TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वास्तुशांती - स्थलशुद्धि

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu.


स्थलशुद्धि
स्थलशुद्धीसाठी सहाय्यक गुरुजींनी घरात सर्वत्र मोहरी टाकावी, नंतर पंचगव्य व पाणी शिंपडावे.

प्रथम मोहरी टाकावी -
यदत्र संस्थितं भूतं, स्थानमाश्रित्य सर्वतः ।
स्थानं त्यक्त्वा तु तत्सर्वं, यत्रस्थं तत्र गच्छतु ॥
पंचगव्य शिंपडावे
ॐ शुचीवो हव्या मरुतः शुचीनां
शुचि हिनोम्यध्वर शुचिभ्यः ।
ऋतेन सत्य मृतसाप आयन्‍
शुचिजन्मानः शुचयः पावकाः ॥
अग्निः शुचिव्रततमः शुचिर्विप्रः शुचिः कविः ।
शुचीरोचत आहुतः ॥
उदग्ने शुचय स्तवशुक्रा भ्रांजत इरते ।
तवज्योती ष्यर्चयः ॥
अपवित्रः पवित्रोवा, सर्वावस्थांगतोऽपि वा ।
यः स्मरेत्‍ पुंडरीकाक्षं, सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
सर्वत्र शुद्ध पाणी शिंपडावे.
ॐ आपोहिष्ठामयोभुवस्तान उर्जे दधातन ।
महेरणायचक्षसे ॥
योवः शिवतमोरसः स्तस्यभाजयतेहनः ।
उशतीरिवमातरः ।
तस्मा अरंगमामवो यस्यक्षयाय जिन्वथा ।
आपोजनयथाचनः ॥
मंत्रजपः कारयेत्‍ । हात जोडावेत.
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः ।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरंगैस्तुष्टुवा सस्तनूभिः ।
व्यशेमदेवहितं यदायुः ॥
ॐ स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः ।
स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्तिनस्तार्क्ष्योअरिष्टनेमिः ।
स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु ॥

आचार्यांनी स्वासनावर उभे राहून म्हणावे
देवाः आयांतु, यातुधाना अपयांतु ( उपविश्य, - वदेत्‍ ) विष्णो देवयजनं रक्षस्व । ( भूमौप्रादेशं कुर्यात्‍ )

स्थंडिलाच्या पूर्वेकडे यजमानाच्या हातभर लांबीरुंदीच्या २ वेदी करुन चौरंगावर तांदूळ व गहू पसरावेत. वास्तुमंडलाच्या वेदी भोवती १ ते ४ कोपर्‍यांवर पानावर शंकू खिळे ठेवून त्या शंकूंच्या जवळ त्याच क्रमाने भाताची मुटकुळी ठेवावीत. त्यावर गंध फूल व गुलाल वाहावा, व पाणी सोडावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:14:23.1930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

material cost percentage rate

  • सामग्री परिव्यय टक्केवारी 
RANDOM WORD

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site