विजयश्री येते ॥जयदेवी जयदेवी॥
प्रति शुक्रवारी तुझे व्रत जे करती ।
धन यश जय किर्ती सुख त्यांना लाभती ॥जयदेवी०
इंद्रादिसुरगण गाती तुज आरती ।
शास्त्रेवेदपुराणे म्हणती तूं विश्वअधिष्‍ठात्री ॥जयदेवी०
तुझी अनंत रुपे आणि अवतार ।
ललितारुप घेऊन तूं मारलास भंडासूर ॥जयदेवी०
तुझे कामेश्वरी रुप देई आनंद अमाप ।
पराशक्ति ब्रह्मशक्तिचे तुझे अमृत रुप ॥जयदेवी०
देवांसमोर प्रगटलीस उमाहेमावती बनूनी ।
तूं ब्रह्माणि-विश्वजननी तुझी सत्ता त्रिभुवनी ॥जयदेवी०
रुप तुझे लक्ष्मीचे तूं भक्तवत्सल भगवती ।
भक्तांना करते विजयी श्रृतीस्मृती गौरवती ॥जयदेवी०
'अलंकार भारती' भक्तिभावे ठेवितो तव चरणीं माथा ।
श्रद्धाप्रेमाने गाऊनि तुझीच अमृतगाथा ॥जयदेवी०

आरती क्र.२
जयदेवी जयदेवी जय श्री उमाहेमावती माते ।
विश्वाधारे भक्तवत्सले आदिशक्ति भगवते ॥
जयदेवी जयदेवी ॥
तुझे व्रत केले, प्रेमे दृढ भक्तिभावे ।
स्विकारुनि सेवा निशदिन सुखात ठेवावे ॥
प्रसन्न होऊनि सदये सदैव रक्षावे ।
संतति, संपत्ति, शांति, किर्ती, यश द्यावे ॥१॥
जयदेवी जयदेवी ॥
तुझ्या प्रसादे मनोरथ सकल सफल होती ।
तुझा अगाध महिमा नारद ऋषिमुनि गाती ॥
संकटसमयीं धांवशी तूं सूर्यचंद्र सांगती ।
पंचारति ओवाळी तुजला 'अलंकार ॥जयदेवी जयदेवी॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP