मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
विद्यारंभकाल

तृतीयपरिच्छेद - विद्यारंभकाल

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


यानंतर विद्यारंभकाल सांगतो .

अथविद्यारंभः मदनरत्नेनृसिंहः अक्षरस्वीकृतिंकुर्यात्प्राप्तेपंचमहायने उत्तरायणगेसूर्येकुंभमासंविवर्जयेत् ‍ दीपिकायाम् ‍ वर्षेंपर्जन्यकेकालेषष्ठींरिक्तांशनिंकुजं अनध्यायान्विनानत्वादेवंग्रंथकृतंगुरुं श्रीधरः हस्तादित्यसमीरमित्रपुरजित्पौष्णाश्विचित्राच्युतेष्वारार्क्यंशदिनोदयादिरहितेराशौस्थिरेचोभये पक्षेपूर्णनिशाकरेप्रंतिपदंरिक्तांविहायाष्टमींषष्ठीमष्टमशुद्धभाजिभवनेप्रोक्ताक्षरस्वीकृतिः विष्णुधर्मोत्तरे पूजयित्वाहरिंलक्ष्मींतथादेवींसरस्वतीं स्ववेदंसूत्रकारांश्चस्वांविद्यांचविशेषतः एतेषामेवदेवानांनाम्नातुजुहुयाद्धृतम् ‍ दक्षिणाभिर्द्विजेंद्राणांकर्तव्यंचात्रपूजनमिति ।

मदनरत्नांत - नृसिंह - " पांचव्या वर्षीं उत्तरायणांत कुंभसंक्रांति वर्ज्य करुन अक्षर लिहिण्यास आरंभ करावा . " दीपिकेंत - " पर्जन्यविरहित अशा कालीं षष्ठी , रिक्ता ह्या तिथि आणि शनि व मंगळ हे वार वर्ज्य करुन अनध्यायरहित दिवशीं कुलदेवता , व गुरु यांना नमस्कार करुन लेखनारंभ करावा . ’ श्रीधर - " हस्त , पुनर्वसु , स्वाती , अनुराधा , आर्द्रा , रेवती , अश्विनी , चित्रा , श्रवण ह्या नक्षत्रांवर ; मंगळ व शनि ह्यांचे वार , अंश , व लग्न वर्ज्य करुन अन्यवारीं स्थिरलग्नीं शुक्लपक्षांत व कृष्णपक्षांत चंद्रक्षीण नसतां प्रतिपदा , रिक्ता , षष्ठी , अष्टमी ह्या तिथि वर्ज्य करुन अन्य तिथींचे ठायीं ; अष्टमस्थान शुद्ध असतां अक्षरलेखनाला आरंभ करावा . " विष्णुधर्मोत्तरांत - " विद्यारंभकालीं हरि , लक्ष्मी , सरस्वती , आपला वेद आपले सूत्रकार व आपली विद्या यांची विशेषतः पूजा करुन , ह्याच , देवतांच्या नाममंत्रांनीं घृताचा होम करुन ब्राह्मणांची पूजा करुन त्यांना दक्षिणा द्यावी . "

अथधनुर्विद्या दीपिकायां अदितिगुरुयमार्कस्वातिचित्राग्निपित्र्यध्रुवहरिवसुमूलेष्विंदुभागांत्यभेषु शनिशशिबुधवारेविष्णुबोधेविपौषेसुसमयतिथियोगेचापविद्याप्रदानम् ‍ ।

आतां धनुर्विद्या सांगतो दीपिकेंत - " पुनर्वसु , पुष्य , भरणी , हस्त , स्वाती , चित्रा , कृत्तिका , मघा , तीन उत्तरा , रोहिणी , श्रवण , धनिष्ठा , मूल , मृग , पूर्वा , रेवती ह्या नक्षत्रांवर ; शनि , सोम , बुध ह्या वारीं ; विष्णुशयन ( चार मास ) व पौषमास वर्ज्य करुन इतरमासांत शुभतिथि व शुभयोग पाहून धनुर्विद्येचा आरंभ करावा . "

आतां अनुपनीताला विशेष सांगतो -

अथानुपनीतस्यविशेषः गौतमः प्रागुपनयनात्कामचारवादभक्षाइति भक्षणंलशुनादेरपीतिहरदत्तः अपरार्केवृद्धशातातपः शिशोरभ्युक्षणंप्रोक्तंबालस्याचमनंस्मृतं रजस्वलादिसंस्पर्शेस्नानमेवकुमारके प्राक् ‍ चूडाकरणाद्वालः प्रागन्नप्राशनाच्छिशुः कुमारकस्तुविज्ञेयोयावन्मौंजीनिबंधनं आपस्तंबोपि अन्नप्राशनात्प्रयतोभवत्यासंवत्सरादित्येकेइति गौतमोपि नतदुपस्पर्शनादाशौचम् ‍ तस्यानुपनीतस्यचांडालादिस्पृष्टस्यापिस्पर्शान्नस्नानं इदंचषष्ठवर्षात्प्राक् ‍ ऊर्ध्वंतुस्नानंभवत्येव बालस्यपंचमाद्वर्षाद्रक्षार्थंशौचमाचरेदिति स्मृतेः कामचारादिकेप्येवं ऊनैकादशवर्षस्यपंचवर्षात्परस्यच चरेद्गुरुः सुह्रच्चैवप्रायश्चित्तंविशुद्धये अतोबालतरस्यास्यनापराधोनपातकमितिस्मृतेरितिहरदत्तः स्मृत्यर्थसारेप्येवं ।

गौतम - " मुंज होण्याच्या पूर्वीं मुलानें आपल्या इच्छेप्रमाणें आचरण , भाषण व भक्षण करावें . " भक्षण म्हणजे लसूण , कांदा इत्यादि पदार्थाचेंही भक्षण करावें , असें हरदत्त सांगतो . अपरार्कांत वृद्धशातातप - " रजस्वला इत्यादिकांचा स्पर्श झाला असतां शिशूला प्रोक्षण सांगितलें आहे . बालाला आचमन आणि कुमाराला स्नानच सांगितलें आहे . अन्नप्राशनाच्या पूर्वीं मुलाला शिशु म्हणावें . अन्नप्राशनानंतर चौल होण्याच्यापूर्वीं बाल आहे . चौलापासून मौंजीबंध होण्याच्या पूर्वी कुमार हें नांव आहे . " आपस्तंबही - " अन्नप्राशन झाल्यावर प्रयत ( आचमनयोग्य ) होतो . कितीएक आचार्य असें सांगतात कीं , एक वर्षानंतर आचमनाला योग्य होतो . " गौतमही - " ज्याचें उपनयन झालें नाही त्याला चांडालादिकांचा स्पर्श झाला असला तरी त्याचा स्पर्श झाला म्हणून स्नान करुं नये . " हा निर्णय सहाव्या वर्षांच्या पूर्वीं आहे . सहाव्या वर्षापासून पुढें ज्ञान अवश्य आहेच . कारण , " बालकाकडून पांचव्या वर्षापासून पुढें संरक्षणार्थ शौच आचरण करवावें . " अशी स्मृति आहे . ऐच्छिक आचार , ऐच्छिक भाषण , आणि ऐच्छिक भक्षण यांविषयींही असाच निर्णय समजावा . कारण , " पांचवर्षापुढें व अकरावर्षांहून कमी वयाचा जो कुमार त्यानें पापाचरण केलें असतां त्याचे शुद्धर्थ कुमाराचे गुरुनें ( पित्यानें ) किंवा आप्तानें प्रायश्चित्त करावें . याहून अल्पवयाचा जो बाल त्याच्याकडून एकादें वाईट कृत्य घडलें असतां त्याला अपराध नाहीं व पाप नाहीं " अशी स्मृति आहे , असें हरदत्त सांगतो . स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP