TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वास्तुशांती - वास्तुमंडल रेषा

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu.


वास्तुमंडल रेषा
खिळे ठेवण्यासाठी व मुटकुळी ठेवण्यासाठी असणारे मंत्र प्रत्येक वेळी म्हणावेत.

खिळे ठेवण्याचा मंत्र ( ईशान्ये कडून आरंभ करावा )
विशंतु भूतले नागाः, लोकपालाश्च सर्वशः ।
अस्मिन्‍ गृहेऽवतिष्ठंतु, आयुर्बलकराः सदा ॥

बलि ठेवण्याचा मंत्र ( ईशान्ये कडून आरंभ करावा. )
अग्निभ्योऽप्यथ सर्पेभ्यो, येचान्ये तत्समाश्रिताः ।
तेभ्यो बलिं प्रयच्छामि, पुण्यमोदनमुत्तमम्‍ ॥

त्या नंतर वास्तुमंडलवेदीवर पसरलेल्या तांदुळावर पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा क्रमाने ५४३२१ जावे व दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा क्रमाने उभ्या १० रेषा सुवर्ण शलाकेने ओढाव्यात. प्रत्येक रेषा काढताना खालील मंत्र म्हणावेत. उभ्या रेषा काढताना प्रत्येक वेळी ॐ म्हणावा.

शांतायै नमः । यशोवत्यै नमः । सुमत्यै नमः ।
कांतायै नमः । विशालायै नमः । प्राणवाहिन्यै नमः ।
सत्यायै नमः । नंदायै नमः । सुभद्रायै नमः । सुरथायै नमः ।

या नंतर उभ्या रेषां प्रमाणे वेदीवर आडव्या रेषा सुवर्णशलाकेने ओढाव्यात. दक्षिणेकडे आरंभ करुन उत्तरेकडे जावे.

सूचना - या वेळी एका गुरुजींनी सूर्य प्रतिमा, किंवा नवग्रह प्रतिमा वास्तुप्रतिमा यांची प्राणप्रतिष्ठा करावी. आडव्या रेषा काढताना प्रत्येक वेळी ॐ म्हणावा.

हिरण्यायै नमः । सुव्रतायै नमः । लक्ष्म्यै नमः ।
विभूत्यै नमः । विमलायै नमः । प्रियायै नमः ।

जयायै नमः । ज्वालायै नमः ।
विशोकायै नमः । इडायै नमः ।

यानंतर सर्व रेषांवर गंधाक्षतफूलवाहावे.

ॐ शांतादि देवताभ्यो नमः । सर्वोपचारार्थेगंधाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि ।

आचार्यः आचम्य, प्राणायामं कृत्वां, साक्षतजलं हस्ते गृहीत्वा, अद्यपूर्वोच्चारितवर्तमान, एवंगुणविशेषण विशिष्टायां, शुभपुण्यतिथौ यजमानस्यात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त, फलप्राप्त्यर्थं, संकल्पित सग्रहमख वास्तुशांतिहोमंकर्तुं, स्थंडिलादि सकलं कर्म करिष्ये ।

गायत्री मंत्र म्हणत स्थंडिलावर गोमर्‍यानो सारवावे. / पंचगव्य शिंपडावे.

स्थंडिलं गायत्री मंत्रेण,
गोमयेन प्रदक्षिणं उपलिप्य वा पंचगव्येन प्रोक्ष्य

( समिधेने, खणावे व रेषा माराव्यात )

ॐ उद्धन्यमानमस्या....., संतु प्रदिशश्चतस्रः ।
ॐ शंनोदेवी..... रभिस्रवंतु नः ।
शकलमाग्नेयां निरस्य, अप उपस्पृश्य ॥

स्थंडिला बाहेर पूर्वादि क्रमाने ८ दिशांना अक्षता वाहाव्यात, व अष्टदिक्पालांचे आवाहन करावे.

ॐ इंद्राय नमः.....ईशानाय नमः ।
मध्ये अग्निस्थानाय नमः ।

घरातून प्रज्वलित करुन आणलेला अग्नि स्थंडिलाजवळ ठेवावा. आणून ठेवलेल्या अग्नीवर अक्षता वाहाव्यात, त्यानंतर तो स्थंडिलावर ठेवावा.

ॐ वैश्वावनरस्यरुपं..... ब्रह्मभूर्भुवः सुवरोम्‍ वरद नामानमग्निं प्रतिष्ठापयामि । अग्नीचे ध्यान करावे. ॐ चत्वारि...शृंगात्‍... उदक सोडावे.

दक्षिण वेद्यां आदित्यादि नवग्रह देवताः
तथा वरुणश्च, तथाच उत्तरवेद्यां वास्तुमंडलदेवताः
वरुणस्यच, तस्मिन्‍ एव कलशे वर्द्धिनीदेवतानाम्‍
आवाहनं पूजनंच ऋत्विग्‍ द्वारा करिष्ये ।

ग्रहांचे आवाहन करावे, चित्र पाहावे. ) ग्रह व वरुणाचे आवाहन झाल्यावर वास्तुमंडलातील देवतांचे आवाहन करावे.


ग्रहमंडल

ग्रहस्थापनेपूर्वी वेदिवर / चौरंगावर तांदूळ किंवा गहू पसरावेत. प्रत्येक ग्रहाच्या प्रतिमा वापराव्यात / सुपारीवर आवाहन करावे.

सुपार्‍यांवर प्रत्येक ग्रहाचे मुख्यदेवता १) अधिदेवता व २) प्रत्यधि देवतांचे आवाहन करावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-11-26T04:42:13.3200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

structural relation

 • संरचनात्मक संबंध 
RANDOM WORD

Did you know?

why treeepad veedhee ? narrate
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.