मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - पिंगा गीते

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


.मह्या पिंग्यानं खाल्ला हरबरा । झाला घायबरा ।
मह्या पिग्यानं खाल्लं पीठ । काढा दिठ ।
मह्या पिंग्यानं खाल्लं मसुर । झाला निसुर ।
मह्या पिंग्याले झाली नजर । उतरा पदर ।

आड बाई आड सुपारीचं झाड ।
सुपारीले आल्या शेंगा, घाल गं पोरी पिंगा ।
एकीचा का दोघींचा मामाजीच्या लेकीचा ।
मामाची लेक गोरी, हळद लावा थोडी ।

दोन पिंपळ शेजारी, शेजारी ।
एक पिंपळ तलवारी, तलवारी
तलवार्‍याले सांगून द्या. सांगून द्या ।
आमचा खेळ मांडून द्या, मांडून द्या ।
आमच्या खेळाले साखळ्या, साखळया ।
साखळया देवू वाण्याले. वाण्याले ।
वाण्या वाण्या कुंकू दे, कुंकू दे । कुंकू देवू गाईले ।
गाय गाय दुध दे, दुध दे । दुध देऊ चाँदाले, चाँदाले ।
चाँदा चाँदा घोडा दे, घोडा दे । घोडा देवू बापाले, बापाले ।
बापा बापा लुगडे दे, लुगडे दे । लुगडे देवू मायले, मायले ।
माय माय चोळी दे, चोळी दे । चोळी देवू बहिणीले, बहिणीले ।
बहिणी बहिणी पिवशा दे, पिवशा दे । पिवशा देवू नंदले, नंदले ।
नणंद बाई एकली, एकली । पान खाऊ शिकली. शिकली ।
तांबुळ दादाले इकली, इकली । तांबुळ दादा नकटा, नकटा ।
शेंडी धरून उपटा, उपटा । शेंडीला आल्या शेंगा, शेंगा ।
घालं गं पोरी पिंगा, पिंगा । एकीचा का दोघींचा ।
मामाजीच्या लेकीचा, लेकीचा । मामाची लेक गोरी, गोरी ।
हळद लावा थोडी, थोडी । हळदीच्या उंडयावर पाय कसा देवू ।
मामाजीच्या लेकीचं नाव कसं घेवू, बाई नांव कसं घेवू ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP