षष्ठः स्कंध - अध्याय दहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । भागवतहेंकथामृत । अंबाबोलिलीप्राकृत । पूर्वार्धाचेसर्ववृत । अनुक्रमेंतेऐका ॥१॥

वेदव्यासमुखोदगत । दिव्यपद्यभागवत । सहास्कंदेंपूर्वार्धहोत । नवसहस्रसुश्लोकें ॥२॥

सत्तावनश्लोक अधिक । तेजाणिजेक्षेपक । अध्येंसंख्यांसंम्यक । सार्धशतत्रयाधिके ॥३॥

प्राकृतग्रंथपरिमाण । स्कंदविभागसमान । शतार्ध अध्येमान । चतुःसहस्त्रओंवीचे ॥४॥

प्रथमाध्यायपावन । श्रीगणपतीचेंध्यान । शौनकप्रश्नकथून । शेचाळीसओव्यांनीं ॥५॥

पुराणसंख्याद्यवतरण । भागवत अध्येतीन । पंचहत्तरओंव्यापूर्ण । दुजाअध्यायजाणिजे ॥६॥

हयग्रीवाचेचरित्र । सासष्टओंव्यापवित्र । सुरसकथाहीविचित्र । तृतीयाध्यायींजाणिजे ॥७॥

चार अध्येंमिळून । चौथाअध्यांयवर्णन । मधुकैटभाचेनाशन । एकशेछतिसओंव्यानी ॥८॥

तैसाचिपांचवासुरस । चार अध्येसंस्कृतास । बोलिलेसोमवंशास । अष्टोत्तरशतओंव्या ॥९॥

साहव्यांतहीअध्येचार । शुकजन्मविस्तर । शत आणिसप्तोत्तर । ओव्यांसुरसजाणिजे ॥१०॥

सप्तमाध्यायींतीन । प्रथमस्कंदसंपूर्ण । जनकशुकसंबोधन । ओव्याशांणवगाइल्या ॥११॥

प्रथमस्कंदभागवत । अक्राशेंपंच्यायशींश्लोकत्यात । वीस अध्यायगणित । चरित्रसुरसदेवीचे ॥१२॥

देवीविजयस्कंदप्रथम । सात अध्येसुरसपरम । सहाशेंचौतीसनाम । ओंव्यासुरसगाइल्या ॥१३॥

दुजास्कंदप्रथमाध्याईं । दोन अध्येभागवतपाही । व्याससूतजन्मगाई । ओव्यापांचपन्नास ॥१४॥

पांच अध्योद्वितीयांत । शंतनुचरित्रवर्णि । एकशेंचौसष्टओंव्यायांत । चित्रचरित्रगंगेचे ॥१५॥

तिसर्‍यांत अध्येचार । परीक्षितकथाविस्तार । सर्पसत्रदुस्तर । बाहत्तरओंव्यानीं ॥१६॥

चौथ्यांतएकसमास । अस्तिकजन्मसुरस । ओंव्याएकुणचाळीस । स्कंदपूर्णजाहला ॥१७॥

बाराअध्येद्वितीयांत । सातशेंचोविसपद्येंत्यांत । चार अध्येप्राकृत । तीनशेंतीसओव्यांनी ॥१८॥

तृतीयस्कंद अध्येतीन । प्रथमाअध्याय केलापूर्ण । वर्णिलेंश्रीपुरदर्शन । सत्याहत्तरओंव्यानी ॥१९॥

सहाअध्येंद्वितीयाचे । स्तवनयेथेंअंबेचे । सशक्तहोणेंतिघांचे । एकशेंचौसष्टओंव्यानीं ॥२०॥

दोन अध्येतृतीयांत । सत्यतपाचेचरित । बासष्टओंव्याअसेयांत । देवीविजयगोडहा ॥२१॥

अंबामखविष्णुकृत । दोन अध्यायचौथ्यांत । वर्णिलेसेसंक्षिप्त । ओंव्यातेहतीसतयाच्या ॥२२॥

पांचचार आणितीन । पांचसहासातजण । सुदर्शनाचेंआख्यान । तीन अध्यायेंवर्णिलें ॥२३॥

ओंव्यासप्तोत्तरशत । पंचांणव असेदुसर्‍यांत । बाहत्तरओंव्यातिसर्‍यांत । देवीकारुण्यप्रकाशे ॥२४॥

अठव्यांत अध्येदोन । नवरात्राचेंवर्णन । सुशीलवैश्यवरदान । सदतीसओंव्यांनी ॥२५॥

श्रीरामाचेंचरित्र । नवमांतासेंपवित्र । अध्येतीनसुचित्र । त्र्याहत्तरओंव्यांनी ॥२६॥

तृतीयाचेअध्येतीस । सत्राशेंचौपन श्लोकास । नवाध्यायविजयास । सातशेंशेचाळीसओव्यांनीं ॥२७॥

चौथ्याचेअध्येतीन । प्रथमाध्यायपरिपूर्ण । कृष्णजन्माचाप्रश्न । कारण अवताकायते ॥२८॥

कश्यप अदितीशापकथन । इंद्रकरिगर्भकृंतन । तेंसर्वयेथेंवर्णन । एकुण्यायशींओव्यांनीं ॥२९॥

दुसर्‍यांतहीअध्येतीन । नरनारायणाख्यान । उर्वशीचेउत्पादन । शाहत्तरओव्यांनी ॥३०॥

तिसर्‍याचेहिअध्येतीन । प्रल्हाद आणिनारायण । युद्धकरितीदारुण । एकुणचाळीसओव्यांनी ॥३१॥

चौथ्यांत अध्येचार । भ्रुगुशापशुक्रवर । बृहस्पतीकपटाचार । वर्णिलाब्यायशींओव्यानीं ॥३२॥

पंचमांत अध्येदोन । देवदैत्याचेंभांडण । अंबेचेतेथेंअवतरण । वर्णिलेंएकसष्ठओंव्यानीं ॥३३॥

साहव्यामाजीअध्येतीन । श्रीकृष्णाचेअवतरण । षडपुत्राचेंहनन । एकाहत्तरओव्यांनें ॥३४॥

सातव्यांतएकसमास । कृष्णबालचरित्रास । वर्णिलेंयेथेंसुरस । पंचांणवओंव्यानीं ॥३५॥

आठव्यामाजीदोन । कृष्णाचेचरित्रसंपूर्ण । अंबाकरीवर्णन । एकशेंअठ्ठावनओंव्यांनीं ॥३६॥

श्रीकृष्णाचेचरित्र । दश अध्यायेविचित्र । चारविजयाचेपवित्र । तीनशेंशाहत्तरओव्यानें ॥३७॥

चतुर्थस्कंदभागवत । अध्येपंचवीसयांत । चौदाशेंसत्तावीसगणित । श्लोक असतासुंदर ॥३८॥

देवीविजयाचेसमास । नऊअसतीसुरस । सातशेंचारओवीस । गाइलेयेथेंदेवीनें ॥३९॥

पंचमप्रथमीतीन । महिषासुराचेंआख्यान । एकसष्ठओवीकरुन । वर्णिलेंसेंप्राकृतें ॥४०॥

दुज्याचेहीअध्येचार । महिषेंजिंकिलेसर्वसुर । सत्याहत्तरओंव्यासुंदर । देवमंत्रबहुवसे ॥४१॥

पांच अध्येतिसर्‍यांत । महालक्ष्मीप्रगटहोत । चरित्रहेंचमत्कृत । चवर्‍यांणवओव्यानीं ॥४२॥

तीन अध्येचौथ्यांत । महिषससैन्यवधयांत । भयंकररसबहुत । वर्णिलाबासष्टओव्यानीं ॥४३॥

तीन अध्येपंचमांत । महिषाचावधहोत । सुरस आख्यानबहुत । सत्तरओव्यावर्णिल्या ॥४४॥

साहव्यांत अध्याएक । लक्ष्मीस्तवसंम्यक । वर्णिलेंवरदानादिक । एकसष्ठओवीनीं ॥४५॥

सहाअध्येविजयाचे । एकुणीसभागवताचे । अक्राशेंपंधराश्लोकत्याचे । ओव्याचारशेंपंचवीस ॥४६॥

हेंमहिषवधचरित्र । लक्ष्मीअवतारपवित्र । श्रवणेंपठणेंइहामुत्र । सहजलाधेभक्ताशी ॥४७॥

सातव्यांत अध्येचार । माजलायेथशुंभासुर । कौशिकीचाअवतार । वर्णन ऐशींओव्यांनी ॥४८॥

अष्टमांतहीअध्येचार । धुम्राक्षचंडादिसंहार । चामुंडेचाअवतार । वर्णिलात्रेपनओव्यानीं ॥४९॥

रक्तबीजाचेहनन । ब्रम्हादीशक्त्यावतरण । अध्येनवमांतदोन । सत्तरओंव्याजाणिजे ॥५०॥

दशमामाजीदोन । शुंभनिशुंभमर्दन । पार्वतीचेतिरोधान । वर्णिलेंबावनओंव्यानी ॥५१॥

पांचसमासविजयाचे । षोडश अध्येभागवताचे । सातशेंएकसष्टश्लोकत्याचे । दोनशेंपंचावनओंव्याही ॥५२॥

हेंशुंभनिशुंभमर्दन । सकलराक्षसाचेकंदन । नवशक्तीचेंअवतरण । पावनकरीप्रेमळा ॥५३॥

एकादशामाजीचार । सुरथासिदिधलावर । जगद्धात्रीअवतार । एक्कावनओंव्यानीं ॥५४॥

पंचमस्कंदविजयाचे । अक्राअध्यायसाचे । पसतीसजाणाभागवताचे । देवीचरित्रसुंदर ॥५५॥

दोनहजारचौर्‍यांऐशी । श्लोकजाणसुरसी । सातशेंएकतीसओंवीशी । स्कंदयेथेंसंपविला ॥५६॥

षष्ठप्रथमांतचार । आख्यानजाणावृत्रासुर । विश्वरुपाचासंहार । ओंव्यापासष्टतयाच्या ॥५७॥

पांच अध्येदुसर्‍यांत । इंद्रवृत्रातेमारित । नहुषेंद्राचेचरित । ब्यांणवओंवीजयाची ॥५८॥

नऊ आणिदोन । अध्येयाचेक्रमेंजाण । पांचशेंत्रेसष्टश्लोकाख्यान । एकशेंसत्तावनओंव्यानी ॥५९॥

हेंवृत्रासुराचेआख्यान । करीश्रोत्यासीपांवन । जाणिजेवेदसमान । देवीचरित्रविचित्रहें ॥६०॥

युगधर्माचेवर्णन । तिसर्‍यामाजीअध्येदोन । एकशेंसहाश्लोकपावन । ओंव्याजयाच्याशाहत्तर ॥६१॥

चौथ्यामाजीअध्येचार । वसिष्टगाधिजपरस्पर । शापयोगेंकठोर । आडीबकजाहले ॥६२॥

तैसेंचनिमिवसिष्ठ । मिथःशापेंजाहलेनष्ट । पुनरुदभववसिष्ठ । वर्णिलेंब्यांण ओंव्यानी ॥६३॥

पांचव्यांत अध्यायतीन । और्वभार्गवजनन । लक्ष्मीसशापीनारायण । अष्ट्याहत्तरओंव्यानी ॥६४॥

एकवीराचेजनन । सहाव्यांत अध्येतीन । पंचांणवऐव्याकरुन । सुरस आख्यानवर्णिलें ॥६५॥

सातव्यामाजीदोन । हैहयेश्वरआख्यान । विवाहादिवर्णन । सत्तेचाळिसओव्यानी ॥६६॥

हैहयाचेचरित्र । आठ अध्येविचित्र । चारशेंत्र्यांयशीश्लोकपवित्र । श्रीमत्पुराणजाणिजे ॥६७॥

देवीविजय अध्येतीन । हैहयचरित्रपावन । दोनशेंवीसओव्यान । गोडपावनवर्णिलें ॥६८॥

आठ आध्येअठव्यांत । नारदमोहाचेचरित । चारशेंसत्तरश्लोकयांत । एकशेंबाविसओंव्यानीं ॥६९॥

नवमांतदेवीपूजन । कृपार्णवरुपेंप्रार्थून । पूर्वार्धांतीलभक्तजन । वर्णिलेअष्ठोतरशतें ॥७०॥

दहावाहामणिबंध । चरित्राध्यायप्रबंध । ऐकतांतुटेभवबंध । ऐंशीओव्याजाणिजे ॥७१॥

एकतीस अध्येषष्ठाचे । अठराशेंब्यायशीश्लोकसाचे । चरित्रसर्वदेवीचे । व्यासवर्णींभागवती ॥७२॥

देवीविजयदशाध्याय । आठशेंपंचावनओव्यामय । देवीचरित्र अव्यय । देवीनेंचगाइलें ॥७३॥

पूर्वार्धाचेगायन । जोकरीलनरभक्तीन । नारीनरसर्वपावन । श्रवणेंपठणेंविजयाच्या ॥७४॥

पुत्रपौत्रधनयश । प्राप्तहोयबहुवस । सर्वरोगांहोयनाश । श्रवणेंपठणेंनिश्चयें ॥७५॥

अंबेचेकृपेकरुन । भक्तांसींकांहींनसेनून । भोगमोक्षविज्ञान । प्राप्तहोयभाविकां ॥७६॥

जयजयवरदेशारदे । जयदुर्गेपारदे । जयजयभर्गेसर्वदे । नमोनमोनमोस्तुते ॥७७॥

जयजननीसुधामये । जयपालिनीविश्वमये । जयहारिणीअव्यये । नमोनमोनमोस्तुते ॥७८॥

जयकुमारिकेकन्ये । जयसर्वपूज्येधन्ये । जयहरिहरादिमान्ये । नमोनमोनमोस्तुते ॥७९॥

जयपरदेवतेषोडशी । जयभट्टारिकेकामेशी । जयविद्येभुवनेशी । नमोनमोनमोस्तुते ॥८०॥

इतिश्रीमत्परमहंसस्वच्छंदानंदस्वामिविरचिते श्रीदेवीभागवत्सारसंग्रहे  श्रीदेवीविजये पूर्वार्धः समाप्तः ॥१०॥

शुभंभवतु ॥

इतिपूर्वार्धे षष्ठ स्कंदः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP