सप्तम स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । श्रुतिस्मुतिपुराण । चौथेंशिष्टाचेभाषण । जीसमानितीप्रमाण । वंदूतिचिगायत्री ॥१॥

ब्रम्हमयतेजोमय । भूतमयबुद्धीमय । मनोमय आत्ममय । निरामयगायत्री ॥२॥

वाणीमनाजेंनातुडें । वेदांपडलेंसांकडे । तेंचिदावींरोकडे । स्मरतांचगायत्री ॥३॥

सर्वजेथेंप्रसवले । सर्वांतरींजेंरमलें । तेंचतेणेंअनुभविले । चिंतिताचिगायत्री ॥४॥

सुंदराचेसुंदर । त्रिभुवनाचेमंदिर । वसेंतेथेंनिरंतर । जपतसेजोगायत्री ॥५॥

विज्ञानतेज उमाळा । तिन्हीकरुनीनिराळा । पाहेंतोचिस्वयेंडोळां । ध्यातसेजोगायत्री ॥६॥

जोसर्वांचासाक्षिकर्ता । रमेसुखेंस्वयेंभर्ता । तोमीच ऐसावेत्ता । होयजाणतांगायत्री ॥७॥

ध्येयवस्तूजेविलसे । ध्याताएकमीच असे । एवंसदातयांदिसें । चित्तींजयाचेगायत्री ॥८॥

मनाचीनासेआधी । लागेंसुखेंसमाधी । शुद्धहोय आत्मबुद्धी । वंदितांचिगायत्री ॥९॥

जोजडामाजीभरला । सर्वभरोनीजो उरला । स्वयेंतोचिविप्रझाला । लाभलाजोगायत्री ॥१०॥

जोनियंताआमुचा । दाताभोक्ताकर्माचा । तोचिसत्यमीसाचा । जाणेंकळतांगायत्री ॥११॥

सर्वकर्मेंकरीकर्वी । व्यापिलाजोसप्त उर्वीं । मनोरथतोचीपूर्वी । लक्षितांचिगायत्री ॥१२॥

वेदाचिजीजननी । दयाजलाचीवाहिनी । तारितेजीस्वगायनी । गाऊंतिचिगायत्री ॥१३॥

पावकजीचेंवदन । ब्रम्हामस्तकशोभमान । रुद्रजीचावेणीगुण । वंदतीचीगायत्री ॥१४॥

ह्रदयजीचेंनारायण । धराजीचेगुद्यस्थान । पंचवायुजीचेप्राण । नमूतींचिगायत्री ॥१५॥

कर्पूरतुल्यशुभ्रवर्ण । गोत्रजीचेसांख्यायन । जियेचेचोवीसवर्ण । जपूंतीचिगायत्री ॥१६॥

तीनपायसहाकुक्षी । पांचमस्तकेंजीसलक्षी । देवताजीसर्वसाक्षी । सेवूंतीचिगायत्री ॥१७॥

सप्तस्वर्गहेंशरीर । आनंदमयविहार । स्वभावेंजीप्रणवाकार । नमस्कारुंगायत्री ॥१८॥

मद्यपीब्रम्हघातक । स्वर्णस्तेयीगुरुतल्पक । पांचवातोसंसर्गक । शुद्धकरीगायत्री ॥१९॥

कालकर्मस्वभाव । गुणत्रयभूतभाव । अवस्थामनधीजीव । चिज्जडसर्वगायत्री ॥२०॥

तिचेचहेंकथामृत । गोडश्रीमदभागवत । प्रेमेंगाऊप्राकृत । प्रसन्नहोयगायत्री ॥२१॥

सूतम्हणेहोशौनका । पुढेंचरित्रसुरस ऐका । प्रेमेंजेंवदलाशुका । जन्मेजयासीव्यासजें ॥२२॥

नृपम्हणेगुरुराया । वाक्यामृतपिऊनिया । क्षुधावाढलीसदया । पुन्हाद्याजिकर्णांमृत ॥२३॥

ऐकतांचिदेवीगाथा । हरलीसंशयाचीव्यथा । चरणीठेवितोंमाथा । केलेंकृतार्थगुरुजी ॥२४॥

जाहलापित्याचाउद्धार । हर्षेंव्यापिलेंअंतर । सुखचिकोंदलेंअपार । दुःखनाशजाहला ॥२५॥

सोमसूर्यवंशींनृपती । सर्वहीशक्तिभक्त असती । म्याऐकिलीऐसीख्याती । चरित्रेंसांगात्यांचीमज ॥२६॥

भक्तांचेऐकतांचरित । कुलसर्वपावनहोत । कंटाळेलकोणतेंथ । विशेषमन उल्लसे ॥२७॥

पाडूनश्रोताप्रेमळ । वक्ताद्रवेनिर्मळ । मधुरपदेंमगकोमळ । प्रसवेवाणीतयाची ॥२८॥

ऐकाश्रोत्याचेलक्षण । श्रोताअसावाविचक्षण । मोक्ष इच्छाजयापूर्ण । विषयसेवननावडे ॥२९॥

श्रद्धाभक्तिविश्वास । एकाग्र असावेंमानस । विचार असावाबुद्धीस । ग्रहणशक्तीअसावी ॥३०॥

शास्त्राचेंअसावेंज्ञान । इंद्रियाअसावेंदमन । दृष्टीअसावीनमून । शांतिस्वभाव असावा ॥३१॥

कामादिकांनसोसवड । श्रवणींचजडोआवड । मनासीफुटावामोड । ऐकतांचिकथेते ॥३२॥

नेत्रीयावेंप्रेमनीर । रोमस्फुरणदेहावर । सदगद असावास्वर । प्रेमयुक्तश्रोत्याचा ॥३३॥

वक्तातोचीईश्वर । वक्ताज्ञानाचासागर । वक्ताचिगुरुनिर्धार । एवंभावनाअसावी ॥३४॥

प्रेमेंकेलेंजेंश्रवण । एकांतिकरावेंमनन । संशयेंजरीभरलेंमन । पृथक्पणीविचारावे ॥३५॥

श्रवणसमईआक्षेप । गुरुहत्येचेलागेपाप । वक्तातोचिमायबाप । कदांनयेअवमानूं ॥३६॥

सांगीतलीसुलक्षणें । ऐकाआतांकूलक्षणें । समजूनतयांटाकणें । एतदर्थसांगतो ॥३७॥

चलाऐकूंपुराण । पोटार्थीचकींसज्ञान । येऊंतयापरीक्षून । ऐकिलीसेविख्याती ॥३८॥

मुखींविडारंगला । सुवेषहीबरवाकेला । अहंकारेंयेऊनबैसला । पुराणिकासन्मुख ॥३९॥

मध्येंचशंकाबोलिली । अर्थधाराविच्छेदिली । चुकीत्याचीपदरीदिली । स्वयेंबनलाविद्वान ॥४०॥

हाअवमाधमश्रोता । पाहुणाअसेयमदूता । आतांऐकाअधमश्रोता । नर्कगामीदुजापै ॥४१॥

ऐकिलेंतेथेंनदुषिलें । परीउगानांकमुरडिलें । बाहेरजातांचिनिंदिले । पोटभरुंपुराणिक ॥४२॥

श्लोकींकांहींवदेकांहीं । श्लोकलावणेंयेतनाहीं । भोंदितोस्त्रियांमूर्खाही । पंडितमान्यनसेहा ॥४३॥

आतांऐकाकनिष्ठ । दंभार्थ ऐके एकनिष्ठ । गोष्टीकरीपापिष्ट । डुकल्यादेतबैसला ॥४४॥

लक्षनसेंपुराणश्रवणीं । स्त्रियांसीपाहेनिरखूनी । केव्हांसंपेललांवणी । घरांकेव्हांजाईन ॥४५॥

आतांऐकामध्यम । किंचित असेंतयाप्रेम । परीगेलानाहींभ्रम । एकाग्रनसेंमानसां ॥४६॥

उत्तमपूर्वींवाखाणिला । श्रोतातोचिभलाभला । जन्मेजयेंप्रश्नकेला । अवधाराकथातींच ॥४७॥

व्यासम्हणेनृपाऐक । नृपवंशकथानक । नारदापासावसम्यक । ऐकिलेंजेंमीसांगतों ॥४८॥

विष्णूचेनाभिकमलांत । ब्रम्हाजेव्हांप्रकटत । अयुतवर्षेतपकरीत । आराधीत अंबिका ॥४९॥

प्राप्तहोऊनीवरदान । सृष्ठीकरीचतुरानन । सातपुत्रमनापासून । प्रगटकेलेविधीनें ॥५०॥

मरीचिअंगिराअत्रिमुनी । वसिष्ठपुलहमहाज्ञानी । क्रतूपुलस्त्यदोनी । सप्तपुत्रपूर्वींचे ॥५१॥

विरंचीचाजोरोष । तेथूनप्रगटेरुद्रपुरुष । उत्सगांतूननारदास । प्रगटकरीस्वयंभू ॥५२॥

दक्षिणकरांगुष्ठांतून । दक्षझालाउत्पन्न । दक्षपत्नीडाव्यांतून । वीरिणीनामेंप्रगटली ॥५३॥

सनकसनंदनसनातन । सनत्कुमारचौघेंजण । मानसपुत्रनिर्माण । केलेंपुनःविधीनें ॥५४॥

नारदपुनःदक्षसुत । शापयोगेंजन्मघेत । वीरिणीतेचिविख्यात । नारदमाताअसिक्नी ॥५५॥

विधीचेआज्ञेकरुन । दक्षकरीप्रजोत्पादन । पुत्रवीरिणीपासून । पांचसहस्रतेजस्वी ॥५६॥

तेकरुंपाहतीसृष्टीं । नारदेंकेलीआडकाठी । म्हणेमूर्खतुम्हीनेणागोष्टी । सृष्टिकार्यकठिणहें ॥५७॥

नसतांधरेचाअंत । करालसृष्टीअत्यंत । हांसतीलतुम्हांसमस्त । मूर्खम्हणोनीलोकहे ॥५८॥

सर्वपृथ्वीचेंकीजेज्ञान । सृष्टीकरामगपाहून । दैवयोगेंएवंवचन । दक्षपुत्रबोधिले ॥५९॥

सत्यम्हणतीमुनिवचन । गेलेसर्वनिघून । धरामापूंम्हणून । दशदिशेसीदुरावले ॥६०॥

नाशिलेपुत्रपाहून । तितकेस्रजीमागुत्यान । नारदेतेहीप्रतारुन । पूर्ववतदवडिले ॥६१॥

दक्षेंपुत्रनष्टपाहून । शोकेसंतप्तझालेंमन । शापदेईनारदालागून । नाशतुझाअसोम्हणे ॥६२॥

ममपुत्रत्वांनाशिले । गर्भदुःखभोगीले । पुत्रमाझाशापबळ । होयदुर्बुद्धेनारदा ॥६३॥

मगवीरिणीपासून । नारदझालाउत्पन्न । दक्षेंपुत्रशोकसांडून । साठकन्याप्रगटकरा ॥६४॥

कश्यपमरीचिसुत । तेराकन्यातयादेत । धर्म असेब्रम्हसूत । दहाकन्यातयाशी ॥६५॥

चंद्र अत्रीचासूत । सत्तावीसतयादेत । दोनदिल्याभृगूप्रत । दक्षेंकन्याआपुल्या ॥६६॥

अरिष्टनेमीसचार । कृशाश्वादोनसुंदर । आंगीरसादोनसाचार । एवंसाठविवाहिल्या ॥६७॥

त्यांचेंसंतानवाढलें । देवराक्षसांदिवहिले । बलिष्ठविरोधीजाहले । रागद्वेषयुक्ततें ॥६८॥

कश्यपापासूनसविता । विवस्वान्नामविख्याता । नामझालेंत्याच्यासुता । वैवस्वतमनूहें ॥६९॥

तयासीझालेन उसुत । इक्ष्वाकूज्येष्ठसवात । नाभाग आणिधृष्टम्हणवत । चतुर्थझालाशर्याती ॥७०॥

नरिष्यंतप्रांशूसाहवा । नृग आणिकरुष आठवा । पृषध्रधाकुलानववा । मानवसर्वम्हणवले ॥७१॥

इक्ष्वाकूसीपुत्रशत । विकुक्षीज्येष्ठसर्वांत । नवपुत्राचेंचरित । सांगेन ऐकसंक्षेपे ॥७२॥

नाभागपुत्र अंबरीष । दृष्टाचाधार्ष्ट्र विकल्मष । ब्रम्हभूतनिर्विशेष । ब्रम्हकर्मीजाहला ॥७३॥

शर्यातिपुत्र आनर्त । नगरकेलेंसमुद्रांत । तेथेंराहेप्रजारक्षित । द्वारकानगरतेंचिहें ॥७४॥

शर्यातीचीअसेकन्या । नामतिचेसुकन्या । अंधासिदिलीतीच्यवना । मुनीझालासुलोचन ॥७५॥

नृपपुसेंचरित्र । सुकन्येचेअतिपवित्र । च्यवनाख्यानविचित्र । व्याससांगेनृपासी ॥७६॥

तीकथापरमपावन । पुढिलियेअध्यायेकरुन । करील अंबावर्णन । ऐकानिश्चलभाविकहो ॥७७॥

अडुसष्टपद्यसार । प्राकृतझालेमनोहर । प्रथमध्यायसुंदर । पूर्णझालाजाणिजे ॥७८॥

श्रीदेवीविजयेउत्तरार्धेंसप्तमस्कंदेप्रथमोध्यायः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP