TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
ग्रहणीनिदान

माधवनिदान - ग्रहणीनिदान

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


ग्रहणीनिदान

ग्रहणीची संप्राप्ति व लक्षणें .

अतिसारे निवृत्तेऽपि मन्दाग्नेरहिताशिन : ॥

भूय : सन्दूषोतो वन्हिर्ग्रहणीमभिदूषयेत्‌ ॥१॥

एकैकश : सर्वशश्च दोषैरत्यर्थमूर्च्छितै : ॥

सा दुष्टा बहुशो भुक्तमाममेव विमुञ्चति ॥२॥

पक्वं वा सरुजं पूति मुहुर्बद्धं मुहुर्द्रवम्‌ ॥

ग्रहणीरोगमाहुस्तमायुर्वेदविदो जना : ॥३॥

 

अतिसार १ बरा झाला असताहि जठराग्नि मंद झालेल्या रोग्याकडून जरा खाण्यात कुपथ्य घडले तर त्याचा जठराग्नि पुन : दूषित होऊन ग्रहणीला दूषित करतो , मग आधींच दूषित झालेली ग्रहणी वात , पित्ता , कफ या दोषापैकीं एकेकाच्या दोषामुळे किंवा सर्वांव्या दोषांमुळे अत्यंत दूषित झाली असतां रोग्याने खाल्लेले अन्न बहुधा अपक्वच किंवा पक्व त्याच्या गुदद्वारावाटे बाहेर सोडते , त्यावेळी मुरडा फार होतो व मलास अत्यंत घाण येते , वायूच्या दोषाने मल वारंवार घट्ट होतो व पित्तदोषाने वारंवार पातळ किंवा भस्रा होतो . ( गहणी दूषित झाल्यामुळे हा होतो म्हणून ) वैद्य यांस ग्रहणीरोग म्हणतात .

ग्रहणीचीं पूर्वरूपें .

पूर्वरूपं तु तस्त्येदं तृष्णालस्यं बलक्षय : ॥

विदाहोऽन्नस्य पाकश्च चिरात्कायस्य गौरवम्‌ ॥४॥

तहान लागणे , आळस येणे , बलनाश होणे , अन्नपचन होतांना जळजळ लागणे . अन्नपचन उशीरा होणे व शरिराला जडत्व येणे ही लक्षणे कोणास होऊं लागली म्हणजे त्याला ग्रहणी होणार असे समजावे .

वातिक ग्रहणीचीं कारणें .

कटुतिक्तकषायातिरूक्षसन्दुष्टभोजनै : ॥

प्रमितानशनात्यध्ववेगनिग्रहमैथुनै : ॥५॥

मारूत : कुपितो वन्हिं संच्छाद्य कुरुते गदान्‌ ॥

वातग्रहणी म्हणजे रोग्याने कडू , तिखट व अति रूक्श व संयोगविरूद्व १ पदार्थ खाल्लायामुळे , तसेच थोडे खाल्लयाने किंवा उपास केल्याने आणि फार चालण्याचे श्रम , मलमूत्राच्या वेगाचा अवरोध व अत्यंत स्त्रीसंग या गोष्टी केल्याने वातदोष प्रकोप पावून त्याच्या जठराग्नीला दूषित करून जो विकार उत्पन्न करतो तो . याचे अनेक प्रकार आहेत ते पुढे लिहिल्याप्रमाणे समजावे .

वातिक ग्रहणी . पासून होणारे विकार .

तस्यान्नं पच्यते दुःखं शुक्तपाकं खराताङ्ग ॥६॥

कण्ठास्य शोष : क्षुत्तृष्णा तिमिरं कर्णयो : स्वन : ॥

पार्श्वोरूवङक्षणग्रीवारुगभीक्ष्णं विषूचिका ॥७॥

ह्रत्पीडा कार्श्यदौर्बल्यं वैरस्यं परिकर्तिका ॥

गृद्धि : सर्वरसानां च मनस : सदनं तथा ॥८॥

जीर्णे जीर्यति चाध्मानं भुक्ते स्वास्थ्यमुपैति च ॥

स वातगुल्मह्रद्रोगप्लीहाशङकी च मानव : ॥९॥

चिराद्दु : खं द्रवं शुष्कं तन्वामं शब्दफेनवत्‌ ॥

पुन : पुन : सृजेद्वर्च : कासश्वासार्दितोऽनिलात्‌ ॥१०॥

( वातिक ग्रहणी झाली असता ) रोग्याने खाल्लेले अन्न मोठया कष्टाने पचणे व त्याचा पाक आंबट होणे , शरीर खरखरीत होणे , गळ्यास व तोंडास कोरख पडणे , तहान व भूक लागणे अंधेरी , वारंवार कानांत शब्द होणे , बरगडया , मांडया , जांगाड आणि मान यांच्या ठायी दुखणे व गुदद्वार व तोंड यांच्या वाटे कच्चे अन्न पडणे , छातीत दुखणे , व गुदद्वाराचे ठिकाणी कातरल्यासारखे वाटणे , अंग वाळणे , व शक्ति जाणे तोंडास चव नसणे , सर्व रस खाण्याचीम इच्छा होणे , अन्न जिरले अथवा जिरत असता पोट फुगणे व काही खाल्ले असता समाधान वाटणे , मोठया कष्टाने व फार वेळाने शौचास लागून त्यावेळी कधी पातळ व कधी कोरडा , थोडा आम व शद्वयुक्त व फेसयुक्त असलेला असा मळ पडणे , मनास ग्लानि येणे , व वातगुल्म , प्लीहा , ह्रद्रोग हे आपणास झाल्याची शंका येणे , वायूच्या प्रकोपामुळे खोकला व श्वास हे उत्पन्न होणे असे अनेक विकार रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .

पित्तग्रहर्णाचीं कारणें व लक्षणें .

कटवजीर्णविदाह्यम्लक्षाराद्यै : पित्तमुल्वणम्‌ ॥

आप्लावयद्धन्त्यनलं जलं तप्तमिवानलम्‌ ॥११॥

सोऽजीर्णं नीलपीताभं पीताभ : सार्यते द्रवम्‌ ॥

सधूमोद्नारह्रत्कण्ठदाहारुचितृडर्दित : ॥१२॥

अत्यंत तिखट , न शिजलेले , जळजळ करणारे , आंबट , तेलकट , खारट असे पदार्थ खाल्लयामुळे वाढलेले पित्त :--- जसे तपलेले पाणी अग्नि वि‍सबते तसे :--- जठराग्नीला विसवून टाकते . त्यामुळे शरीराचा रंग पिवळा पातळ , कच्चा व निळयापिवळया रंगाचा असा मळ विसर्जन्‌ करतो , करपट ढेकर येतात , छातीत व गळयात जळजळ होते , अरुचि व तहानेने त्याचा ज्जीव व्याकुळ होतो .

कफग्रहणीचीं कारणें व लक्षणें .

गुर्वतिस्निग्धशीतादिभोजनादतिभोजनात्‌ ॥

भुक्तमात्रस्य च स्वप्नाद्धन्त्याग्निं कुपित : कफ : ॥१३॥

तस्यान्नं पच्यते दु : खं ह्रल्लासच्छर्द्यरोचका : ॥

आरयोपदेहमाधुर्यकासष्ठीवनपीनसा : ॥१४॥

ह्रदयं मन्यते स्त्यानमुदरं स्तिमितं गुरु ॥

दुष्टो मधुर उद्नर : सदनं स्नीष्वहर्षणम्‌ ॥१५॥

भिन्नामश्लेप्यसंसृष्टगुरुवर्च : प्रवर्तनम्‌ ॥

आकृशरयापि दौर्वल्यमालरयं च कफात्मके ॥१६॥

जड , अतिस्निग्ध व थंड इ० पदार्थ खाल्लामुळे , अतिशय जेवल्यामुळे व जेवताक्षणी झोंप घेतल्यामुळे वाढलेला कफ जठराग्नीचा नाश करतो . त्याच्या योगाने रोग्यास अन्न कष्टाने पचते , उम्हासे , ओकारी व अरुचि ह्या उत्पन्न होतात . तोंड कफाने सारवल्यासारखे व गोड होते . तसेच खोकला व कफाचा बेडका पडणे , पडसे येणे , पोठ ताठणे व जड होणे , ह्रदय दाटल्यासरखे वाटणे , अग्निमांद्य होणे , विकृत व मधुर ढेकर येणे , ग्लनि , स्त्रीसंभोगाची इच्छा नसणे , आळस येणे , अंग कृश न होता शक्तितहीन होणे आणि कुटीर आमकफमिश्रित , जड व पातळ असा मळ पडणे ही लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात .

त्रिदोषजन्य ग्रहणीचीं लक्षणें .

पृथग्वातादिनिर्दिष्टहंतुलिङगसमागमे ॥

त्रिदोषं लक्षयेदेवं तेपां वक्ष्यामि भेषजम्‌ ॥१७॥

वात , पित्त व कफ या दोषांमुळे उत्पन्न होणार्‍या ग्रहणीची जी पृथक लक्षणे सांगितली आहेत ती एकत्र झालेली द्दष्टीस पडली म्हणजे त्रिदोषजन्य ग्रहणी रोग झाला म्हणून समजावे . ( वरील श्लेकात तेषां वक्ष्यामि भेषजम्‌ हे केवळ श्लोकपाद पूरणार्थ लिहिलेले आहे .)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:30.1930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नाकार गोडा बेली, तोणॉं पड्‌ल्या पड्‌ली

  • (गो.) नाकावर ठेवलेला गुळाचा तुकडा तोंडात पडला तर पडला. एखाद्यानें कांहीं देतों म्हटलें पण तें निश्चित मिळेल असा आपणास भरंवसा वाटला नाहीं तर अशा वेळीं म्हणतात. 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.