संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
हॄदयरोगनिदान

माधवनिदान - हॄदयरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


ह्रदयरोगाचीं कारणें .

अत्युष्णगुर्वम्लकषायतिक्तै : श्रमाभिघाताध्यशनप्रसङै : ॥

सञ्चिन्तनैर्वेगविधारणैश्च ह्रदामथ : पञ्जविध : प्रदिष्ट : ॥१॥

अतिशय उष्ण , जड , आंबट , तुरट व कडकट अशा पदार्थांचे नित्य सेवन , जेवणावर जेवण , मलमूत्रादिकांच्या वेगाचा अवरोध , श्रम , काळजी आणि आघात या कारणांमुळे पुढे सांगितलेला पाच प्रकारचा ह्रदयरोग होतो .

ह्रदयरोगाचीं संप्राप्ति .

दूषयित्व रसं दोषा विगुणा ह्रदयं गता : ॥

हदि बाधां प्रकुर्वन्ति ह्रद्रोगं तं प्रचक्षते ॥२॥

कुपित झालेला वातादि दोष अन्नरसाला दूषित करून ह्रदयाकडे जातात व त्यामध्ये नाना प्रकारच्या वेदन उत्पन्ना करतात यास ह्रदयरोग असे म्हणतात . ( याचे तिन्ही दोषापासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन ; तिन्ही दोष मिळून होणारा एक ; आणि कृमिजन्य एक असे पाच प्रकार आहेत .)

वातह्रदयरोगाचीं लक्षणें .

आयम्यते भारुतजे ह्रदयं तुद्यते तथा ॥

निर्मथ्यते दीर्यते च स्फोटयतेपाटयतेऽपि च ॥३॥

ज्यांत ह्रदय ओढल्यासारखे , दोन तुकडे केल्यासारखे , रवीज्ने घुसळल्यासारखे ’ आरीने भोसकल्यासारखे , सुईने टोचल्यासारखे व कुर्‍हाडीने फोडल्यासारखे . दुखते तो वातजन्य ह्रदयरोग होय .

पित्तहृदयरोगाचीं लक्षणें .

तृष्णोष्मदाहमोहा : स्यु : पैत्तिके ह्रदयक्लम : ॥

धूमायनं च मूर्च्छा च स्वेद : शोषो मुखस्य च ॥४॥

पित्तजन्य ह्रदयरोगांत ह्रदय व्याकूळ होते , तोंडास कोरड पडते . व त्यातून घूर निधाल्यासारखे वाटते आणि किंचित्‌ दाह , मूर्च्छा , चक्कर , तहान उष्णता व घाम हे प्रकार उद्भवतात .

कफह्रदयरोगाचीं लक्षणें .

गौरवं कफसंस्त्रावोऽरुचि : स्तम्भोऽग्निमार्दवम्‌ ॥

माधुर्यमपि चास्यस्य बलासावतते हृदि ॥५॥

कफजन्य ह्रदयरोगाची लक्षणे :--- ह्रदय ताठल्यासारखे व अंग जड होणे , तोंड गुळचट व बेचव होऊन त्यावाटे कफ पडणे आणि जठराग्नि मंद होणे , अशा प्रकारची असतात .

सन्निपातह्रवयरोग .

विद्यात्त्रिदोषं त्यपि सर्वालिङ्गम्‌ ---

तिन्ही दोघांची सर्व लक्षणे ज्यांत उत्पन्न होतात तो सान्निपतिक ह्रदयरोग

समजावा . कृमिजन्यह्रदयरोग .

तीव्रार्तितोदं कृमिजं सकण्डूम्‌ ॥

उत्क्लेद : ष्ठीवनं तोद : शूलं ह्रल्लासकस्तम : ॥

अरुचि : श्यावनेत्रत्वं शोषश्च कृमिजे भवेत्‌ ॥६॥

ह्रदयरोगाचा पांचवा प्रकार जो कृमीपासून उद्भवतो तो तीव्र वेदना , टोचणी व कंडू यांनी युक्त असून शिवाय ओकारी आल्याप्रमाणे वाटणे , थुंकी फार सुटणे , सुया टोचल्यासारखी पीडा होणे , अन्नाचा तिटकारा येणे , तोंड कोरडे पडणे , डोळे काळवंडणे व त्यापुढे अंधेरी येणे , मळमळणे व वेदना होणे ही लक्षणे त्यांत द्दष्टीस पडतात .

सर्व ह्रदयरोगांतील उपद्रव .

क्लम : सादो भ्रम : शोषो ज्ञेयास्तेषामुपद्रवा : ॥

कृमिजे कृमिजातीनां श्लैष्मिकाणां च ये मता : ॥७॥

सर्व प्रकारच्या ह्रदयरोगांत फुप्फुसांत ग्लनि , चक्कर , व शोष हे उपद्रव उत्पन्न होत असून शिवाय कृमिजन्य ह्रदयरोगांत कफज - यकृमीत होणारे ( उम्हासे येणे , तोंडाला पाणी सुटणे , अन्न पवन न होणे , पोठात गुरगुरणे व दुखणे आणि त्याचप्रमाणे मूच्छी , ओकारी , क्षीणता पडसे व शिंका हे ) उपद्रव अधिक उद्भवतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP