दशम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । वैवस्वताचेसुत । सहाअसतीभाग्यवंत । करुषपृषध्रनाभागदिष्ट । शर्यातिआणित्रिशंकू ॥१॥

जाऊनकालिंदितीरीं । तपकेलेंनिराहारी । बारावर्षेंहोतांपुरी । प्रत्यक्षभेटेजगदंबा ॥२॥

राजपुत्रकरितीनमन । प्रेमभरेंकेलेंस्तवन । अनंन्यभावेंझालेंशरण । साहीजणचरणासीं ॥३॥

महेश्वरीकरुणालये । जयेशानीवारभवप्रिये । वाणीमयेमायामये । कामराज्ञीप्रीतिदे ॥४॥

कामराजाप्रियेकांते । महामायेआनंदभरिते । ईशतोषेंमनोलषिते । महासांम्राज्यदायिनी ॥५॥

हरिहरविधिरुपिणी । नमोअर्कस्वरुपिणी । नमस्कारलक्षचरणी । सदाअसोभ्रामरी ॥६॥

स्तोत्रेंझालीप्रसन्न । सहाजणासीवरदान । तुम्हींसर्वक्रमेकरुन । मन्वंतरेनृपव्हाल ॥७॥

एवंवरदेऊन । भ्राभरीझालीअंतर्धान । तेहीस्वराज्येभोगून । मनुझालेअन्यजन्मी ॥८॥

सावर्णीपदसर्वांशी । क्रमेपावतीमन्वंतराशी । दक्षमेरुसूर्यनामेशी । चंद्ररुद्र आणिविष्णु ॥९॥

भ्रामरीचेंचरित्र । नारदपुसेपवित्र । मुनीपाहुनभक्तिपात्र । नारायणसांगतसे ॥१०॥

अरुणनामेंमहासुर । तपलातपदुस्तर । गायत्रीजपेनिरंतर । अयुतवर्षेंगंगातीरी ॥११॥

तपयोगेंदेहांतून । ज्वालानिघतीदारुण । देवझालेभयोद्विग्न । प्रसन्नझालातयांब्रम्हा ॥१२॥

स्त्रीपुरुषशस्त्रेंकरुन । द्विपदचतुष्पदपदशून्य । यापासूननसोमरण । ऐसेंतेणेंमागीतलें ॥१३॥

तयादेऊन इच्छित । ब्रम्हाआलागृहांप्रत । अस्रुरझालाउन्मत्त । इंद्रपदघेतलें ॥१४॥

राज्यकेलेंबहुवत्सर । तेणेंबहुपीडिलेसुर । जेथेंहोतेहरिहर । शरणतेथेंपातले ॥१५॥

सांगतीजोंसर्ववृत्त । आकाशवाणीबोलत । शरणजावेअंबेप्रत । दुःखनाशकरीलती ॥१६॥

ऐकतांचीऐसीवाणी । गुरुसीम्हणतीप्रार्थुनी । तुम्हींजाऊनदैत्यसदनी । गायत्रीयागकरावावा ॥१७॥

आम्हींकरितोआराधन । देवीकरीलदुःखशमन । गुरुसीएवंबोलून । देवगेलेंजांबुनदी ॥१८॥

तेथेंजांबुनदेश्वरी । आराधिलीसर्वस्रुरी । गुरुगेलादैत्याघरीं । दैत्येश्वरतयापुसे ॥१९॥

किमर्थकेलेंआगमन । तुमचापक्षनसेजाण । विरुद्धपक्ष असून । केवींआलादेवगुरो ॥२०॥

वाणीशबोलेतयाशी । विरुद्धपक्षकेवींम्हणशी । आम्हींभजतोज्यादेवाशी । तिशींचभजसीदैत्येंद्रा ॥२१॥

ऐकतांचिऐसेंवचन । मोहितझालामायेन । म्हणेदेवताआजपासोन । सोडिलीजाणगायत्री ॥२२॥

बृहस्पतीआलापरतोन । गायत्रीत्यागेंतेजहीन । असुरझालादिनोदिन । गुरुकळवीइंद्रासी ॥२३॥

देवसर्व आनंदले । देवीसीघ्यातीभावबळें । बहुतदिवसांएकवेळें । प्रगटझालीपरांबा ॥२४॥

कोटिसूर्याचीदीप्ती । कोटिकामलावण्यवती । चित्रविचित्रमाल्यजाती । वस्त्रचंदनभूषणें ॥२५॥

वर अभय आणिभ्रमर । शांतशोभतीचारीकर । अनेककोटिभ्रमर । गुंजारवकरिताती ॥२६॥

भ्रमर असतीतिचेकरी । नामतेणेंभ्रामरी । पाहतांचिसर्व अमरी । नमस्कारकरतीते ॥२७॥

देवकरितीस्तवन । नमोदेवीविद्याघन । सृष्ठिस्थित्यंतकारण । कमलाक्षीनमोस्तु ॥२८॥

विश्वतैजसप्राज्ञ । विराटसूत्रमहाकारण । कुटस्थ आणिविकारहीन । सर्वांधाररुपतुझें ॥२९॥

दुष्टरोधकरेदुर्गे । निरर्गलप्रेमभर्गे । कालिकेबिंदुविसर्गे । अजेअव्ययेनमोस्तु ॥३०॥

नीलसरस्वतीउग्रतारे । महाबगलेपीतांबरे । त्रिपुरसुंदरीरक्तांबरे । मातंगीतुजनमोस्तु ॥३१॥

भैरवीतूंधुमावती । छिन्नमस्तेमहाज्योती । क्षीरोदकन्येपद्मावती । शाकंभरीनमोस्तु ॥३२॥

रक्तदंष्ट्रेशुंभदलनी । निशुंभरक्तबीजनाशिनी । धुम्रलोचनभुस्मकारिणी । सैन्यहारिणीनमोस्तु ॥३३॥

नमोवृत्रविमर्दिनी । चंडमुंडरुधिरशोषिणी । नमोमहिषघातिनी । देववरदेनमोस्तु ॥३४॥

विजयेगंगेफुल्लानने । शारदेपृथ्वीदयाघने । तेजरुपेमहाप्राणे । भूतरुपेनमोस्तु ॥३५॥

विश्वमूर्तीदयामुर्ती । धर्ममूर्तीदेवमूर्ती । ज्योतिमूर्तीज्ञानमूर्ती । गायत्रीवरदेनमोस्तु ॥३६॥

सावित्रीतूंसरस्वती । स्वाहास्वधातुजम्हणती । दक्षिणाषष्टांमनसासती । मंगलेसुरभीनमोस्तु ॥३७॥

नेतिनेतिवेदम्हणती । तेहीतुजनजाणती । प्रयग्रूपाविश्वमूर्ती । भजूंआम्हींपरदेवता ॥३८॥

भ्रमरेंवेष्टीलेंचौफेरी । नमस्कारतुजभ्रामरी । पुढेंमागेंखालेवरी । नमस्कारतुजसर्वत्र ॥३९॥

आम्हांवरीकृपाकरी । अरुणदैत्यसंहारी । मणिद्विपवासलौकरी । अनंतांडनायकातूं ॥४०॥

जगन्मातेपरात्परे । भुवनेसीजयजयकारे । सर्वोत्तमेगुणाकारे । जगतोरणेप्रसीद ॥४१॥

एवंतेस्तवनमधुर । ऐकतांचिसोडीभ्रमर । भक्षिलेंत्यांहींसर्व असुर । अरुणासहक्षणार्धे ॥४२॥

ठाईंचेठाईंचराहिलें । शस्त्रादिकांहींनचले । एकमेकांजेवर्तलें । सांगतांहीनयेची ॥४३॥

जैसेंस्पर्शतांमोहाळ । मक्षिकाडसतीउतावेळ । ठाईंचमरणकेवळ । झालेंतेवीराक्षसां ॥४४॥

भक्षुनीदैत्यांसींभ्रमर । आलेदेवीसभोवार । आश्चर्यझालेंथोर । जगतांमाजीत्याकाळीं ॥४५॥

झालावाद्यांचागजर । पुष्पेंवर्षतीअपार । देवकरितींजयजयकार । देवांगनानाचती ॥४६॥

गंधर्वकरितीगायन । मुनीकरितींवेदपठन । सर्वांसींदेऊनवरदान । गुप्तझालीभ्रामरी ॥४७॥

हेंभ्रामरीचेआख्यान । मन्वंतरांचेंकथन । जोकरीश्रवणपठण । देवीकृपात्यावरी ॥४८॥

सत्तावीसश्लोकशत । भ्रामरीचेंदिव्यचरित । दशमस्कंदसमाप्त । झालायेथेंजाणिजें ॥४९॥

श्रीदेवीविजयेदशमेचतुर्थोंध्यायः समाप्तः ॥४॥

इति श्रीदेवीविजये दशम स्कंदः समाप्तः ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP