मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
पुनर्विवाह

तृतीयपरिच्छेद - पुनर्विवाह

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां पुनर्विवाह सांगतो -

अथपुनर्विवाहः श्रीधरीये पुनर्विवाहंवक्ष्यामिदंपत्योः शुभवृद्धिदम् ‍ लग्नेंदुलग्नयोर्दोषेग्रहतारादिसंभवे अन्येष्वशुभकालेषुदुष्टयोगादिसंभवे विवाहेचापिदंपत्योराशौचादिसमुद्भवे तस्यदोषस्यशांत्यर्थंपुनर्वैवाह्यमिष्यते याज्ञवल्क्यः सुरापीव्याधिताधूर्तावंध्यार्थघ्न्यप्रियंवदा स्त्रीप्रसूश्चाधिवेत्तव्यापुरुषद्वेषिणी तथा मनुः वंध्याष्टमेधिवेत्तव्यादशमेतुमृतप्रजा एकादशेस्त्रीजननीसद्यस्त्वप्रियवादिनी संग्रहेतु अप्रजांदशमेवर्षेस्त्रीप्रजाद्वादशेत्यजेत् ‍ मृतप्रजांपंचदशेसद्यस्त्वप्रियवादिनीम् ‍ याज्ञवल्क्यः एकामुत्क्रम्यकामार्थमन्यांलब्धुंयइच्छति समर्थस्तोषयित्वार्थैः पूर्वोढामपरांव्रजेत् ‍ आज्ञासंपादिनींदक्षांवीरसूंप्रियवादिनीम् ‍ त्यजन्दाप्यस्तृतीयांशमद्रव्योभरणंस्त्रियाः मनुः अधिविन्नातुयानारीनिर्गच्छेद्रोषितागृहात् ‍ सासद्यः सन्निरोद्धव्यात्याज्यावाकुलसन्निधाविति हेमाद्रौकात्यायनः अग्निशिष्टादिशुश्रुषांबहुभार्यः सवर्णया कारयेत्तद्बहुत्वंचेज्ज्येष्ठयागर्हितानचेदिति याज्ञवल्क्यः सत्यामन्यांसवर्णायांधर्मकार्यंनकारयेत् ‍ सवर्णासुविधौधर्म्येज्येष्ठ्यानविनेतरा ॥

श्रीधरीयांत - " दंपतीला शुभवृद्धि करणारा असा पुनर्विवाह सांगतो - दुष्टलग्नावर ; राशीस दुष्टचंद्रावर ; ग्रह , तारा इत्यादिकांचें आनुकूल्य नसतां ; इतरही दुष्ट योगादिकांनीं अशुभ असलेल्या कालीं ; विवाह झाला असेल आणि सूतकादिकांत कूष्मांड होमादिविधीवांचून विवाह झाला असेल तर त्या दोषाच्या शांतीसाठीं त्याच वधूवरांचा सुमुहूर्तावर पुनः विवाह करावा . " याज्ञवल्क्य - " सुरापान करणारी , व्याधिष्ठ , धूर्त , वांझोटी , द्रव्यनाश करणारी , अप्रियभाषण करणारी , कन्या प्रसवणारी , आणि पुरुषाचा द्वेष करणारी , अशी स्त्री असेल तर दुसरी स्त्री करावी . " मनु - " वांझोटी स्त्री असेल तर आठव्या वर्षीं दुसरी स्त्री करावी . मुलें मरणारी असेल तर नऊ वर्षै वाट पाहून दहाव्या वर्षी दुसरी स्त्री करावी . कन्या प्रसवणारी असेल तर अकराव्या वर्षीं दुसरी स्त्री करावी . अप्रिय भाषण करणारी असेल तर तत्काल दुसरी स्त्री करावी . " संग्रहांत तर - " वांझोटी स्त्रियेला दहाव्या वर्षीं सोडावी . कन्या प्रसवणारीला बाराव्या वर्षीं सोडावी . मुलें मरणारीला पंधराव्या वर्षीं सोडावी . आणि अप्रियभाषण करणारीला सद्यः सोडावें . " याज्ञवल्क्य - " जो पुरुष एका स्त्रीला टाकून कामासाठीं दुसरी स्त्री मिळविण्याविषयीं इच्छितो तो पुरुष समर्थ असल्यास द्रव्यादिकांच्या योगानें पहिल्या स्त्रियेला संतुष्ट करुन दुसर्‍या स्त्रियेप्रत जावें . पतीची आज्ञा संपादन करणारी , कार्यांविषयीं दक्ष , वीरपुरुष प्रसवणारी , प्रियभाषण करणारी अशा स्त्रियेचा त्याग करील तर राजानें त्याजकडून त्याच्या द्र्व्यांतून तिसरा हिस्सा त्या स्त्रियेला देववावा . द्रव्यरहित असेल तर त्या स्त्रियेचें पोषण करवावें . " मनु - " ज्या स्त्रियेवर दुसरी स्त्री केल्यामुळें ती पहिली स्त्री रुष्ट होऊन जर घरांतून बाहेर पडेल तर तिला तत्काळ घरांत कोंडून ठेवावी . अथवा बापाच्या घरीं तिला पोंचवावी . " कात्यायन - " ज्या पुरुषास अनेक जातींच्या बहुत स्त्रिया असतील त्यानें अग्नि , शिष्ट इत्यादिकांची शुश्रुषा सजातीच्या स्त्रियेकडून करवावी . सजातीच्या स्त्रिया बहुत असतील तर ज्येष्ठ स्त्री निंद्य नसल्यास तिजकडून करवावी . " याज्ञवल्क्य - सजातीची स्त्री असतां धर्मकार इतर जातीच्या स्त्रियेकडून करवूं नये . सजातीच्या स्त्रिया बहुत असतील तर धर्मकार्याविषयीं ज्येष्ठ स्त्रियेवांचून इतर स्त्रियेची योजना करुं नये . "

द्वितीयविवाहहोमेग्निमाह कात्यायनः सदारोऽन्यान्पुनर्दारानुद्वोढुंकारणांतरात् ‍ यदीच्छेदग्निमान्कर्तुंक्कहोमोस्यविधीयते स्वेग्नावेवभवेद्धोमोलौकिकेनकदाचन त्रिकांडमंडनोपि आद्यायांविद्यमानायांद्वितीयामुद्वहेद्यदि तदावैवाहिकंकर्मकुर्यादावसथेग्निमान् ‍ सुदर्शनभाष्येतु द्वितीयविवाहहोमोलौकिकएवनपूर्वापासनेइत्युक्तम् ‍ इदंचासंभवे तत्रचाग्निद्वयसंसर्गः कार्यस्तदाहशौनकः अथाग्न्योर्गृह्ययोर्योगंसपत्नीभेदजातयोः सहाधिकारसिद्ध्यर्थमहंवक्ष्यामिशौनकः अरोगामुद्वहेत्कन्यांधर्मलोपभयात्स्वयं कृतेतत्रविवाहेचव्रतांतेतुपरेहनि पृथक् ‍ स्थंडिलयोरग्निंसमाधाययथाविधि तंत्रंकृत्वाज्यभागांतमन्वाधानादिकंततः जुहुयात्पूर्वपत्न्यग्नौतयान्वारब्ध आहुतीः अग्निमीळेपुरोहितंसूक्तेननवर्चेनतु समिध्यैनंसमारोप्य अयंतेयोनिरित्यृचाप्रत्यवरोहेत्यनयाकनिष्ठाग्नौनिधायतम् ‍ आज्यभागांततंत्रादिकृत्वारभ्यतदादितः समन्वारब्धएताभ्यांपत्नीभ्यांजुहुयाद्धृतम् ‍ चतुर्गृहीतमेताभिऋग्भिः षडभिर्यथाक्रमम् ‍ अग्नावग्निश्चरतीत्यग्निनाग्निः समिध्यते अस्तीदमितितिसृभिः पाहिनोअग्नएकया ततः स्विष्टकृदारभ्यहोमशेषंसमापयेत् ‍ गोयुगंदक्षिणादेयाश्रोत्रियायाहिताग्नये पत्न्योरेकायदिमृतादग्ध्वातेनैवतांपुनः आदधीतान्ययासार्धमाधानविधिनागृहीति ॥

दुसर्‍या विवाहाच्या होमाविषयीं अग्नि सांगतो कात्यायन - " सपत्नीक व अग्नि धारणकरणारा पुरुष असून कोणत्याहीकारणानें जर दुसरा विवाह करण्याविषयीं इच्छील तर त्या दुसर्‍या विवाहाचा होम कोठें होईल ? त्याच्या पूर्वींच्या अग्नीवरच दुसर्‍या विवाहाचा होम होईल . लौकिकाग्नीवर कधींही होणार नाहीं . " त्रिकांडमंडनही - " पहिली स्त्री विद्यमान असतां जर दुसरी स्त्री करील तर अग्निमान् ‍ पुरुषानें त्या दुसर्‍या विवाहाचें कर्म पहिल्या औपासनाग्नीवर करावें . " सुदर्शनभाष्यांत तर - दुसर्‍या विवाहाचा होम लौकिकाग्नीवरच होतो , पूर्वीच्या औपासनावर होत नाहीं , असें सांगितलें आहे . हें सांगणें पूर्वीच्या औपासनाग्नीवर असंभव असतां समजावें . लौकिकाग्नीवर दुसर्‍या विवाहाचा होम केला असतां तो उत्पन्न झालेला अग्नि गृह्याग्नि असल्यामुळें पहिला गृह्याग्नि व दुसरा गृह्याग्नि यांचा संसर्ग करावा . तें सांगतो शौनक - " आतां दोनीं पत्नींला सहाधिकाराची सिद्धि होण्याकरितां दोन पत्नींच्या दोन गृह्याग्नींचा एकत्र योग मी शौनक सांगतों . विवाह केला नाहीं तर धर्माचा लोप होईल या भीतीनें रोगरहित अशा कन्येशीं विवाह करावा . तें विवाहकृत्य समाप्त झाल्यावर दुसर्‍यादिवशीं वेगवेगळीं दोन स्थंडिलें घालून दक्षिणेकडच्या स्थंडिलावर ज्येष्ठ पत्नीचा गृह्याग्नि आणि उत्तरेकडच्या स्थंडिलावर कनिष्ठपत्नीचा गृह्याग्नि यथाविधि प्रतिष्ठित करुन पहिल्या अग्नीवर ज्येष्ठपत्नीनें अन्वारब्ध होऊन अन्वाधानादिक आज्यभागांत तंत्र करुन त्याच अग्नीवर त्या ज्येष्ठ पत्नीनें अन्वारब्ध होऊन ‘ अग्निमिळे० ’ ह्या नऊ ऋचांनीं आज्यहोम करावा . नंतर होमशेष समाप्त करावा . नंतर ‘ अयंतेयोनि० ’ ह्या मंत्रानें त्या ज्येष्ठाग्नीचा समिधेवर समारोप करुन ‘ प्रत्यवरोह० ’ या मंत्रानें कनिष्ठाग्नीवर ती समिधा द्यावी . म्हणजे पहिल्या अग्नीचा प्रत्यवरोह करावा . नंतर अग्निध्यान करुन दोन पत्नींनीं अन्वारब्ध होऊन अन्वाधानादिक आज्यभागांत तंत्र करुन दोन पत्नींनेवें अन्वारब्ध होऊन पुढें सांगितलेल्या सहा ऋचांनीं अनुक्रमानें प्रत्येक ऋचेस स्रुचेवर चार वेळ आज्य घेऊन होम करावा . त्या ऋचा ( मंत्र ) येणेंप्रमाणें - ‘ अग्नावग्निश्चरति० ’ ही एक ऋचा , ‘ अग्निनाग्निः समिध्यते० ’ ही एक ऋचा ‘ अस्तीदमधि० ’ ह्या तीन ऋचा , ‘ पाहिनो अग्न० ’ ही एक ऋचा मिळून ह्या ६ ऋचा समजाव्या . नंतर स्विष्टकृदादिक होमशेष समाप्त करावा . नंतर अग्निहोत्री ब्राह्मणाला दोन गाई द्याव्या , आणि ब्राह्मणभोजन करावें . जर दोन पत्नींतून कोणतीही एक पत्नी मरेल तर त्याच अग्नीनें तिचें दहन करुन त्या गृहस्थानें दुसर्‍या स्त्रियेसह आधानविधीनें अग्न्याधान करावें . "

बौधायनसूत्रेतु अथयदिगृहस्थोद्वेभार्येविंदेतकथंतत्रकुर्यादितियस्मिन्कालेविंदेतोभावग्नीपरिचरेदपराग्निमुपसमाधायपरिस्तीर्याज्यंविलाप्यस्रुचिचतुर्गृहीतंगृहीत्वाऽन्वारब्धायांजुहोतिनमस्तऋषेरादाव्यधायैत्वास्वधायैत्वामानइंद्राभिमतस्त्वदृष्ट्वारिष्टांसएवब्रह्मन्नवेदसुस्वाहेत्यथाऽयंतेयोनिऋत्वियइतिसमिधिसमारोपयेत् ‍ पूर्वाग्निमुपसमाधायाजुह्वान उद्बुध्यस्वाग्नइतिसमिधमाधायपरिस्तीर्यस्रुचिचतुर्गृहीत्वाद्वयोर्भार्ययोरन्वारब्र्धयोर्यजमानोभिमृशतियोब्रह्माब्रह्मणइत्येतेनसूक्तेनैकंचतुर्गृहीतंजुहोत्याग्निमुखात् ‍ कृत्वापक्काज्जुहोतिसंमितंसंकल्पेथामिति पुरोनुवाक्यामनूच्याग्नेपुरीष्येइतियाज्ययाजुहोत्यथाज्याहुतीरुपजुहोतिपुरीष्यमस्तमित्यंतादनुवाकस्यस्विष्टकृत्प्रभृतिसिद्धमाधेनुवरदानादथाग्रेणाग्निंदर्भस्तंबेहुतशेषंनिदधातिब्रह्मजज्ञानंपिताविराजामितिद्वाभ्यामितिसंसर्गविधिः कार्यः ॥

बौधायनसूत्रांत तर - " आतां जर गृहस्थाश्रमी दोन भार्या करील तर त्यानें कोणत्या गृह्याग्नीची उपासना करावी ? ज्या कालीं दोन भार्या करील त्या कालापासून पुढें दोन अग्नींची उपासना करावी . ती अशी - दुसर्‍या अग्नीची स्थंडिलावर स्थापना करुन परिस्तरणादि तंत्र करुन आज्य पातळ करुन स्रुचेवर चारवेळ घेऊन कनिष्ठ पत्नीनें अन्वारब्ध होऊन ‘ नमस्त ऋषेरादाव्यधायैत्वा० स्वाहा ’ ह्या मंत्रानें होम करावा , नंतर ‘ अयंते योनिऋत्विय० ’ ह्या मंत्रानें त्या कनिष्ठाग्नीचा समिधेवर समारोप करावा . नंतर दुसर्‍या स्थंडिलावर पहिल्या अग्नीची स्थापना करुन ‘ आजुह्वान उद्बुध्यस्वाग्ने० ’ ह्या मंत्रानें त्याजवर ती समिध देऊन परिस्तरणादि तंत्र करुन स्रुचेवर चार वेळ आज्य घेऊन दोन भार्यांनीं अन्वारब्ध होऊन यजमानानें स्पर्श करावा . आणि ‘ यो ब्रह्मा ब्रह्मण०ज ’ ह्या सूक्तानें चतुर्गृहीत आज्याचें एक अवदान द्यावें . नंतर अग्निमुखापर्यंत तंत्र करुन चरुचा होम करावा . ‘ संमितं संकल्पेथां० ’ ह्या पुरोनुवाक्येचा अनुवाद करुन ‘ अग्ने पुरीष्ये० ’ ह्या याज्येनें होम करावा . नंतर ‘ पुरीष्यमस्तं० ’ हा अनुवाक समाप्त होईपर्यंत जे मंत्र असतील त्यांनीं आज्याहुतींचा होम करावा . नंतर स्विष्टकृदादि गोप्रदानापर्यंतचें तंत्र करुन नंतर अग्नीच्या अग्रभागीं ‘ ब्रह्मजज्ञानं० ’ ‘ पिताविराजां० ’ ह्या दोन मंत्रांनीं हुतशेष असेल तें दर्भस्तंबावर ठेवावें . " याप्रमाणें दोन अग्नींचा संसर्गविधि करावा .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP