मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
अभिवादन व प्रत्यभिवादन

तृतीयपरिच्छेद - अभिवादन व प्रत्यभिवादन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अभिवादन व प्रत्यभिवादन सांगतो .

मनुः भोः शब्दंकीर्तयेदंतेस्वस्यनाम्नोभिवादने आयुष्मान् ‍ भवसौम्येतिवाच्योविप्रोभिवादने अकारश्चास्यनाम्नोंतेवाच्यः पूर्वाक्षरः प्लुतः शर्मन्नितिनकारात्पूर्व इत्यर्थः अभिवादनप्रत्यभिवादनादौविशेषः स्मृत्यर्थसारे पारिजातादौज्ञेयः यमः ज्यायानपिकनीयांसंसंध्यायामभिवादयेत् ‍ विनाशिष्यंचपुत्रंचदौहित्रंदुहितुः पतिं ।

मनु - " अभिवादन ( प्रणाम ) करतेसमयीं आपल्या नामाच्या अंतीं ‘ भोः ’ असा शब्द उच्चारावा . कारण , भोः शब्द हा नामाचें स्वरुप होय , असें ऋषींनीं सांगितलें आहे . म्हणजे - ‘ रामशर्माऽहंभोः अभिवादये ’ असें शिष्यानें अभिवादन केल्यावर गुरुनें प्रत्यभिवादन ( आशीर्वाद ) देण्याचे समयीं ‘ आयुष्मान् ‍ भव राम शर्म३न् ‍ ’ असा ब्राह्मणास आशीर्वाद द्यावा . नामाच्या अंतींचा व नकाराचे पूर्वीचा जो अकारादि स्वर तो प्लुत ( त्रिमात्रात्मक ) उच्चारावा . " म्हणजे ‘ आयुष्मान्भव राम शर्म३न् ‍ ’ असा प्रयोग होतो . अभिवादन व प्रत्यभिवादन इत्यादिकांचा विशेष प्रकार स्मृत्यर्थसार , पारिजात इत्यादि ग्रंथांत पाहावा . यम - " ज्येष्ठानेंही संध्यासमयीं कनिष्ठाला ( पितृव्यादिकांना ) अभिवादन करावें ; परंतु शिष्य , पुत्र , दौहित्र , जामाता यांना मात्र अभिवादन करुं नये . "

यानंतर पुनरुपनयन सांगतो .

अथपुनरुपनयनं पारिजाते शातातपः लशुनंगृंजनंजग्ध्वापलांडुंचतथाशुनः उष्ट्रमानुषकेभाश्वरासभीक्षीरभोजनात् ‍ उपायनंपुनः कुर्यात्तप्तकृच्छ्रंचरेन्मुहुरिति हेमाद्रौवृद्धमनुः जीवन्यदिसमागच्छेद्धृतकुंभेनिमज्जयच उद्धृत्यस्नापयित्वास्यजातकर्मादिकारयेत् ‍ तत्रैवपाद्मे प्रेतशय्याप्रतिग्राहीपुनः संस्कारमर्हति चंद्रिकायांबौधायनः सिंधुसौवीरसौराष्ट्रंस्तथाप्रत्यंतवासिनः अंगवंगकलिंगांध्रान् ‍ गत्वासंस्कारमर्हति हेमाद्रौप्रायश्चित्तकांडे वृद्धगौतमः खरमुष्ट्रंचमहिषमनड्वाहमजंतथा बस्तमारुह्यमुखजः क्रोशेचांद्रंविनिर्दिशेत् ‍ मार्कंडेयः खरमारुह्यविप्रस्तुयोजनंयदिगच्छति तप्तकृच्छ्रत्रयंप्रोक्तंशरीरस्यविशोधनं पुनर्जन्मप्रकुर्वीतघृतगर्भविधानतः मदनरत्नेमिताक्षरायांचस्नानमात्रमुक्तं मनुः अज्ञानात्प्राश्यविण्मूत्रंसुरासंसृष्टमेवच पुनः संस्कारमर्हंतित्रयोवर्णाद्विजातयः मिताक्षरायांपराशरः यः प्रत्यवसितोविप्रः प्रव्रज्यातोविनिर्गतः अनाशकनिवृत्तश्चगार्हस्थ्यंचेच्चिकीर्षति सचरेत्र्त्रीणिकृच्छ्राणित्रीणिचांद्रायणानिच जातकर्मादिभिः सर्वैः संस्कृतः शुद्धिमाप्नुयात् ‍ ।

पारिजातांत शातातप - " लसूण , गाजर , पलांडु , हीं भक्षण केलीं असतां ; आणि शुनी , उंट , मनुष्य स्त्री , हस्तिनी , घोडी , गाढवी यांचें दूध प्राशन केलें असतां तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त व पुनः उपनयन करावें . " हेमाद्रींत वृद्धमनु - " देशांतरीं गेलेला ‘ मृत झाला ’ अशी वार्ता ऐकून त्याची और्ध्वदेहिक क्रिया केली असतां तो जर पुनः जीवंत आला तर त्याला घृताच्या कुंभांत बुडवून नंतर बाहेर काढून स्नान घालून त्याचे जातकर्मापासून मौंजीपर्यंत संस्कार करावे . " तेथेंच पद्मपुराणांत - " मृतशय्येचें दान घेणारा पुनः संस्काराला पात्र होतो . " चंद्रिकेंत बौधायन " - ( तीर्थयात्रा इत्यादि कारणावांचून ) सिंधु , सौवीर , सौराष्ट्र , प्रत्यंतवासी ( म्लेच्छदेश ), अंग , वंग , कलिंग , ह्या देशांमध्यें गमन केलें असतां तो पुनः संस्काराला योग्य होतो . " हेमाद्रींत प्रायश्चित्तकांडांत - वृद्ध गौतम - " गाढव , उंट , टोणगा , बैल , बोकड , एडका , यांच्यावर ब्राह्मण बसून एक कोशपर्यंत गमन करील तर त्याला चांद्रायण प्रायश्चित्त सांगावें . " मार्केंडेय - " ब्राह्मण गाढवावर बसून एक योजनपर्यंत जर जाईत तर त्याच्या शरीरशुद्धींसाठीं तीन तप्तकृच्छ्रें प्रायश्चित्त सांगावें . नंतर घृतकुंभांत बुडवून पुनः बाहेर काढून स्नान घालावें . " मदनरत्नांत व मिताक्षरेंत स्नान मात्र सांगितलें आहे . मनु - " अज्ञानेंकरुन विष्ठा , मूत्र व सुरा लागलेला पदार्थ यांतून कोणतें एक भक्षण करतील तर ते तीनही वर्ण द्विजाति पुनः संस्काराला पात्र होतील . " मिताक्षरेंत पराशर - " जो ब्राह्मण संन्यास घेऊन नंतर त्या आश्रमांतून निवृत्त होऊन गृहस्थाश्रमधर्मांत येण्याची इच्छा करील त्यानें ; व मरण येण्याकरितां उपोषणाचा संकल्प करुन पुनः त्यापासून निवृत्त होईल तर त्यानेंही तीन कृच्छ्र व तीन चांद्रायणें प्रायश्चित्त करुन नंतर जातकर्मादि सर्व संस्कारांनीं संस्कृत झाला असतां शुद्ध होतो , नंतर त्यानें गृहस्थाश्रमधर्म स्वीकारावे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP