सप्तम स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । मनुपुत्रशर्याति । नृपअसेधरापती । चारसहस्रतयाप्रती । भार्याअसतीनृपाळा ॥१॥

सुकन्यानामेंसुता । रुपेंजेवीचंद्रकांता । प्रिय अत्यतपितामाता । सर्वसुह्रदाआवडे ॥२॥

ससैन्यएकेंदिवसीं । रावगेलावनासी । सवेघेतलीकन्येशी । सदार आणिसपुत्र ॥३॥

नगरापासूननसेदूर । एकयोजनाचेंअंतर । तेथेंराहेनृपवर । विहारार्थकाननी ॥४॥

सख्यासहवनांतरीं । कन्यातेथेंक्रीडाकरी । पुष्पेंवेंचीतसुंदरी । वारुळएकपाहिलें ॥५॥

च्यवननामातापसी । तपेंतेथेंबहुवर्षीं । वारुळवाढलेंदेहाशी । झांकूनियाटाकिलें ॥६॥

वारुळासीअसतींबिळें । लुकलुकतीरक्तडोळे । कन्यापाहेतेवेळे । म्हणेकायरत्नेंहीं ॥७॥

दैवयोगेंभाविभावें । घेईंकंटकबाळभावें । काय आहेतेंपाहवें । म्हणोनिटोंचिलेंसवेग ॥८॥

हळूंचऋषीनकोम्हणे । परीतेंतोंअवश्यहोणें । अंधत्वऋषीसयेणें । केवींचूकेनकोम्हणतां ॥९॥

जेव्हांकंटकटोंचले । नेत्रदोनीहीफुटले । रक्तबिंदूबाहेर आले । पाहूनिपळेकन्यका ॥१०॥

देवीभक्ततोच्यवन । अपराधहोतांचिदारुण । दुःखितझालेंसर्वजन । मूत्रपुरीषरोधलें ॥११॥

पशूसैन्यभृत्यनारी । पीडिलेसर्वएकसरीं । आक्रोशतीहाहःकारी । राजाप्रजासर्वही ॥१२॥

नृपेंतेव्हांसर्वांसी । विचारिलेसायासीं । वनींराहतोतापसी । छळिलाकोणीदुष्टपणें ॥१३॥

सत्वरजरीसांगाल । तरीनिष्कृतीपावाल । नातरीसर्वमराल । सांगासत्यसर्वही ॥१४॥

सर्वम्हणतीसत्यवचनीं । कायावाचामनीं । अपराधिलानाहींमुनी । अन्यचूकनसेची ॥१५॥

एवंसर्ववदती । आठवूनियास्वकृती । कन्याम्हणेपित्याप्रती । कंटकटोंचिलेबिळीम्या ॥१६॥

आंतूननिघालेंरुधिर । भिऊनपळालेसत्वर । ऐकतांचिनृपसत्वर । वारुळासमीपपातला ॥१७॥

वारुळहळूंचदूरकेलें । आंतच्यवनापाहिले । उभयनेत्रभंगले । अंधझालामहामुनी ॥१८॥

रावघालीलोटांगण । प्रार्थनाकरीस्फुंदोन । म्हणेअपराधनजाणून । कन्याहस्तेंजाहला ॥१९॥

कन्याअसेलहान । तिजलानाहींमुनेज्ञान । क्षमाकीजेआपण । साधुह्रदयलोण्य़ापरी ॥२०॥

मूत्रपुरीषरोधझाला । समीपसर्वांमृत्युआला । वाचीव आतांदयाळा । सेवकदेतोंसेवेशी ॥२१॥

जीकरिशील आज्ञा । तींचसंपादीनप्राज्ञा । दुःखदूरकरीविज्ञा । महासमर्थाभार्गवा ॥२२॥

व्यासम्हणेराया । ऐकून आलीदया । च्यवनम्हणेनृपवर्या । केलानसेरोधमी ॥२३॥

परीभक्तवत्सलभवानी । भक्तदुखवितांकोपेमनी । स्वापराधतीनगणी । भक्तापराधनसाहे ॥२४॥

घडलासेभक्तावघात । तेणेंवर्तलाआकांत । संतोषमाझाइच्छित । तरीदिजेसुकन्या ॥२५॥

साधेलमजगार्हस्थ्थ । मनहीहोईलस्वस्थ । तुमचेहीदुःखसमस्त । नासेलयेणेंप्रकारें ॥२६॥

वज्रतुल्यतीवाणी । पडतांनृपाचेकर्णी । उद्विग्नझालामनी । म्हणेदैवाकायकरुं ॥२७॥

कन्याएकसुकुमारी । अंधवृद्धविप्रकरी । केवींदेऊंमीस्ववरी । जन्मांतरकायईचे ॥२८॥

नजरीदेऊंकन्या । मृत्युआलासर्वजना । पडलीफारविवंचना । बुडालानृपशोकार्णवीं ॥२९॥

कन्येसीकळलेंवृत्त । पित्याप्रतीसंबोधित । कांझालाचिंताग्रस्त । निःशंकमजदेईजे ॥३०॥

अरण्यामाजीराहीन । पतीसेवामीकरीन । कीर्तीतुझीवाढवीन । सत्शीलस्वभावें ॥३१॥

अनुसुयाअरुंधती । जेवीआचरणकरिती । तेवीकरीनसुमती । नकरीचिंताममगुरो ॥३२॥

मजएकलीसाठीं । सर्वपडलेसंकटीं । विलंब आतांकशासाठीं । प्रसन्नकरीमुनीते ॥३३॥

ऐकतांऐसेंवचन । संतोषलामनुनंदन । सर्वांसहतेथेंजाऊन । कन्यादानकेलेंनृपें ॥३४॥

राव अर्पीबहुधन । परीनघेतेंच्यवन । म्हणेविप्राकायनून । स्वाधीनवेद आमुच्या ॥३५॥

विवाहहोतांचिसकळ । सुखीझालेतत्काळ । कन्येनेंनेसूनवल्कल । वन्यवृत्तीसेविली ॥३६॥

कन्येचीपाहूनदशा । दुःखझालेनरेशा । मातासर्वदुःखावेशा । सहनकरितीऋषिभयें ॥३७॥

असोकन्येशीविचारुन । ऋषीनिरोपघेऊन । नृपगेलागृहालागून । सकुटुंबाससैन्य ॥३८॥

सुकन्याअतिसुशीला । आरंभीपतिसेवेला । कदांनसेकंटाळा । महासतीपतिव्रता ॥३९॥

पतीचेंआधींउठोन । गृहींदीपपाजळून । सडा आणिसंमार्जन । करीत्वरेंशौचादि ॥४०॥

उष्णकरीउदकासी । पतीधरुनहातासी । नेऊनियाउत्तरदिशी । बैसवमिलविसर्गा ॥४१॥

ठेवीपुढेंजलपात्र । दूरठाकेतावन्मात्र । होतांचितोशुद्धगात्र । पुन्हाआणीआश्रमीं ॥४२॥

दुसरेंवस्त्रनेसून । पतीसकरवींआचमन । उष्णोदकेंघालीस्नान । अंगपुशीशुष्कवस्त्रें ॥४३॥

धौतवस्त्रनेसवी । अंगवस्त्रपांघुरवी । आणून आसनीबैसवी । प्राड्गमुख अग्नीपुढें ॥४४॥

भस्म आणिसंध्यापात्र । माळगोमुखीपवित्र । देऊनिस्वयेंहोमपात्र । साधूनसर्वठेवीतसे ॥४५॥

अग्नीचेंकरीउद्धरण । गोळातळींदेऊन । शुभाकाष्टेलाऊन । प्रज्वलीतकरीतसे ॥४६॥

समिधादर्भव्रीही । धमनीस्रुचीसर्वही । कालहोतांचिलवलाही । विनवीमधुरनम्रत्वें ॥४७॥

एवंसर्वसंपादून । गृहकार्यकरीआपण । स्वयंपाकसिद्धकरुन । वैश्वदेवकराम्हणे ॥४८॥

एवंकरवीभोजन । हस्तमुखादिक्षालन । होतांचिमग आचमन । तांबूलदेईकुटुनिया ॥४९॥

पतीपादोदकघेऊन । आज्ञातयाचीसंपादून । उच्छिष्टपात्रींकरीभोजन । दक्षराहेसेवनी ॥५०॥

सायंकाळींसर्वकृत्य । करीकरवीयथोचित । पतीचेचरणचुरीत । प्रेमयुक्तबैसेती ॥५१॥

पतीधर्मसाधीसती । निद्रायुक्तहोतांपती । स्वयेंनिजेपायतीं । एवंनित्यसेवीतसे ॥५२॥

बहुवर्षेलोटलीं । कदांपीतीनचुकली । एकदिनीउदकागेली । परतलीजोंमार्गानें ॥५३॥

तवदोघेंसूर्यकुमर । पाहतीतीससुंदर । मोहेंयेऊनीसमोर । विचारितीसाक्षेपें ॥५४॥

बोलेतूंकोणाचीकोण । कांसेविलेंअरण्य । नावस्त्रनाभूषण । राजयोग्यादिससी ॥५५॥

उत्तरसांगेतीसती । ममपिताशर्याती । च्यवनभार्गवममपती । विप्रवृत्तीअसेही ॥५६॥

दोघेंम्हणतीतियेशी । किमर्थदुःखपावशी । सेऊनियाअंधाशी । गमविसीयौवन ॥५७॥

आमचेंसवेंयेईं । जेंपाहिजेतेंघेई । विहारयोग्ययेसमई । कष्टनकोपूरेहें ॥५८॥

ऐकतांतिअधर्मवचन । कोपेंकरीरक्तनयन । म्हणेअधमतुम्हींदोघेंजण । दुष्टबुद्धीअयोग्यहे ॥५९॥

सर्वसाक्षीलोकमणी । धर्मप्रियसाक्षात्तरणी । त्याचेंतुम्हींपुत्रहोऊनी । भलतेंचकेवींचिंतिता ॥६०॥

निघावेगेंव्हांदूर । नातरीशापीनसत्वर । ऐकतांचिझालेदूर । सलज्जसभयजाहले ॥६१॥

पुन्हातिजसीबोलती । तूंआहेसमहासती । परिक्षार्थ ऐसीउक्ती । केलीआम्हीनकोपावे ॥६२॥

आम्हीवैद्यदैवाचे । नेत्रदेऊंच्यवनाचें । जेवींरुप आमुचें । तेवींकरुंतपवती ॥६३॥

तिघेहोऊंसमान । माळघालीओळखून । एवंजरीमान्यवचन । दिव्यरुपकरुंतया ॥६४॥

ऐकूनबोलेसती । स्थिरव्हावेंकिंचिति । विचारुनियास्वपती । सांगेनतुम्हांउत्तर ॥६५॥

दोघेंहीझालेस्थिर । सुकन्यागेलीसमोर । करजोडूनऋषिवर । नम्रवाक्येंप्रार्थिला ॥६६॥

द्वारीआलेनासत्य । सुगात्रकरुंपतीप्रत । परीमागतीमाझेंसत्य । ओळखूनपतीघेम्हणती ॥६७॥

नेत्रहीपतीसयावे । माझेंव्रतनभंगावें । इच्छिततेंचिकरावें । आज्ञापावेंस्वामिया ॥६८॥

ऐकुनिमुनीबोले । ममशरीरहोऊंभले । तुझेंव्रततुजबळें । रक्षूंशकेसंकटीं ॥६९॥

विपत्तीसाठींधन । पुरुषेंकरावेंजतन । दारापुत्ररक्षण । धनवेंचुनीकरावें ॥७०॥

पुत्रदाराआणिधन । प्रसंगीसर्ववेंचून । करावेंस्वात्म्याचेंरक्षण । धर्मशास्त्रवदतसे ॥७१॥

दारापुत्र आणिधन । मिळेलसर्वमागुत्यान । देहनमिळेपरतोन । दुर्लभ असेहीवस्तु ॥७२॥

एवंजाणुननीती । देहरक्षणेंमजप्रती । सोसवेंनामजविपत्ती । अंधत्वाचिनित्यनित्य ॥७३॥

पातिव्रत्य असेंजरी । नष्टनहोयतीनारी । तुजहीकायसंसारी । सुख असेंअंधत्वें ॥७४॥

ऐकतांचिऐसेंवचन । दस्र आणिलेपाचारुन । च्यवनासीदोघेंघेऊन । स्नानकरितीसरोवरी ॥७५॥

आलेजोंतिघेंबाहेरी । वयोरुपेंसूर्यापरी । एकरुपेंतिष्ठलेद्वारीं । माळघालाम्हणतीते ॥७६॥

विस्मितझालीपाहून । चिंताक्रांतझालेमन । तिघदिसतीसमान । केवींआतांकरावें ॥७७॥

तेव्हांस्मरेदेवीचरण । प्रार्थिलेकरजोडून । अंबेआतांधर्मरक्षण । तूंचिकीजेपरांबे ॥७८॥

स्थिरचरजेंओतप्रोत । ज्ञानकलातूंचियांत । तुजवांचूनिजगांत । पदार्थदुजानसेची ॥७९॥

ब्रम्हाविष्णुइंद्रहर । तुजसेवितिनिरंतर । तेणेंचितेसविस्तर । ज्ञानयोगेंजाणती ॥८०॥

अनन्यजरीसेवन । पतीचेघडलेंहातून । तेणेंसत्येकृपाकरुन । ज्ञानद्यावेंमजलागी ॥८१॥

व्यासम्हणेनृपति । एवंप्रार्थून अंबेप्रती । पुष्पमाळघेऊनहातीं । तिघांसमीपपातली ॥८२॥

तवजाहलेंदिव्यज्ञान । ओळखिलामुनीच्यवन । कंठींमाळघालून । पदवंदिलेपतीचे ॥८३॥

पाहूनितिचेंचरित्र । विस्मितझालेरविपुत्र । दोघांचेकरुनिस्तोत्र । निरोपमागतीमुनीशी ॥८४॥

मुनीम्हणेहोदेववर । केलामोठाउपकार । मागातुह्मांसीजेवर । प्रत्युपकारकरीनम्हणे ॥८५॥

ऐकूनिदोघेंबोलती । सर्वअसेसंपत्ती । सूर्यकृपेंविपत्ती । नसेआम्हांकांहींच ॥८६॥

जरीझालासीप्रसन्न । शक्यजरीतेंतुझेंन । देइजेआम्हांसोमपान । पुरंदरासांगाती ॥८७॥

मेरुपर्वतींविधीनें । यज्ञकेलाअतिधनें । तेथेंआम्हांइंद्रानें । अवमानिलेसर्वांत ॥८८॥

निंद्यअसेंवैद्यपण । करितांतुम्हींदोघेंजण । योग्यनाहींसोमपान । समानआसनतुम्हांनसो ॥८९॥

एवंतेणेंनिषेधिले । दोघांआम्हांदूरकेले । जरीशक्यतपोबळे । करीएवढेंऋषिवर्या ॥९०॥

अवश्यम्हणेच्यवन । इंद्रासवेंसोमपान । निश्चयेंतुम्हांदेईन । किंचित्स्वस्थअसावें ॥९१॥

एवंघेऊनीवचन । हर्षलेदोघेंरविनंदन । च्यवनासीनमस्कारुन । गेलेकुमरस्वर्गमार्गें ॥९२॥

चवदाआणिदोनशत । पद्यसंख्याभागवत । सारघेतलेंच्यवनचरित । लोकहिरार्थप्राकृतें ॥९३॥

देवीविजयेसप्तमेद्वितीयः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP