सप्तम स्कंध - अध्याय पांचवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । एकदांतोराजकुमारन । प्रार्थीब्राम्हणासादर । म्हणेदशांशहवनप्रकार । करवामाझेंजपाचा ॥१॥

विप्रम्हणतीतूंचांडाळ । पिशाचपातकीखळ । कैंचाहोमकैंचेंफळ । जाययेथुनीमाघारा ॥२॥

ऐकतांच ऐशीवाणी । तोस्वयेंधिक्कारमानी । जन्मांतरांकंटाळुनी । चितारचलीमराया ॥३॥

पेटऊनीचितेस । प्रार्थिलीतेणेंअंबेस । उद्धरीमायेखळास । दाखवीपाय आपुले ॥४॥

एवंप्रार्थनाकरुनी । उडीटाकावीजोंदहनीं । तोंप्रगटलीजगज्जननी । सिंहारुढातयापुढें ॥५॥

म्हणेबाळासकुमारा । प्राणकांदेशीउदारा । ममकृपेंतवपापाचारा । नाशिलेजाणयेवेळीं ॥६॥

स्वस्थहोयतूंआतां । ममकृपेनेंतवपिता । सत्कारुनिनेईलत्वरिता । पर्वास्थापीलस्वपदी ॥७॥

व्यासम्हणेनृपती । वात्सल्ययाहूनीकिती । असावेंसांग अंबेप्रती । अनुपंम्यदयार्णवा ॥८॥

गुरुद्रोहीमहाजार । विप्रपत्नीअपहार । गोवधसर्वदुराचार । परीरक्षिलाजियेनें ॥९॥

ऐसेंहेंप्रियदैवत । जेदुष्टनाहींस्मरत । त्याहूनयात्रिजगांत । अधमकोणीअसेकी ॥१०॥

असोएवंआश्वासून । स्वयेंजाहलीअंतर्धान । सत्यव्रतसंतोषोन । निवृत्तझालाप्राणघातीं ॥११॥

हेंसमग्रवृत्तनृपानारदसांगत । ऐकतांचिनृपेंत्वरित । मंत्रिधाडिलेआणाया ॥१२॥

देवीकृपाजैंजाहली । तेव्हांचकांतिपालटली । पिशाच्चतासर्वगेली । प्राप्तजाहलीदेवकळा ॥१३॥

मंत्रिवरेंसन्मानून । नेलानृपाचानंदन । रायेंदिलेंआलिंगन । प्रेमाश्रूनेंभिजविलें ॥१४॥

जवळीतयाबैसऊन । रावबोलेमधुरवचन । नीतिसांगेनीतिमान । पुत्रस्नेहेंपुत्रासी ॥१५॥

पुत्राधर्ममतीकीजे । ब्राम्हणासदामानिजे । न्यायेधनसंपादिजे । सदारक्षीप्रजेसी ॥१६॥

नबोलेंअनृतवचन । अमार्गेंनकरीगमन । करावेंशिष्टवचन । तपस्व्यासीपुजावे ॥१७॥

चोरासीसदामारावे । इंद्रियगणाजिंकावे । मंत्र्यासहबैसावे । मसलतीसएकांती ॥१८॥

शत्रूजरीअसेसान । नोपेक्षावाकदांजाण । नाशकरावाप्रयत्नान । रिपूचासदाराजवर्गी ॥१९॥

दुजेंठाईंमनठेवित । पाहूनिआपणानमित । ऐसासचीवकरीघात । परीक्षूंनिटाकावा ॥२०॥

हेरसर्वत्र असावे । मित्रशत्रूपरीक्षावे । दानबहुत आचरावे । कृपणपणानसावा ॥२१॥

नकरावाशुष्कवाद । दुष्टसंगेकीजेखेद । शत्रुसैन्याकीजेभेद । मदसर्वथानसावा ॥२२॥

करावेसदायजन । महर्षींचेपूजन । स्त्रीअथवास्त्रैण । द्यूतरतनरजेका ॥२३॥

विश्वासतयाचानकीजे । मृगयाबहूनाचारिजे । द्यूतमद्यनसेविजे । गायनींनसावेंस्वयेंलुब्ध ॥२४॥

नभोगाव्याकुलटा । आपणनजावेंकुवाटा । प्रजाहीकदांआडवाटा । जाऊंनद्याव्यानृपानें ॥२५॥

उषःकालींजागुन । होऊनीव्हावेंसुस्नात । कर्मसर्वविधियुक्त । अनालस्येंआचरावे ॥२६॥

करावेअंबपूजन । पादतीर्थीचेंसेवन । भावेंकरितांजन्ममरण । दूरकरीमातुश्री ॥२७॥

जेंजेंदिसेंनयनीं । सर्वरुपेंतीचिजननी । तीच असेसाक्षिरुपिणी । पहाणारीसर्वतीच ॥२८॥

एवंजाणोनिदृष्टीं । निर्भय असावेंसृष्टी । कीजेसदाधर्मगोष्टी । नित्यविधीनसोडावा ॥२९॥

धर्मशास्त्राचानिर्णय । पुसूनिब्राम्हणानिर्भय । सुपात्रींचसर्वदेय । गोभूस्वर्णरत्नादि ॥३०॥

मूर्खजरीब्राम्हण । नकरावेंकदांपूजन । विशेषतयापोटाहून । कदांमूर्खानद्यावें ॥३१॥

लोभेंधर्म उल्लंघन । नकीजेविप्रावमान । भूमिवरीदेवजाण । ब्राम्हणहेचितेजस्वी ॥३२॥

अग्नीजलाचेकारण । क्षत्रियाचातेवींब्राम्हण । लोहालागींपाषाण । तेजसर्वत्रव्याप्तसें ॥३३॥

जेंज्याचेकारण । तेंतयानबाधीजाण । जलस्पर्शेंजेंवींदहन । शमनहोयस्वयेंची ॥३४॥

परीहोतापात्रांतर । दहनजाळींजेवींनीर । अपराधहेचपात्रांतर । दहनहोयक्षेत्रहें ॥३५॥

चुंबुकीलोहाकर्षण । तेवींक्षत्रियाब्राम्हण । इतःपरतूंअवमान । करुंनकोविप्रांचा ॥३६॥

एवंतयासंबोधून । वसिष्ठाचेंमतघेऊन । सत्यव्रतापदींस्थापून । अरुणगेलावनासी ॥३७॥

तेणेंदेवीआराधिली । सायुज्यतासंपादिली । नीतिमार्गेंसरळचाली । राज्यकरीसत्यव्रत ॥३८॥

तयासिहरिश्चंद्रपुत्र । जहलातोपरमपवित्र । युवराज्यींस्थापूनिपुत्र । सुखींजाहलात्रिशंकू ॥३९॥

स्वदेहेचीसर्वभोग । प्राप्त असावामजस्वर्ग । गुरुसिम्हणेयज्ञसांग । तादृशकरवीवसिष्ठा ॥४०॥

वसिष्ठम्हणेंयादेहीं । स्वर्गभोगशक्यनाहीं । यज्ञकरुनीयादेही । देहांतिस्वर्गलाभेल ॥४१॥

ऐकतांच ऐसेंवचन । पितृवाक्यातेंविसरुन । पूर्ववैरातेस्मरुन । निष्टुरबोलेगुरुसी ॥४२॥

क्रोधधरिलामानसीं । तेणेंमजनयाजिसी । आणूनिअन्यब्राम्हणासी । यज्ञकरीनसाक्षेपें ॥४३॥

सूतम्हणेहोमुनी । वसिष्ठकोपेंऐकुनी । म्हणेअधमापापखाणी । अवमानिसीमजदुष्ठा ॥४४॥

आतांचिघेकर्मफळ । होममशापेंचांडाळ । याचिदेहींउतावेळ । वरुररुप असोतुझें ॥४५॥

तीनशंकूतवप्रृष्टी । पूर्ववत असोतदृष्टी । पाहोतुजसर्वसृष्टी । चांडाळत्वेंआतांची ॥४६॥

विप्रस्त्रीचेंहरण । केलेंतुवांगोहनन । स्वर्गगतीचेंकृंतन । धर्मनाशकेलाशी ॥४७॥

तूंझालासीउन्मत्त । सहजविप्राअवमानित । याचदेहींस्वर्गत । भोग इच्छिशीदुरात्म्या ॥४८॥

पिचुमंदीकिडाजैसी । साखर इच्छीतूंतैसा । हातींधरुनिवायसा । देहशुद्धमानिशी ॥४९॥

नित्यकरिशीमहोत्पात । म्हणसीमज आहेव्रत । करदेऊनीसर्पमुखांत । क्षेमवांच्छिशीदुर्बुद्धे ॥५०॥

स्वर्गकैंचाकैंचेभोग । तुज आहेनर्कयोग । तुळसीपोटीजेवीभांग । तेवींतूंअरुणनृपा ॥५१॥

एवंक्रोधेंशापिला । तत्काळचांडाळझाला । गौरवर्णपालटला । गजवर्ण अंगझालें ॥५२॥

रत्नमयजींकुंडलें । दगडचिदिसूंलागलें । पीतांबरजेशोभले । नीलवस्त्रेंजाहली ॥५३॥

सुगंधचंदनचर्चिला । विष्ठेपरीतोघाणला । तीनखिळेनितंबाला । ठोकिलेसेभासती ॥५४॥

एवंपाहूनिस्वशरीर । अतिदुःखेंतोनृपवर । सेविलेंतेणेंगंगातीर । सदादुःखितअंतरी ॥५५॥

देवीभक्ताचाअपमान । थोरपापनसेयाहून । चांडाळझालाततक्षण । सूर्यवंशीभूपती ॥५६॥

विप्रसर्वांचिमाता । विप्रसर्वांचापिता । विप्रचीसर्वशास्ता । विप्राकांहींउणेंनसे ॥५७॥

विप्रतेजाचेंभांडार । विप्रदेवाचेघर । विप्रविद्येचेसागर । विप्रपर्वततपाचे ॥५८॥

विप्रकोपाचाअनल । दग्धकरीजगसकल । विप्रतोरुद्रकेवळ । विप्रभयतिघांसही ॥५९॥

विप्रसकळांचाभर्ता । विप्रयज्ञाचाकर्ता । विप्रसर्वांअन्नदाता । विप्रविष्णुप्रत्यक्ष ॥६०॥

विप्रजगताचाकर्ता । वेदज्ञअसेयाकर्ता । विप्रप्रत्यक्षविधाता । नकरावासंशय ॥६१॥

विप्राचेरोमरोमांत । प्रत्यक्षनांदेदैवत । विप्रमुखींग्रासपडत । तृप्तजगहोतसे ॥६२॥

जेंजेंजेणेंइच्छिलें । विप्रप्रसादेंलाभलें । विप्रज्याणीनिंदिले । नर्क अखंडतयासी ॥६३॥

विप्रशांतीचाठेवा । विप्रमुक्तीचाविसावा । विप्रपूज्यतिनिदेवां । वेदवचनयेणेंपरी ॥६४॥

विप्र असोवेदहीन । किंवाअसोकर्महीन । अथवातोअंगहीन । निंदूनयेवंदावा ॥६५॥

विप्रनिंदितांकोपेहरी । विप्रनिंदाक्षमानकरी । भावेंवंदिलाविप्रजरी । सहजतोषतीसर्वदेव ॥६६॥

विप्रेंकोणानदंडिले । विष्णूशीह्रदईंताडिलें । विधीसीअपूज्यकेले । लिंगपाडिलेंशिवाचे ॥६७॥

शक्रकेलासहस्रभग । यमकेलाशूद्र अंग । भगकेलादुर्भग । सर्वभक्ष अग्नीते ॥६८॥

चंद्राशीक्षययुक्तकेले । कुबेरनाकनाशिलें । वायूसीविप्रेंरोधिले । योगबळेंसर्वदा ॥६९॥

समुद्रमुळीचप्राशिला । विंध्याद्रीशीनिजविला । आतापीसीजिरविला । मंत्रबळेंजयानीं ॥७०॥

देव असुरकिंनर । यक्षगंधर्वविद्याधर । अवघेचिहेस्थिरचर । विप्र आज्ञानुल्लंघी ॥७१॥

असोएवंतोसत्यव्रत । विप्रशापेंझालादुःखित । धिग्धिक्म्हणेजीवित । व्यर्थवांचलोंसंसारीं ॥७२॥

हरिश्चंद्रेंतेंऐकिलें । बहुदुःखवाटलें । पित्यासीबोलाउपाठविलें । वृद्धसचिवसवेग ॥७३॥

तेजाऊनिवंदिती । गृहांचलावेम्हणती । युवराजासफारखंती । वाटतसेनृपाळा ॥७४॥

गुरुचेकरुंप्रार्थन । क्षेमकरीलदयेन । सुखनसेपुत्रालागून । पाठविलेंतेणेंआम्हांसी ॥७५॥

रावम्हणेकैचेयेणें । माझीआशाचिटाकणे । पुत्रासीपदींस्थापिणें । ममाज्ञेनेंलवलाही ॥७६॥

पुत्रासीसांगाममवचन । नकीजेविप्रावमान । ममजाणूनिप्रमाण । सावधसर्वदावागावें ॥७७॥

व्यासम्हणेनृपती । एवंदोनीभुपती । बोळविलेमंत्र्यापती । देवीस्तवीनिरंतर ॥७८॥

तेजाऊनपरत । हरिश्चंद्रानिवेदित । पदींतयाशीस्थापित । वसिष्ठाचेअनुमतें ॥७९॥

सिंहावलोकनकीजे । मागीलकथाऐकिजे । तपसंप उनिगाधिजे । अयोध्येसीघरींआला ॥८०॥

भार्येसीतेणेंविचारीले । क्षमसमईंकायकेले । केवींपुत्राशीरक्षिले । दुःखभोगिलेंअत्यंत ॥८१॥

मीहीझालोंदुःखित । क्षुधामजसीव्यापित । अर्धरात्रीचोरवत । चांडाळगृहींमीशिरलो ॥८२॥

पात्रठेविलेंचुलीवरी । श्वामांसपक्कनिर्धारी । भक्षणार्थघेतलेंकरी । भांडशब्दजाहला ॥८३॥

चांडाळझालाजागृत । म्हणेकोणरेपात्रास्पर्शत । मीतयाउत्तरदेत । नवल ऐकप्रियेतूं ॥८४॥

विश्वामित्रमीब्राम्हण । व्याकुळझालोंक्षुधेन । आलोंयेथेंचोरहोऊन । भक्षणार्थयेकाळीं ॥८५॥

आज्ञादेईमांसभक्षणा । करीनस्वदेहरक्षणा । तोम्हणेहोब्राम्हणा । चांडाळगृह असेंहें ॥८६॥

स्पर्शूंनयेस्वपाकाशी । वेद आज्ञाविप्राशी । म्हणूनिसांगतोतुजशी । भक्षूनकोअभक्ष्य ॥८७॥

कुतर्‍याचेंशिजलेंमांस । केवींद्यावेंब्राम्हणास । लोभेंनबोलेवचनास । विप्रजाणूनसांगतों ॥८८॥

पुन्हावदलोंतयाशी । चांडाळासत्यबोलशी । परीनकीजेप्राणघातासी । यावदुपायचालेतो ॥८९॥

प्राणरक्षावेसंकटीं । प्रायश्चित्तपापासाठीं । करावेंदेहशुद्धीसाठीं । एवंशास्त्रमर्यादा ॥९०॥

पडलेंजैंआवर्षण । क्षुधादाटलीदारुण । तेणेंयोगेंमांसभक्षण । प्रसंग आलामजलागी ॥९१॥

जेणेंपादिलाकाळ । तयासितेंपापसकळ । मजकडेलेशतिळ । पातकाचानसेची ॥९२॥

एवंकरितांभाषण । वर्षूंलागलापरजन्य । मगमीमांसटाकून । परत आलोंआश्रमा ॥९३॥

एवंमाझीझालदिशा । तुझीसांगदुर्दशा । मजवीणदुःखावेशा । केवीतुवाकंठिले ॥९४॥

तीम्हणेऐकापती । कायसांगूंविपत्ती । अन्ननसेबाळांप्रती । रडतींमुलेंभुकेनें ॥९५॥

नाधान्यनाधन । भिक्षानघालितीजन । बैसतीकपाटेंलावून । नृपहींनसेतेवेळीं ॥९६॥

सर्वचिमुलेंकष्टतीं । तेव्हांविचारकेलानिश्चिती । क्रयकरुनीएकाप्रती । मुलेंसर्वपाळावी ॥९७॥

ह्याबाळाचेगळांदोरी । बांधूनगेलेंबाजारीं । तवदेखिलेंराजकुमरीं । अभयमजदीधलें ॥९८॥

नित्य आणोनियामांस । बांधितोयावृक्षास । तेणेंयोगेंसर्वमुलास । रक्षणकेलेंस्वामिया ॥९९॥

परीएकदुःख असें । एकेदिवशींपशूनसे । तेणेंमारुनगुरुधेनूस । मांसबांधिलेंवृक्षासी ॥१००॥

वसिष्ठेंतयाशापिलें । चांडाळत्वप्राप्तझालें । नितंबीखिळेटोंचिलें । शापयोगेंतयाच्या ॥१०१॥

त्रिशंकूझालामजकरितां । दुःखभोगीतत्वा । माझेंरक्षणतेणेंकरितां । दुर्दशाझालीतयाची ॥१०२॥

तेंदुःखमज अंतरी । स्वामीहोतेंनिरंतरी । कृपाकीजेमजवरी । दुःखदूरकरावें ॥१०३॥

अवश्यम्हणेमुनिवर । आलाजेथेंनृपवर । पाहतांचिवंदिलेसत्वर । सत्यव्रतेंतेधवा ॥१०४॥

ऋषिम्हणेसत्यव्रता । दूःखझालेंमजकरितां । प्रियजेंअसेल आतां । मागमजदेईन ॥१०५॥

तोम्हणेजीमहामुनी । प्रसन्नजेंमजलागुनी । याचदेहीइंद्रभुवनी । सुख अक्षयदेईजे ॥१०६॥

अवश्यम्हणेगाधिज । यज्ञार्थबोलवीद्विज । परीनयेचिविप्रसमाज । निवारिलेवसिष्ठें ॥१०७॥

कोपलातोतपोबळी । साठसहस्रवर्षेंसेविली । गायत्रीपुण्यसकळीं । त्रिशंकूसीसमर्पिलें ॥१०८॥

नृपाममपुण्यबळें । जायस्वर्गांयेवेळें । भोगींसुख आगळे । इंद्रसमसर्वदा ॥१०९॥

वदतांचिऐसीवाणी । नृपचाललाइंद्रभुवनीं । जेवींखग उडेगगनी । पुण्ययोगेंजातसे ॥११०॥

देवतयासीपाहती । क्रूररुपतोभूपती । हटकिलातेव्हांमघवती । योग्यनससीस्वर्गाम्हणे ॥१११॥

वदतांचिपडूंलागला । नृपतेव्हांआक्रोशला । पडतोंऋषेतपोबळा । इंद्रेंमजवर्जिलें ॥११२॥

ऐकतांचिऐसीगोष्ट । ऋषीम्हणेतिष्ठतिष्ठ । वाक्यबळेंनृपश्रेष्ठ । अंतराळींस्थिरावला ॥११३॥

विश्वामित्रकरीइष्टी । करीनम्हणेअन्यसृष्टी । इंद्रेंपाहूनितीगोष्टी । अलाजवळीऋषीच्या ॥११४॥

म्हणेकाय आरंभिलें । मजकान आज्ञापिले । दुराग्रहपाहूनीतेवेळें । नेलास्वर्गीत्रिशंकू ॥११५॥

करुनियादिव्यरुप । द्वारींस्थापिलातोभूप । अद्यापिसर्वांउडुरुप । शेडेंनक्षत्रतोचिहा ॥११६॥

व्यासम्हणेनृपती । उपकारफळलातयाप्रती । स्मरतहोताअंबेप्रती । दुःखनाशजाहला ॥११७॥

हरिश्चंद्रेंऐकिलें । परममनसंतोषलें । नीतियुक्तराज्यकेलें । पुत्रनसेतयाशी ॥११८॥

वसिष्ठाचेमतेंकरुन । आराधिलानृपेंवरुण । पुत्रचपशूकरुन । पुत्रहोतायाजिनमी ॥११९॥

एवंघेतलेंवरदान । पुत्रझालासुलक्षण । यज्ञकरीम्हणेवरुण । संस्कारुनिकरुंम्हणे ॥१२०॥

पुत्रेंऐकनिवृत्त । तेणेंसेविलापर्वत । नृपासीपाशीशापित । जलोदरजाहले ॥१२१॥

वसिष्ठमतेंकरुन । क्रयेआणिलाद्विजनंदन । यूपाकेलेंबंधन बाळरडेआक्रोशें ॥१२२॥

पशुकोणमारित । राजासर्वांविचारित । त्याचापिताअजीगर्त । द्विगुणधनेंझेंपावला ॥१२३॥

आक्रोशकरितीसभाजन । म्हणतीकेवीहादुर्जन । स्वसुताचेंकरायाहनन । द्रव्यलोभेंपुढावला ॥१२४॥

विश्वामित्रम्हणेनृपति । सोडीआतांबाळाप्रती । परीन ऐकेभूपती । धरिलाकोपऋषिवर्यें ॥१२५॥

शुनःशेपावरुणमंत्र । उपदेशीविश्वामित्र । जपतांचितेणेंपवित्र । सोडविलावरुणानें ॥१२६॥

रोगमुक्तनृपझाला । यज्ञसर्वसंपविला । शुनःशेपसर्वसभेला । म्हणेपिताकोणसांगावे ॥१२७॥

कोणीम्हणतीअजीगर्त । नृपासीकोणीसांगत । कोणीवरुणासीसांगत । निश्चयनोहेंसर्वथा ॥१२८॥

तेव्हांवसिष्ठबोलिले । बापेंयाच्याद्रव्यघेतले । पितृत्वतेव्हांचिगेलें । पुत्रझालानृपाचा ॥१२९॥

नृपेंयूपींबांधिला । स्वामीपणातेव्हांसंपला । संतुष्टहोऊनिमंत्राला । वरुणेंसोडिलेपुत्राशी ॥१३०॥

मंत्रजपकरुन । देवतांदेतीइच्छितधन । सत्तानहोयतेणेंगुणें । मंत्रबळेंकार्यसिद्धी ॥१३१॥

अरिष्टपाहूनद्रवला । दिव्यमंत्र उपदेशिला । विश्वामित्रवांचविला । पुत्रतयाचानिश्चयें ॥१३२॥

ऐकतांचिऐसीवाणी । संमतजाहलीसर्वजनीं । दक्षिणहस्तेंबाळधरुनि । विश्वामित्रेंघरींनेला ॥१३३॥

सभासदगेलेघरां । राजपुत्र आलाघरां । राजसूयक्रतुवरा । केलेमगहरिश्चंद्रे ॥१३४॥

यज्ञांतिगुरुपूजिला । वस्त्रालंकारपुष्पमाला । घातिल्यातिवसिष्ठगळां । दिव्यचंदनचर्चिलें ॥१३५॥

तैसाचतोऋषिवर । सहजगेलाशक्रपुर । तेथेंपातलामुनिवर । विश्वामित्रतेवेळें ॥१३६॥

विश्वामित्रम्हणेवसिष्ठा । कोणेपूजिलेऋषिश्रेष्ठा । वसिष्ठतेव्हांनृपश्रेष्ठा । हरिश्चंद्रावाखाणी ॥१३७॥

दाताशूरधार्मिक । सत्यवादिपरमयाजक । भूपनसेआणीक । हरिश्चंद्रावेगळा ॥१३८॥

पूर्ववैर असेंमनीं । विश्वामित्रम्हणेकोपुनी । कपटपंडिताचीवाखाणी । किमर्थकरिसीमजपुढें ॥१३९॥

तुझामाझाहाचिपण । हरिश्चंद्राचेंसत्वहरण । होयतरीसर्वपुण्य । जावोतुझेंवसिष्ठा ॥१४०॥

नहोयजरीसत्वहानी । ममपुण्याचीहोहानी । एवंदोघेपणकरुनी । कोपेंगेलेस्वगृहां ॥१४१॥

अठराआणिचारशत । श्लोकअसतीभागवत । सुरसवर्णिलेंदेवीगीत । चरितसत्यव्रताचे ॥१४२॥

देवीविजयेसप्तमेपंचमः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP