TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
प्रमेहपीटिका

माधवनिदान - प्रमेहपीटिका

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


प्रमेहपीटिका

प्रमेहपिटिकानिदान

पिटिका व त्यांचीं स्थानें .

शराविका कच्छपिका जालिनी विन्‌ताऽलजी ॥

मसूरिका सर्षपिक्रा पुत्रिणी सविदारिका ॥१॥

विद्रधिश्चेति पिटिका : प्रमेहोपेक्षया दश ॥

सन्धिमर्मसु जायन्ते मांसलेषु च घामसु ॥२॥

प्रमेह रोगाच्या शराविका , कच्छपिका : जालिनी , विनता , अलजी , मसूरिका , सर्षपिका , पुन्निणी , विदारिका व विद्रधिका अशा दहा पिटिका ( पुळ्या ) आहेत ; त्या प्रमेह झालेल्या रोग्याची उपेक्षा केली असता त्याच्या शरीराचे सांधे , मर्मस्थाने व मांसल भाग यांच्या ठिकाणी उद्‌भवतात . त्यांचे आकार व लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .

सर्व पिटिकांचे आकार व लक्षणें .

अन्तोन्नता च तदुपा निम्नमध्या शराविका ॥

सदाहा कूर्मसंस्थाना ज्ञेया कच्छपिका बुधै : ॥३॥

जालिनी तीव्रदाहा तु मांसजालसमावृता ॥

अवगाढरुजोत्क्लेदा पृष्ठे वाप्युदरेऽपि वा ॥४॥

महती पिटिका नीला सा बुधैर्विनता : स्मृता ॥

रक्ताऽसिता स्फोटवती दारुणा त्वलजी भवेत्‌ ॥५॥

मसूरदलसंस्थाना विज्ञेया तु मसूरिका ॥

गौरसर्षपसंस्थाना तत्प्रमाणा च सर्षणी ॥६॥

महत्यल्पचिता ज्ञेया पिटिका चापि पुत्रिणी ॥

विदारिकन्दवद्वृत्ता कठिना च विदारिका ॥

विद्रधेर्लक्षणैर्युक्ता ज्ञेया विद्रधिका तु सा ॥७॥

पहिली पिठिका शराविका , ही परळासारखी कडेला उंच च मध्ये खोलगट असते ; दुसरी कच्छपिका , कासवाच्या पाठीसारखी असते व ती किंचित्‌ दाह करते ; तिसरी जालिनी , ही मांसाच्या वाळयांनी व्यापलेली असून अत्यंत दाहकारक असते ; चवथी विनता , निळया रंगाची , मोठी , खोल व अत्यंत वेदना करणारी व ओलसर अशी असून ती पाठीवर किंवा पोटावर उद्भवते ; पांचवी अलजी , ही फेडांनी युक्त , भयंकर आणि तांबडया अथवा काळया रंगाची असते ; सहावी मसूरिका , मसुरेच्या डाळीसारखी दिसते ; सातवी सर्षपिका , पांढर्‍या मोहरीसारखी व तिच्याच आकाराची होते ; आठवी पुत्रिणी , ही मोठी व सभोवती लहान लहान फोड असलेली असते : नववी विदारिका , विदारीच्या कांद्याप्रमाणे वाटोळी व कठीण अशी उद्‌भवते ; आणि दहावी विद्रधिका ही विद्रवीच्या लक्षणानी युक्त असते .

पिटिका कशा उत्पन्न होतात .

ये यन्मया : स्मृता मेहास्तेषामेतास्तु तन्मया : ॥

विनाप्रमेहमप्येता जायन्ते दुष्ठमेदस : ॥८॥

तावच्चेता न लक्ष्यन्ते यावद्वास्तुपरिग्रह : ॥९॥

ज्या दोषामुळे जे मेह ऊद्भवले असतात त्याच दोषामुळे त्यात पिटिका ( पुळया ) उद्भवतात . कधी कधी प्रमेह झाला नसूनहि मेदाने दूषित झालेल्या पुरुषाच्या शरीरावर ह्या पिटिका उठतात व त्या त्याचा ( शरीराचा ) काही एक भाग व्यापीपर्यंत लक्षात येत नाहीत .

पिटिकांचे उपद्रव

तृटकासमांससङकोचमोहहिक्कामदज्वरा : ॥

विसर्पमर्मसंरोधा : पिटिकानामुपद्रवा : ॥१०॥

पिटिका झाल्या असता तहान , मूर्च्छा उचकी , गुंगी , ज्वर , विसर्परोग , मांससंसकोच आणि मर्मसंरोध हे उपद्रव उत्पन्न होतात .

पिटिकांचीं असाध्य लक्षणें .

गुदे ह्रदि शिरस्थंसे पृष्ठे जर्मखु खोत्थिता : ॥

सोपद्रवा दुर्वलाग्ने : पिटिका : परिवकयेत्‌ ॥११॥

गुदद्वार , हृदय , डोके , खांदे , पाठ व मर्मस्थाने यांवर उद्भवलेल्या पिटिका ( पुळया ) असाध्य समजाव्या : व तशाच जठराग्नि मंद झालेल्या गेग्याच्या ठायी उपद्रवयुक्त असलेल्या पिटिकाही सोडून द्याव्या .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:39.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

space suit

  • (a suit equipped with air supply and other elaborate provisions intended to make life in free space possible for its wearer) अवकाश कपडे, अवकाश सूट 
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site