TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
अपस्मारनिदान

माधवनिदान - अपस्मारनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


अपस्मारनिदान

अपस्मार रोगाचीं कारणें .

स्मृतिर्भूतार्थविज्ञानमपश्चपरिवर्जनम्‌ ॥

अपस्मार इति प्रोक्तस्ततोऽयं व्याधिरन्तकृत्‌ ॥१॥

मिथ्यादियोगेन्द्रियार्थकर्मणामतिसेवनात्‌ ॥

विरुद्धमलिनाहारविहारकुपितैर्मलै : ॥२॥

वेगनिग्रहशीलानामहिताशुचिभोजिनाम्‌ ॥

रजस्तमोभिभूतानां गच्छतां च रजस्वलाम्‌ ॥

चेतस्यभिहते पुंसामपस्मारोऽभिजायते ॥४॥

गतगोष्टीच्या ज्ञानास स्मृति म्हणतात व अप हा उपसर्ग ( तिचा ) अभाच सुचवितो , म्हणून ह्मा मारक रोगास अपस्मार म्हणता . ( कारण या रोगाचे मुख्य लक्षण हे की रोगी वेशुद्ध पडतो .) पंचज्ञानेंद्रियांचे विषय व पंचकमेंद्रियांचे विषय यांचा दुरुपयोग , कमी उपयोग किंवा अति उपयोग केल्याने ; विरुद्ध व ओंगळ अशा आहारविहारामुळे वातादि दोषांचा प्रकोप झाल्याने , मलमूत्रांच्या वेगाचा अवरोध केल्याने अपथ्यकर व घाणेरडे असे अन्न खाल्याने , आणि त्याचप्रमाणे काम , क्रोध , शोक , मय व चिंता इत्यादिकांमुळे मनाचा क्षोम झाल्याने हा अपस्मार रोग ( घुरे ) उत्पन्न होतो .

अपस्माराचीं सामान्य लक्षणें .

तम : प्रवेश : संरम्भो दोषोद्रेकहतस्तृति ॥

अपस्मार इति ज्ञेयो गदो घोरश्चतुर्विध : ॥५॥

अपस्मार ( घुरे , फेपरे ) हा एक भयंकर रोग असून त्याचे , वात पित्त व कफ या तीन दोषांच्या प्रकोपापासून होणारे निरनिराळे तीन व तिन्ही दोष मिळून होणारा एक असे चार पकार आहेत . याची सामान्य लक्षणे . :--- रोग्यास अंधारांत शिरल्यासारखे वाटते , तो हातपाय आपटतो व वातादिदोषांच्या वृद्धीमुळे त्याचे स्मरण नष्ट होते .

अपस्माराचें पूर्वरूप .

हृत्कम्प : शून्यता स्वेदो ध्यानं मूर्च्छा प्रमूढता ॥

निद्रानाशश्च तस्मिंस्तु भविष्यति भवन्त्यथ ॥६॥

अपस्मार होण्याच्या पूर्वी ह्रदय कांपणे , चिंता लागणे , मूर्च्छा येणे , इंद्रिये आपापल्या व्यापाराविषयी मूढ होणे , झोप नाणे व काही सुचेनासे होणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .

अपस्माराची पाली .

पक्षाद्वा द्वादशाहाद्वा मासाद्वा कुपिता मला : ॥

अपस्माराय कुर्वन्ति वेगं किञ्चिदथोत्तरम्‌ ॥७॥

देवेवर्षत्यपि यथा भूमौ बीजानि कानिचित्‌ ॥

शरदि प्रतिरोहन्ति तथा व्याधिसमुच्छ्रय : ॥८॥

कुपित झालेल वात , पित्त व कफ या दोषांपासून उद्भवणार्‍या अपस्माराची पाळी रोग्यास अनुक्रमे पंधरा , बारा व पित्ताची तीस दिवसांनी येते . ( म्हणजे वाताची पंधरा , कफाची बारा व पित्ताची तीस दिवसांनी येते .) पण कधी दोषाचा वेग कमी अधिक असल्यास या सांगितलेल्या काळच्या आगेमागेही येते . आता ती सर्वकाल न येता अशी नियमितकालीच का येते या शंकेचे समाधान बीजाच्या द्दष्टान्तावरून होईल . बीज कसे पर्जन्यकाळी जमिनीत पेरले असतांही ते शरत्कालाशिवाय उगवत नाही , त्याचप्रमाणे नियमित काळी येणारे रोग रोग्याच्या ठायी दोषसंचय पुग झाल्याखेरीज उत्पन्न होत नाहीत .

वातापस्माराचीं लक्षणें .

कम्पते सन्दशेद्दन्तान्‌ फेनोद्वामी श्वसत्यपि ॥

परुषारुणकृष्णानि पश्येदुपाणि चानिलात्‌ ॥९॥

वाय़ूपासून झालेल्या अपस्मारांत रोगी कांपतो , दात खातो , व आपल्या डोळयाच्या पोकळीत रूक्ष ( निस्तेज ) तांबूस व काळी अशी रूपे पाहतो ; तसेच त्यास श्वास लागतो व तोंडावाते फेस येतो .

पित्तापस्माराचीं लक्षणें .

पीतफेनाङ्गवक्त्राक्ष : पीतासृग्रूपदर्शन : ॥

स तृष्णोष्णाऽनलव्याप्तलोकदर्शी च पैत्तिक : ॥१०॥

पित्तापस्मार झालेल्या रोग्याचा तोंडातून निघणारा फेस , अंग , तोंड व डोळे हे पिवळे असतात ; व तो आपल्या डोळयांसमोरील पोकळीत पिवळी व तांबडी रूपे आणि सर्वत्र भडकलेल्या अग्नीच्या ज्वाला पाहतो .

कफापस्माराचीं लक्षणें .

शुक्लफेनाङ्गवक्त्राक्ष : शीतो हृष्टाङ्गजो गुरु : ॥

पश्यन शुक्लानि रूपाणि मुच्यते श्लौष्मिकश्चिरात्‌ ॥११॥

रोग्याचे डोळे , तोंड व तोंडातून निघणारा फेस हे पांढरे होणे ; अंग जड , पांढरे ’ गार व रोमांचयुक्त असणे व त्यास डोळयासमोरील पोकळीत पांढरे पदार्थ दिदणे ही लक्षणे द्दष्टीस पडली असता त्यास कफापस्मार झाला म्हणून समजावे . वात व पित्त यांपासून होणार्‍या अपस्मारापेक्षां यात अधिक वेळाने रोग्याची सुटका होते .

त्रिदोषापस्माराचीं लक्षणें .

सर्वैरेतै : समस्तैश्च लिङ्गैर्ज्ञेयास्त्रिदोषज : ॥

अपस्मार : स चासाध्यो य : क्षीणस्याऽनवश्च य : ॥१२॥

वर सांगितलेली वात , पित्त व कफ या तिन्ही दोषापासून होणार्‍या अपस्माराची लक्षणे एकत्र असली म्हणजे त्यास सन्निपातापस्मर म्हणावे . हा असाध्य आहे तसाच क्षीण पुरुषास झालेला अथवा फार दिवस राहिलेला असा जो अपस्मार तोहि असाध्य आहे .

अपस्माराचीं असाध्य लक्षणें .

प्रतिस्फूरन्तं बहुश : क्षीणं प्रचलितभ्रुवम्‌ ॥

नेत्राभ्यां च विकुर्वाणमपरमारो विनाशयेत्‌ ॥१३॥

जो अपस्माराचा रोगी क्षीण झालेला असून वारंवार कांपतो , भुवया चाळवितो व डोळे वांकडेतिकडे करितो तो असाध्य जाणावा .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:36.4100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

HARI XI(हरि)

  • A sect of Devas. During the Tāmasamanvantara there were four such sects, viz. Haris, Satyas, Supāras and Sudhīs. (See Manvantara). 
RANDOM WORD

Did you know?

मंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site