मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - जोगवा गीत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


मीठा-पीठाचा जोगवा । आणा गं बायांनो दरबारी ॥
मला बाई जायाचं सोमवारी लोणारच्या बाजारी ।
लोणारच्या बाजरी जाईन बेल फुलं घेईन ।
महादेवाला वाहिण । परत माघारी येईन ।
मीठा-पीठाचा जोगवा । आणा गं बायांनो दरबारी ॥
मला बाई जायाचं मंगळवारी । तळणीच्या बाजारी ।
तळणीच्या बाजारी जाईन । हिरवं पातळ घेईन ।
मरीमायेस वाहिन । मी परत माघारी येईन ।
मीठा-पीठचा जोगवा । आणा गं बायानो दरबारी ।
मला बाई जायाचं बुधवारी । दुध्याच्या बाजारी ।
दुध्याच्या बाजारी जाईन । हिरवा चुडा भरीन ।
मरीमायेस हात जोडीन । मी परत माघारी येईन ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP