द्वादश स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । व्यासम्हणेनृपति । वर्णिलेंभागवततुजप्रती । अंबामखकीजेप्रीती । मंत्रघेईसर्वोत्तम ॥१॥

सूतम्हणेऋषीशी । ऐकतांलागेचरणाशी । जनमेजयतोअतिप्रेमेंशी । प्रार्थूनव्यासाघेईंमनू ॥२॥

करुनिमंडपसुंदर । धौम्यादिआणिलेभुसुर । मेळवूनीयज्ञसंभार । देवीमखनृपेंकेला ॥३॥

होमपूजातर्पण । केलेंब्राम्हणभोजन । कुमारिकासुवासिनीभोजन । वायनवस्त्रेंभूषणें ॥४॥

देउनीदक्षिणादान । तोषविलेतेणेंब्राम्हण । चित्तशाठ्यनिरसून । यशोधनमेळविलें ॥५॥

यज्ञसमाप्तकरुनी । बैसलेजोस्वस्थमनी । तोपातलेनारदमुनी । वाजवीतमहतीते ॥६॥

नारदासीपाहून । सर्वींकेलेंअभ्युथ्थान । नृपेंचरणवंदून । अर्ध्यपाद्येंपूजिलें ॥७॥

बैस उनीसुखासनीं । उभाठाकेकरजोडुनी । म्हणेस्वामीकोठुनी । येणेंजाहलेंअलभ्य ॥८॥

नारदम्हणेभूती । गेलोहोतोंअमरावती । तेथेंदेखिलीनवलगती । सांगायातुजपातलो ॥९॥

तवपितांहोतादुर्गती । होतांचितवयज्ञसमाप्ती । गेलाआतांश्रीपुरांप्रती । विमानारुढपाहिला ॥१०॥

एवंचमत्कारपहातां । मनांवाटलीधन्यता । हीचपुत्राचीपुत्रता । देवगातींतवयश ॥११॥

ऐकतांचिनृपेंवचन । व्यासाचेवंदिलेचरण । म्हणेस्वामीकेलेंधन्य । सदगदरावजाहला ॥१२॥

नृपाआशिर्वाददेऊन । नारदादिऋषिगण । गेलेसर्वस्वस्थाना । सुखेंनृपराज्यकरी ॥१३॥

अर्धश्लोकजेभागवत । शतकोटीब्रम्हारचित । व्यासेंकेलेंसंक्षिप्त । अष्टादशसहस्रहें ॥१४॥

याचेंकरितांलेखन । अथवापठणश्रवण । वेदतुल्यहेंपुराण । अनंतफलहोतसे ॥१५॥

लिहूनहेंभागवत । सुवर्णसिंहसहीत । ब्राम्हणासीदानकरीत । भाद्रपदपौर्णिमेसी ॥१६॥

भूदानाचेफल । तयालाभेसकळ । पौराणिकासितेवेळ । यथाविधीपुजावें ॥१७॥

दक्षणावस्त्रभूषण । कपिलाकरावीदान । तयाचाकरितांमान । प्रसन्नहोय अंबिका ॥१८॥

जेंजेंअसेंइच्छित । येणेंसर्वहोयप्राप्त । कामधेनूहेंभागवत । कायवर्णूएक्यामुखें ॥१९॥

सच्चिदानंदरुपिणी । गायत्रीजीमंत्रखाणी । नमस्कारुंतिजलागूनी । जीप्रेरकबुद्धीची ॥२०॥

एवंऐकतांवचन । ऋषीआनंदितहोऊन । करितीसूताचेंपूजन । अतिआदरेप्रीतीनें ॥२१॥

पुराणश्रवणेंशौनकादिकां । सुखझालेंचिदात्मिका । आर्शीवादूनिसूतदेखा । गेलातेथुनस्वगृहीं ॥२२॥

तेंचियेथेंप्राकृत । अंबाबोलिलीभावार्थ । एकसष्टश्लोकभागवत । संपूर्णयेथेंजाहलें ॥२३॥

अध्यायपुढेंदोन । होतीलजेव्हांकथन । देवीविजयतेव्हांपूर्ण । होईलतोहीअंबाकृपें ॥२४॥

श्रीदेवीविजयेद्वादशेसप्तमः ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP