मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
कटिसूत्रबंधन

तृतीयपरिच्छेद - कटिसूत्रबंधन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां कटिसूत्रबंधन सांगतो .

अथकटिसूत्रं प्रयोगपारिजाते ब्राह्मे प्रतिसंवत्सरांतर्क्षेवक्ष्येनृणांविधिंपरं दत्वागोभूहिरण्यादितथास्वर्णादिनिर्मितं बध्नीयात्कटिसूत्रंचवासः संगृह्यनूतनं दूर्वांकुरैरथाज्येनचरुणावापिनाकिनं आयुष्यहोमंकृत्वाचतर्पयेत् ‍ पितृदेवताः ।

प्रयोगपारिजातांत ब्राह्मांत - " प्रत्येक वर्षाचे अंतीं जन्मनक्षत्रीं मनुष्यांना कर्तव्य विधि सांगतो - गाई , भूमि , हिरण्य इत्यादि दान करुन नवीन वस्त्र परिधान करुन सुवर्णादिकांचा केलेला कटिदोरा बांधावा ; दूर्वांकुर किंवा घृत अथवा चरु यांचा रुद्रदेवतेच्या उद्देशानें आयुष्यहोम करुन पितरांचें व देवतांचें तर्पण करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP