TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
विषम ज्वर

माधवनिदान - विषम ज्वर

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची व्यापक आयुर्वेदीय व्याख्या आहे.


विषम ज्वर

विषमज्वराची संप्राप्ति .

दोषोऽल्पोऽहितसंभूतो ज्वरोत्सृष्टस्य वा पुन : ॥

धातुमन्यतमं पाप्य करोति विषमज्वरम्‌ ॥१॥

ज्वरानें नुकतेंच ज्या मनुष्याला सोडलें आहे , त्यानें अपथ्य सेवन केलें असतां त्याचा पुन : दोष ; किंवा अ ल्प कारणाने प्रकृपित झालेला दोष ; हे रसरक्तादिधातूंपैकीं कोणत्या तरी एखाद्या धातूप्रत जाऊन विषमज्वर उत्पन्न करतात .

त्याचे प्रकार .

सन्तत : सततोऽन्येद्युस्तृतीयकचतुर्थकौ ॥

संतत , सतत , अन्येद्यु : ( रोज एकदा येणारा ), तृतीयक ( एक दिवसांआड येणारा आणि चतुर्थक ( दोन दिवसाआड येणारा ) असे विषमज्वराचे पांच प्रकार आहेत .

सन्ततो रसरक्तस्थ : सोऽन्येद्यु : पिशिताश्रित : ॥२॥

मेदोगतस्तृतीयेऽन्हि अस्थिमज्जगत : पुन : ॥

कुर्याच्चातुर्थिकं घोरमन्तकं रोगसंकरम्‌ ॥३॥

रसस्थ दोष संतत ज्वर उत्पन्न करतो आणि रक्तस्थ दोष सतत ज्वर उत्पन्न करतो . ( वरील श्लोकांत सतत शब्द सतत आणि संतत या दोन्ही शब्दांबद्दल समजावा : व ते दोन्ही शब्दहि येथें सततपणा या अर्थीं न समजता केवळ संज्ञावाचक समजावे .) दोष मांसमिश्रित झाला म्हणजे अन्येद्युष्क ज्वर उत्पन्न करतो . मेदोगत झाला म्हणजे तृतीयक ज्वर उत्पन्न करतो . ( यालाच तिजारे म्हणतात .) आणि त्यानें अस्थि व मज्जा यांचा आश्रय केला म्हणजे तो भयंकर , मृत्युकारक आणि अनेक रोगमिश्रित असा चतुर्थक ज्वर उत्पन्न करितो .

संततादिक ज्वरांची लक्षणें .

सप्ताहं वा दशाहं वा द्वादशाहमथापि वा ॥

सन्तत्या योऽविसर्गी स्यात्‌ सतत : स निगद्यते ॥४॥

अहोरात्रे सततको द्वौ कालावनुवर्तते ॥

अन्येद्युष्कस्त्वहोरात्रमेककालं प्रवर्तते ॥५॥

तृतीयकस्तृतीयेऽन्हि चतुर्थेऽन्हि चतुर्थक : ॥

केचिद्‌भूताभिषङ्गोत्थं वदन्ति विषमज्वरम्‌ ॥६॥

संतत ज्वर सात , दहा किंवा बारा दिवसपर्यंत एकसारखा राहतो ; आणि सतत ज्वर अहोरात्रीतून दोन वेळां येतो . अन्येद्युष्क ज्वर अहोरात्रीतून एक वेळां , याप्रमाणें दर दिवशी ; तृतीयक ज्वर एकदा आल्या दिवसापासून क्र माने तिसरे दिवशी आणि चतुर्थक ज्वर तसाच आल्या दिवसापासून क्रमाने चवथे दिवशी येतो ; याप्रमाणें संततादिकाची लक्षणे जाणावी . विषमज्वर हा भूतबाघेपासून उत्पन्न होणारा आहे असेहि कोणी म्हणतात .

दोषांच्या कमीजास्तपणाने तृतीयक चतुर्थकांचे भेद .

कफपित्तात्त्रिकग्राही पृष्ठाद्वातकफात्मक : ॥

वातपित्ताच्छिरोग्राही त्रिविध : स्यात्‌ तृतीयक : ॥७॥

चातुर्थिको दर्शयति प्रभावं द्विविधं ज्वर : ॥

जङ्गघाभ्यां श्लैष्मिक : पूर्वं शिरसोऽनिलसंभव : ॥८॥

दोषांच्या भेदाने तृतीयक ज्वर तीन प्रकारचा असतो . पहिला - कफ पित्ताच्या बळानें माकड हाडाचे ठायी जो वेदना करतो तो ; दूसरा - वातकफात्मक असून पाठीमध्ये वेदना करतो तो ; आणि तिसरा - वातपित्तापासून मस्तकाचे ठायीं वेदना करतो तो ; चातुर्थिकज्वरहि तसाच दोन प्रकारचा आहे . पहिल्या प्रकारांत कफाधिक्य असून तो पोटर्‍यांपासून आरंभ करून मग सर्व शरिरांत भरतो ; आणि दुसर्‍यांत वाताधिक्य असून तो प्रथम डोकें तापवून नंतर सर्वांगभर पसरतो .

विषमज्वराचा भेद .

विषमज्वर एवान्यश्चातुर्थिकविपर्यय : ॥

स मध्ये ज्वरयत्यन्हि आद्यन्ते च विमुञ्चति ॥९॥

चातुर्थिक ज्वराच्या उलट लक्षणाचा एक विषमज्वर आहे , त्यांत दोन दिवस ज्वर आल्यावर मधे एक दिवस ज्वराशिवाय जाऊन पुन : दोन दिवस ज्वर येण्याचा क्रम असतो .

वातबलासक ज्वराची लक्षणें .

नित्यं मन्दज्वरो रूक्ष : शूनकस्तेन सीदति ॥

स्तब्धाङ्ग : श्लेष्मभूयिष्ठो नरो वातबलासकी ॥१०॥

वातबलासक ज्वर हा वात आणि कफ या दोषांपासून उत्पन्न होतो ; व तो ज्या स होतो तो अशक्त होतो . त्याचें अंग ताठते व त्यावर सूज येते , कफ फार असतो आणि शरीर रूक्ष होते .

प्रलेपकज्वराची लक्षणें .

प्रलिम्पन्निव गात्राणि घर्मेण गौरवेण च ॥

मन्दज्वरचिलेपी च सशीत : स्यात्‌प्रलेपक : ॥११॥

प्रलेपकज्वर हा कफपित्तापासून उत्पन्न होतो . त्यात घामामुळे व जडत्वामुळे रोग्याची सर्व गात्रें नेहमी चिकचिकलेली असतात . ज्वराचा वेग मंद असतो . घाम फार असतो आणि त्यास थंडी अतिशय वाजते . ( हा क्षयादि विकाराचा अंगभूत आहे .)

विषमज्वराचे विशेष भेद

विदग्धेऽन्नरसे देहे श्लेष्मपित्ते व्यवस्थिते ॥

तेनार्धं शीतलं देहेचार्धंचोष्णं प्रजायते ॥१२॥

अन्नरस दूषित झाला व शरीरात कफ आणि पित्त ही दोन्ही दूषित होऊन स्थानविशेषी गेली असता कफदोषाने अधें शरीर थंड आणि पित्तदोषानें बाकीचे अर्धे उष्ण होते . ( येथे अधें शरीर म्हटले आहे ते आडवे किंवा उ भे या दोन्ही प्रकारचे समजावे .)

काये दुष्टुं यदा पित्तं श्लेष्मा चान्ते व्यवस्थित : ॥

तेनोष्णत्वं शरीरस्य शीतत्वं हस्तपादयो : ॥१३॥

जेव्हां कोठयांत पित्त दूषित होतें आणि हातापायांतून कफ दूषित झालेला असतो . तेव्हां पहिल्या पित्त दोषामुळे कोठा ऊन राहतो आणि दुसर्‍या कफ दोषामुळे हातपाय गार पडतात .

काये श्लेष्मा यदा दुष्ट : पित्तं चान्ते व्यवस्थितम्‌ ॥

शीतलं तेनगात्राणामुष्णत्वं हस्तपादयो : ॥१४॥

तसेच जेव्हा कोठयात कफ दूषित झाला असतो ; व हातापायात पित्त दूषित होते , तेव्हां शरीराचे इतर भाग थंड राहतात व हातापायांतून उष्णता असते .

शीतपूर्वज्वराचीं लक्षणें .

त्वक्स्थौ श्लेष्मानिलौ शीतमादौ जनयतो ज्वरे ॥

तयो ; प्रशान्तयो : पित्तमन्ते दाहं करोति च ॥१५॥

कफ आणि वायु हे दोश स्वक्स्थ असले ( म्हणसे रसथातूचा आश्रय करून असले ) तर ज्वरात प्रथम थंडी उत्पन्न करतात ; व त्या दोन्ही दोषांचा जोर कमी झाला म्हणजे शेवटी पित्त दाह करते .

दाहपूर्वज्वराचीं लक्षणें .

करोत्यादौ तथा पित्तं त्वक्स्थं दा हमतीच चा ॥

तस्मिन्प्रशान्ते त्वितरौ कुरुत : शीतमन्तत : ॥१६॥

त्याचप्रमाणे पित्तदोष त्वक्स्थ असला ( म्हणजे रसधात्‌चा आश्रय करून असला ) तर प्रथम फार दाह करितो व त्याचा जोर कमी झाला म्हणजे शेवटी वात आणि कफ हे दोन्ही दोष शैत्य उत्पन्न करितात .

द्वावेतौ दाहशीतादिज्वरौ संसर्गजौ स्मृतौ ॥

दाहपूर्वस्तयो : कष्ट : कृच्छ्रसाध्यतमश्च : स : ॥१७॥

वर सांगितलेले दाहपूर्वज्वर हे दोन्ही संसर्गजन्य असतात . ( म्हणजे वात , पित्त व कफ या त्रिदोषांपासून होतात ;) पैकी दाहपूर्वक ज्वर हा दुःख देणारा व अत्यंत कष्टसाध्य असतो आणि शीतपूर्वक ज्वर सुखसाध्य असतो .

सप्तधातुगत ज्वरांचे प्रकार व लक्षणे

रसगत ज्वराचीं लक्षणें .

गुरुता ह्रदयोत्क्लेश : सदनं छर्द्यरोचकौ ॥

रसस्थे तु ज्वरे लिङगं दैन्यं चास्योपजायते ॥१८॥

अंगाला जडपणा येणे , उम्हासे येणे , ग्लानि , भूक नसणें , ओकारी , अरुची , मन उदास होणें आणि हातपाय गळणे ही लक्षणे रसगतज्वराची जाणावी . ( यांत विशेषेकरून रस दूषित असतो .)

रक्तगतज्वराचीं लक्षणें .

रक्तनिष्ठीवनं दाहो मोहश्चर्दनविभ्रमौ ॥

प्रलाप : पिटिका तृष्णा रक्तप्राप्ते ज्वरे नृणाम्‌ ॥१९॥

रक्ताची थुंकी येणे , दाह होणे , मूर्च्छा , ओकारी , चक्कर , बडबड , अंगावर पुटकुळया येणे , आणि तहान हीं लक्षणे रक्तगतज्त्रराची जाणावी . ( यांत मुख्यत्वे करून रक्त दूषित असते .)

मांसगत ज्वराचीं लक्षणें .

पिण्डिकोद्वेष्टनं तृष्णा सृष्टमूत्रपुरीषता ॥

ऊष्मान्तर्दाहविक्षेपौ म्लानि : स्यान्मांसगे ज्वरे ॥२०॥

पोटर्‍या वळणे , तहान , तलखी होणे , हातपाय चाळविणे , अंतर्दाह , मळमूत्राची प्रवृत्ति आणि ग्लानि हीं लक्षणे मांसगतज्वराची जाणावी . ( यांत मुख्यत्वे मांस दूषित होते .)

मेदोगतज्वराचीं लक्षणें .

भृशं स्वेदरतृषा मूर्च्छा प्रलापश्छर्दिरेव च ॥

दौर्गन्ध्यारोचकौ ग्लानिर्मेदस्थे चासहिष्णुता ॥२१॥

अतिशय घाम येणे , तहान लागणे , मूर्च्छा , बडबड , ओकारी , अंगाला घाण येणे , अरुचि , ग्लानि आणि असोशिकपणा ही लक्षणें मेदोगतज्वराची जाणावी . ( यांत मुख्यत्वे भेद दूषित होतो .)

अस्थिगतज्वराचीं लक्षणें .

भेदोऽस्थ्नां कूजनं श्वासो विरेकश्छर्दिरेव च ॥

विक्षेपणं च गात्रातदास्थिगते ज्वरे ॥२२॥

अस्थिगतज्वरांत हाडे फुटल्यासारखी वाटणे , चालतांना सांघे कटकट वाजणे , श्वास , रेच व ओकारी , हातपाय चाळविणे , हीं लक्षणे होतात . ( यांत मुख्यत्वे अस्थि दूषित होतात .

मज्जागतज्वराचीं लक्षणें .

तम : प्रवेशनं हिक्का कास : शैत्यं वमिस्तथा ॥

अन्तर्दाहो महाश्वासो मर्मच्छेदश्च मज्जगे ॥२३॥

अंधेरी येणे , थंडी वाजणे , मर्मस्थानी वेदना होणे , उचकी लागणे , खोकला , ओकारी , अंतर्दाह आणि महाश्वास हीं लक्षणे मज्जागतज्वरांत होतात . ( यांत मुख्यत्वे मज्जा दूषित असते .)

शुक्रगतज्वराचीं लक्षणें .

मरणं प्राप्नुयात्तत्र शुक्रस्थानगते ज्वरे ॥

शेफसस्तब्धत मोक्ष : शुक्रस्य च विशेषत : ॥२४॥

सप्तधातुगत ज्वरांपैकी शुक्रस्थानी ज्वर गेला असता रोग्याचे शिश्न ताठतें आणि त्यातून अतिशय शुक्रस्राव होतो व थोडथोडे रक्तादि धातूहि पडतात . या ज्वरांत रोगी मरण पावतो .

प्राकृत आणि वैकृत ज्वरांची कारणे व लक्षणें

वर्षाशरद्वसन्तेषु वाताद्यै : प्राकृत : क्रमात्‌ ॥

वैकृतोऽन्य : सदु : साध्य : प्राकृतश्चानिलोद्भव : ॥२५॥

वर्षाकाल , शरत्काल आणि वसंतकाल या ऋतूंत वातादि दोषांमुळे क्रमानें जो ज्वर उत्पन्न होतो ( म्हणजे वर्षाकालांत वातामुळे , शरत्कालांत पित्तामुळें आणि वसंतकालांत कफामुळें ज्वर येतो .) तो प्राकृत ज्वर जाणावा याहून भिन्न प्रकारांनीं जो ज्वर येतो ( म्हणजे वर्षाकालीं पित्तामुळे शरत्काली कफामुळें आणि वसंतकालीं वातामुळें ज्वर येतो .) तो वैकृत ज्वर होय . हा असाध्य आहे . तसाच वातदोषापासून उत्पन्न झालेला प्राकृतज्वरहि असाध्य आहे .

प्राकृतज्वरांची उत्पति .

वर्षासु मारूतो दुष्ट : पित्तश्लेष्मान्वितो ज्वरम्‌ ॥

कुर्यात्पित्तं च शरदि तस्य चानुबल : कफ : ॥२६॥

तत्प्रकृत्या विसर्गाच्च तत्र नानशनाद्भयम्‌ ॥

कफो वसन्ते तमपि वातपित्तं भवेदनु ॥२७॥

ग्रीष्मकाळांत सांचलेला वातदोष वर्षाकालीं प्रकोप पावून पित्त आणि कफ यांशी मिश्रित होऊन ज्वर उत्पन्न करितो ; त्याप्रमाणेच वर्षाकाली सांचलेला पित्तदोष शरत्कालीं कुपित होऊन कफाच्या साहाय्यानें ज्वर उत्पन्न करतो . या पित्तजन्य प्राकृतज्वरांत कफ संबंध व विसर्गकाल असल्यामु ळें लं घ नापासून भय नसतें . शिशिर ऋतूंत साचलेला कफहि वसंतकालीं ज्वर उत्पन्न करतो व त्याला वात आणि पित्त यांचे पाठबळ मिळते .

काले यथास्वं सर्वेषां प्रवृत्तिर्वृद्धिरेव वा ॥

निदानोक्तानुपशयो विपरीतोपशायिता ॥२८॥

वातादि दोषांची आपापल्या कालीं प्रवृत्ति किंवा वृद्धि होते ; म्हणजे ऋतूवरून त्या त्या दोषाची वृद्धि समजते , अनुपशय ( रोगाचा चढ ), उपशय ( रोगाचा उतार ) हे जाणण्याचे असे की , ( आहार - विहार वगैरे ) रोगाची कारणें सांगितली ; त्यांच्या सेवनाने अनुपशय होतो ( रोग वाढतो ) आणि त्याच्या उलट प्रकारच्या ( रोगबंधक आहार - विहार वगैरे ) सेवनाने उपशय प्राप्त होतो म्हणजे रोगास उतार पडतो .

अंतर्वेग व बहिर्वेग या ज्वरांचीं लक्षणें .

अन्तर्दाहोऽधिका तृष्णा प्रलाप : श्वसनं भ्रम : ॥

सन्ध्यस्थिशूलमस्वेदो दोषवर्चोविनिग्रह : ॥२९॥

अन्वर्वेगस्य लिङ्गानि ज्वरस्यैतानि लक्षयेत्‌ ॥

सन्तापोऽभ्यधिको बांह्यस्तृंष्णादीनां च मार्दवम्‌ ॥३०॥

बहिर्वेगस्य लिङ्गानि सुखसाध्यत्वमुच्यते ॥

अंतर्दाह होणे , तहान फार लागणे , बडबड , श्वास , चक्कर येणे , सांधे व हाडें दुखणे , घाम न येणे , आणि वायु व मळ यांचा अवरोध हीं लक्षणे अंतर्वेग ज्वराचीं होत . बहि र्वे गज्वरांत बाहय संताप फार असतो आणि तहान वगैरे ( अंतवेंग ज्वराचीं ) लक्षणें थोडथोडी असतात . बहिर्वेगज्वर हा ( त्याच्या लक्षणांवरून ) साध्य ; आणि अंत र्वे गज्वर असाध्य किंवा कष्टसाध्य आहे असे लक्षांत येईल .

आमज्वरार्चां लक्षणें .

लालाप्रसेकह्रल्लासहृदयाशुद्धयरोचका : ॥३१॥

तन्द्रालस्याविपाकास्पवैरस्यं गुरुगात्रता ॥

क्षुन्नाशो बहुमूत्रत्वं स्तब्धता बलवान्‌ ज्वर ॥३२॥

आमज्वरस्य लिङ्गानि न दद्यात्तत्र भेषजम्‌ ॥

भेषजं ह्यामदोषस्य भूयो जनयति ज्वरम्‌ ॥३३॥

शोधनं शमनीयं च करोति विषमज्वरम्‌ ॥

लाळ गळणें , उम्हासे येणे , ऊर दाटणे , तोंडास चव आणि भूक नसणे , अंग जड होणें व ताटणे , अतिशय मूत्र होणे , फार ज्वर असणे , झापड आणि आळस व अपचन हीं लक्षणे आम म्हणजे अपक्व ज्वराची जाणावी , ह्यावर औषध देऊ नये , दिले तर ज्वर वाढतो अपक्व ज्वरावर शोधक किंवा शामक औषध दिले तर तें विषमज्वर उत्पन्न करतें .

पच्यमान ज्वराचीं लक्षणें .

ज्वरवेगोऽधिक : तृष्णा प्रलाप : श्वस नंभ्रम : ॥३४॥

मलप्रवृत्तिरुत्क्लेश : पच्यमानस्य लक्षणम्‌ ॥

ज्वर जोराचा असणे , तहान फार लागणे , ओकारी येणे , मलप्रवृति , श्वास आणि बडबड हीं पच्यमान म्हणजे पक्व होणार्‍या ज्वराची लक्षणे जाणावी .

पक्वज्वरचीं लक्षणें .

क्षुत्क्षामता लघुत्वं च गात्राणां ज्वरमार्दवाम्‌ ॥३५॥

दोषप्रवृत्तिरूत्साहो निरामज्वरलक्षणम्‌ ॥

गात्राचे ठायीं हलकेपणा , ज्वर मंद होणे , भूक लागणे , दोषांची प्रवृत्ति होणे आणि मनाचे ठायीं उत्साह असणे ही पक्वज्वराची लक्षणे जाणावी .

जीर्णज्वराचीं लक्षणें .

त्रिसाताहे व्यतीत्ते तु ज्वरोयस्तनुतां गत : ॥३६॥

प्लीहान्निसादं क्रुरुते स जीर्णज्वर उच्यते ॥

एकवीस दिवस लोटल्यानंतर जो ज्वर अंगात मुरतो तो जीर्ण ज्वर जाणावा . त्यापासून प्लीहा आणि आग्निमांद्य होतें .

गंभरिज्वराचीं लक्षणें .

गम्भीरस्तु ज्वरो ज्ञेयो हास्तर्दाहेन तृष्णया ॥

आनद्धत्वेन चात्यर्थं श्वासकासोद्नमेन च ॥३७॥

ज्यांत अंतर्दाह होणे , तहान लागणे , अ त्यंत पोट फुगणे आणि श्वास व खोकला उत्पन्न होणे हीं लक्षणे असतात तो गंभीरज्वर होय़ .

साध्यज्वराचीं लक्षणें .

बलवत्स्वल्पदोषेषु ज्वर : साध्योऽनुपद्रव : ॥३८॥

अल्प दोषांचा व श्वासादि उपद्रवरहित असा ज्वर सशक्त मनुष्यास झाला तर तो साध्य असतो .

असाध्यज्वराचीं लक्षणें .

हेतुभिर्बहुभिर्जातो बलिभिर्बहुलक्षण : ॥

ज्वर : प्राणान्तकृद्यश्च शीघ्रमिन्द्रयनाशन : ॥३९॥

अनेक प्रबळ कारणांनीं उत्पन्न झालेला व पुष्कळ ( चिकित्सा प्रतिकूल ) लक्षणांनी युक्त असलेला ज्वर रोग्यास मारक होतो ; तो असाध्य समजावा , तसाच जो ज्वर उत्पन्न होतांच एखाद्या इंद्रियाची शक्ति नष्ट करतो ( म्हणजे रोगी आंधळा किंवा बहिरा वगैरे होतो ) तोहि असाध्य समजावा .

ज्वराचीं दुसरीं असाध्य लक्षणें .

ज्वर : क्षीणस्य शूनस्य गम्भीरो दैर्गरात्रिक : ॥

असाध्यो बलवान्‌ यश्च केशसीमन्तकृज्ज्वर : ॥४०॥

आरम्भाद्विषमो यस्य यस्य वा दैर्ध्यरात्रिक : ॥

क्षीणस्य चातिरूक्षस्य गम्भीरॊ हन्ति मानवम्‌ ॥४१॥

विसंज्ञस्ताम्यते यस्तु शेते निपतितोऽपि वा ॥

शीतार्दितोऽन्तरूष्णश्च ज्वरेण म्रियते नर : ॥४२॥

यो हृष्टरोमा रक्ताक्षो ह्रदि सङघातशूलवान ॥

वक्त्रेण चैवोच्छवसिति तं ज्वरो हन्ति मानवम्‌ ॥४३॥

हिक्काश्वासतृषायुक्त मूढं विभ्रान्तलोचनम्‌ ॥

सन्ततोच्छवासिनं क्षीणं नरं क्षपयति ज्वर : ॥४४॥

हतप्रभेन्द्रियं क्षाममरोचकनिपीडितम्‌ ॥

गम्भीरतीक्ष्णवेगार्त्तं ज्वरितं परिवर्जयेत्‌ ॥४५॥

प्रेतै : सह पिबेन्मद्यं स्वप्ने य : कृष्यते शुना ॥

स घोरं ज्वरमासाद्य न जीवेन्न च मुच्यते ॥४६॥

ज्वर : पौर्वाण्हिका यस्य शुष्ककासस्य दारूण : ॥

बलमांसविहीनश्च यथा प्रेतस्तथैव स : ॥४७॥

ज्वरो यस्यापराण्हे तु श्लेष्मा कासश्च दारूण : ॥

बलमांसविहीनश्च यथा प्रेतस्तथैव स : ॥४८॥

सहसा ज्वरसन्तापस्तृष्णा मूर्च्छा बलक्षय : ॥

विश्लेषणं च सन्धीनां मुमू र्षोरूपजायते ॥४९॥

गोसर्गे वदनाद्यस्य स्वेद : प्रच्यवते ध्रुवम्‌ ॥

लेपज्वरोपसृष्टस्य दुर्लभं तस्य जीवितम्‌ ॥५०॥

स्वेदो ललाटे हिमवान्नरस्य शीतार्दितस्यातिसुपिच्छिलस्य ॥

कण्ठस्थितो यस्य न याति वक्षो नूनं यमस्येति गृहं स मर्त्य : ॥५१॥

यस्य स्वेदोतिबहल : पिच्छिलो याति सर्वत : ॥

रोगिण : शीतगात्रस्य तदा मरणमादिशेत्‌ ॥५२॥

वर सांगितलेल्या लक्षणांशिवाय असाध्य ज्वर जाणण्याची दुसरी पुष्कळ लक्षणे आहेत . ती - ज्या ज्वरांत रोगी क्षीण होतो , त्याच्या अंगावर सूज येते तो असाध्य होय . तसाच किंवा अंतर्वेग गंभीर ज्वर आणि दीर्घकाल राहणारा ज्वर असाध्य होय , ज्यामुळे ( रोग्याच्या ) केसांत भांग पडतात असा जोराचा आलेला ज्वरहि असाध्य होतो . आरंभापासून विषमज्वर झालेला किंवा ज्वराने फार पीडलेला , गंभीर ज्वर झालेला , आणि क्षीण व अतिशय रूक्ष झालेला , बेशुद्ध पडलेला , मूर्च्छा पावलेला , सर्वकाल अंथरूणावर पडून राहून उठण्यास असमर्थ झालेला , बाहेरून थंडी वाजत असलेला पण अंतर्यामी दाह चाललेला अशा प्रकारचा रोगी निश्चयाने मरतो . अंगावर रोमांच उभे राहिलेला , डोळे लाल झालेला , ह्रदयांत बाण बसल्यासारखा व शूळ झालेला , आणि केवळ तोंडानेच श्वास टाकीत असलेला रोगी असाध्य होतो . उचकी , श्वास , तहान यांनी व्याकुळ झालेला , मूर्च्छा आलेला आणि डोळे इकडे तिकडे फिरवत असलेला रोगी ज्वराने मरणार म्हणून समजावे . ज्या च्या इंद्रियाचे बळ गेले आहे , शरीर निस्तेज झाले आहे , ज्या स इंद्रियवैकल्य आले आहे , जो क्षीण असून अन्न द्वे ष करणारा आणि गंभीर व तीक्ष्ण ज्वरांनी पीडा पावणारा तो रोगी वैद्याने अवश्य सोडावा . जो स्वप्नांत मेलेल्या माणसाबरोबर मद्य पितो किंवा ( स्वप्नांत ) ज्याला कुत्री ओढतात , त्या रोग्याला ताप भयंकर येतो व तो मारक समजावा . ज्याला सकाळी जोराचा ज्वर येतो , कफरहित खोकला भयंकर असतो आणि ज्याचे बल व मांस नाश पावतात तो रोगी प्रे तच समजावा आणि ज्याला संध्याकाळी जोराचा ज्वर येतो , कफ व खोकला फार असतो आणि बल व मांस नाश पावतात तोही रोगी , प्रेतरूप च जाणावा , अकस्मात आलेल्या ज्वरामुळे दाह होणे , तहान लागणे , मूर्च्छा येणे , बल नाश होणे , आणि सांधे ढिले पडणे या लक्षणांचा रोगी मरणाच्या दारी बसला म्हणून समजावे . ज्याच्या तोंडावरून पहाटेस पुष्कळ घाम निघतो व ज्याच्या घशांत वगैरे कफ व चिकटा सांचतो तो रोगी जगणे कठीण आणि ज्याच्या कपाळावर थंडगार घाम येतो , ज्याला थंडी फार वाजते , ज्याचे अंग चिकट होते आणि ज्याचा श्वासोच्छवास गळयांतल्या गळ्यांत चालतो तो रोगी खात्रीने मरावयाचाच , सदरहूप्रमाणे , सर्व बाजूंनी त्याच्या अंगाला दाट व चिकट घाम येऊन ते गार पडते , तो रोगी घटकेचाच सोबती आहे म्हणून समजावे .

ज्वरांत होणारे उपद्रव .

श्वासो मूर्च्छारुचिस्तृष्णा छर्द्यतीसारविङग्रहा : ॥

हिक्का कासोऽङदाहश्च ज्वरस्योपद्रवा दश ॥५३॥

श्वास , मूर्च्छा बेचवपणा , तहान , ओकारी , अतिसार , मलावरोव , उचकी , खोकला आणि अंगाचा दाह , असे दहा उपद्रव ज्वरांत होतात .

ज्वरमुक्तीचें पूर्वरूप .

दाह : स्वेदो भ्रमस्तृष्णा कम्पो विङभिदसंज्ञता ॥

कूजनं चातिवैगन्ध्यमाकृतिर्ज्वरमोक्षणे ॥५४॥

रोग्याला ज्वर सोडून जाऊ लागला म्हणजे दाह होणे , घाम व चक्कर येणे , तहान लागणे , कंप सुटणे , मळ पातळ होणे , बधिरता अशा प्रकारची लक्षणे त्याचे ठिकाणी उत्पन्न होतात .

ज्वरमुक्तीचीं लक्षणें .

स्वेदो लघुत्वं शिरस : कण्डू पाको मुखस्य च ॥

क्षवथुश्चान्नकाङक्षा च ज्वरमुक्तस्य लक्षणम्‌ ॥५५॥

घाम , अंग हलके होणे , डोक्याला कंड सुटणे , तोंड येणे , शिंका येणे , आणि भूक लागणे , इतकी लक्षणे रोग्याच्या ठायीं उत्पन्न झाली म्हणजे त्याचा ज्वर गेला असे समजावे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:29.7700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

overdominance

  • अतिप्रभाव 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site