संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
विस्फोटरोगनिदान

माधवनिदान - विस्फोटरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


विस्फोट सेगाचीं कारणें

कटवम्लतीक्ष्णोक्ष्णविदाहिरुक्षक्षारैरजीर्णाध्यशनातपैश्च ॥

तथर्तुदोषेण व्रिपर्ययेण कुप्यन्ति दोषा : पवनादयस्तु ॥१॥

त्वचमाश्रित्य ते रक्तमांसास्थीनि प्रदूष्य च ॥

घोरान्‌ कुर्वन्ति विस्फोटान्‌ सर्वान्‌ ज्वरपुर : सरान्‌ ॥२॥

तिखट , आंबट , तीक्ष्ण , उष्ण , रूक्ष , क्षार व दाह करणारे पदार्थ खा ल्ल्या ने , अजीर्णाने , जेवणावर जेवल्याने , उन्हात फिरल्याने व तसेच ऋतुदोष ( थंडी अथवा उन्हाळा यांचा अति योग ) अथवा ऋतुविपर्यय ( भलत्याच ऋतूत भलती हवा ) घडल्याने रोग्याच्या शरीरातील वातादि दोष प्रकुषित होतात व ते त्व चेचा आश्रय करून आणि रक्त , मांस व अस्थि यांना दूषित करून ( सडकून ताप येऊन उद्भवणारा असा ) त्याच्या ठिकाणी विस्फोट रोग उत्पन्न करतात .

विस्फोट रोगाचें स्वरूप .

अग्निदग्धनिभा : स्फोटा : ज्वरा रक्तपित्तजा : ॥

क्वचित्‌ सर्वत्र वा देहे विस्फोटा इति ते स्मृता : ॥३॥

रोग्याच्या शरीराच्या काही भागावर अथवा सर्व ठिकाणी आगीने भाजल्यासारखे फोड उत्पन्न होणे व त्यामुळें त्यांस ताप येणे या प्रकारास विरफोट रोग म्हणतात . याचे तिन्ही दोषांपासून होणारे पृथक्‌ तीन , द्वंद्वज तीन सान्निपातिक एक व रक्तजन्य एक असे आठ प्रकार असून त्या सर्वातर र क्तपित्ताचा संबंध असतो .

वातविस्फोटाचीं लक्षणें .

शिरोरुक्‌ शूलभूयिष्ठं ज्वरस्तृट पर्वभेदनम्‌ ॥

सकृष्णवणता चेति वातविस्फोटलक्षणम्‌ ॥४॥

रोग्यास वातविस्फोट झाला असता ताप येतो , तहान लागते , त्याचे डोके दुखते , सांधे फुटतात , फोडांना काळेपणा असतो व त्यास ठणका लागतो .

पित्तविस्फोटाचीं लक्षणें .

ज्वरदाहरुजास्रावपाकतृष्णाभिरन्वितम्‌ ॥

पीतलोहितवणें च पित्तविस्फोटलक्षणम्‌ ॥५॥

पित्तविस्फोटात उद्भवणार्‍या फोलास ठणका असतो व ते पिकून स्राव होतो . रो ग्या च्या अंगाचा दाह होतो व वर्ण पिवळा तांबडा पडतो आणि त्याचप्रमाणे त्यास ज्वर येतो व तो तहानेने व्याकुळ होतो .

कफविस्फोटाचीं लक्षणें .

छर्द्यरोचकजाडयानि कण्डूकाठिन्यपाण्डुता : ॥

अवेदनश्चिरात्पाकी स विस्फोट : कफात्मक : ॥६॥

कफविस्फो टा त उद्भवणारे फोड कठिण व पांढरे आसून त्यांस ठणका नसतो , पण कंड असते व ते उशीराने पिकतात ; तसेच या रोगात रोग्याचे अंग जड होते ; त्या च्या तोंडास रुचि नसते व त्यास वांति होते .

द्वंद्वजविस्फोट रोगाचीं लक्षणें .

कण्डूर्दाहो ज्वरच्छर्दिरोतैस्तु कफपैतिक : ॥

वातपित्तकृतो यस्तु कुरुते तीव्रवेदनाम्‌ ॥७॥

कण्डूस्तैमित्यगुरुभिर्जानीयात्कफवातिकम्‌ ॥

द्वंद्वज ( दोन दोन दोषांपासून होणार्‍या ) विस्फोटापैकी कफपित्तजन्य विस्फोटात कड , ज्वर , दाह आणि ओ का री ही लक्षणे असतात ; वातपित्तजन्यांत फोडांना ठणका फार अ सतो ; आणि कफवातजन्य विस्फोटात कंड , ओले वस्त्र गुंडाळलेले वाटणे , अंग जड होणे व आळस येणे ही लक्षणे उत्पन्न होतात .

सान्निपातिक विस्फोटाचीं लक्षणें .

मध्ये निम्नोन्नताऽन्ते च कठिनोऽल्पप्रपाकवान्‌ ॥८॥

दाहरागतृषामोहच्छर्दिमूर्च्छारूजोज्वरा : ॥

प्रलापो वेपथुस्तन्द्र सोऽसाध्यश्च त्रिदोषज : ॥९॥

सान्निपातिक विस्फोट रोग हा असाध्य असून त्याची लक्षणे शरीरावर उद्भवलेले फोड कठिण , किंचित्‌ पिकणा रे आणि मध्ये खोल व कडेला उंच असे असून त्यास अत्यंत ठणका असणे व त्यामुळे ताप , बडबड , तहान , चक्कर , मूर्च्छा , झापड , ओकरी , दाह व अंग कापणे आणि त्याचा वर्ण लाल होणे व रोगी व्याकुळ झालेला दिसणे अशा प्रकारची असतात .

रक्तजन्य विस्फोटाचीं लक्षणें .

रक्ता रक्तामुत्थाना गुञ्जाफलनिभास्तथा ॥

वेदितव्यास्तु रक्तेन पैत्तिकेन च हेतुना ॥१०॥

न ते सिद्धिं समायान्ति तिद्धैर्योगशतैरपि ॥

रक्तजन्य विस्फोटात रोग्याच्या शरीरावर उद्भवलेले फोड रक्त किंवा पित्त दूषित झाल्यामुळे उत्पन्न झालेले असतात व ते आकाराने गुंजेएवढे व व र्णा ने लाल असे असून शेकडो अनुभविक उपायांनी त्याची चिकित्सा केली तरी ते साध्य होणारे नसतात .

विस्फोटाचीं साध्या सा ध्य लक्षणें .

एकदोषोत्थित : साध्य : कृच्छ्रसाध्यो द्विदोषज : ॥

सर्वदोषोत्थितो घोरस्त्वसाध्यो भूर्युपद्रव : ॥११॥

एक दोषापासून झालेला विस्फोट रोग साध्य होतो व दोन दोषांपासून होणारा कष्टसाध्य असतो ; पण वर सांगितलेल्या सर्व लक्षणाचा व तसाच पुढे सांगितलेल्या अनेक उपद्रवांनी युक्त असलेला असा विस्फोट रोग कधीही बरा होणा रा नसतो .

विस्फोटाचे उपद्रव .

हिक्काश्वासोऽरुचिस्तृष्णा अङ्गसादो ह्रदि व्यथा ॥

विसर्पज्वरहृल्लासविस्फोटानामुपद्रवा : ॥१२॥

ज्वर , विसर्परोग , अंग गळणे , उरात दुखणे , श्वास लागणे व त्याचप्रमाणे अरुचि तहान , मळमळ व ओकारी हे उपद्रव विस्फोट रोग झाला असता उत्पन्न होतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP