षष्ठः स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीअंबिकायैनमः । व्यासम्हणेनृपाशी । शिवगेलाकैलासी । सवेंचचित्ररुपगणाशी । विष्णुकडेधाडिले ॥१॥

तोवैकुंठीयेउनी । प्रवेशेआज्ञाघेऊनी । नारायणातेवंदूनी । नम्रपणेंतिष्ठला ॥२॥

देवेंतयादेखिलें । शिवाचेकुशलपुशिलें । कार्यकायनिरुपलें । सांगम्हणेचित्ररुपी ॥३॥

बोलेतेव्हांशिवदूत । तुजसीकायनकळत । विश्वसाक्षीगुणातींत । परमेश्वरसर्वज्ञतूं ॥४॥

तथापीहीलोकरीती । सांगेनकार्यनिगुती । मजप्रेषीउमापती । वृत्तकांहींकळवाया ॥५॥

शिवबोलिलावचन । तेंचमीसांगेन । ऐकिजेकींजेंवर्तन । शिवह्रदयाकोमला ॥६॥

शापयोगेंतमसातीरीं । कमलातपाआचरी । सहस्रवर्षेंदुःखभरीं । पीडिलीवाजिरुपें ॥७॥

सर्वजगाचीजननी । सर्वजगाचीपालिनी । जगामाजीतिजवांचुनी । सुखकोणानहोय ॥८॥

तीजरीहोयदूर । लोटतीक्लेशाचेभार । तीवांचूनवर्षेंहजार । केवींकंठिलीभगवंता ॥९॥

ममपत्नीदाक्षायणी । दग्धझालीदक्षयजनीं । दुखःसोसिलेंअतिकठिणी । वर्णूकायमुरारे ॥१०॥

बहुकालानंतर । तिणेंकेलेंजन्मांतर । हिमनगकन्यासुंदर । प्राप्तहोतांसुखावलो ॥११॥

स्त्रीविरहसायास । जाणतोमीबहुवस । तूंटाकोनिलक्ष्मीस । स्वस्थकेवीनवलहें ॥१२॥

आतांपुरेऐसाकोप । दुरकरीरमाशाप । स्वयेहोवोनीहयरुप । दर्शनद्यावेंकांतेशीं ॥१३॥

दिव्य उपजवीसुत । दोघेयावेवैकुंठांत । एवंवदलागौरीकांत । कमलाकांताजाणिजे ॥१४॥

व्यासम्हणेनृपालागुन । एवंदूतवाक्य ऐकून । म्हणेतसेंचिकरीन । जायदूताचित्ररुपा ॥१५॥

देवेंदूतापरतविलें । कांतेमाजीचित्तगुंतलें । हरीनेंहरीरुपधरिलें । हरीरुपझांकुनीया ॥१६॥

झालावाजीमनोहर । मदेंहिसेंकरीफुर्फुर । पातलावेगेंतमसातीर । अवलोकिलारमेनें ॥१७॥

ओळखिलाआपुलाकांत । रमाझालीहर्षभरित । प्रेमाश्रूनयनीयेत । रमारमलीस्वरमणी ॥१८॥

अश्व अश्विनीएकत्र । होतांचिप्रगटलापुत्र । रुपेंजेंवीबाळमित्र । विष्णुअंशतेजस्वी ॥१९॥

हरीम्हणेहोकांते । घेईआतांस्वरुपातें । दिव्यरुपलक्ष्मीकांते । होवोनिबैसलेविमानीं ॥२०॥

हरिम्हणेरमेशीं । येथेंचराहूंदेबाळाशीं । दणेंययातीपुत्राशीं । तुर्वसुमजध्यातसे ॥२१॥

भयनाहींबाळाशीं । एवंबोधूनरमेशी । संस्तूयमानवेगेंशी । जायजेथेंतुर्वसू ॥२२॥

तूर्वसूचीजीवासना । तोचिग्रीष्मऋतूंजाणा । शतवर्षेतपलाराणा । सूर्यतापतोचिपै ॥२३॥

इंद्रियांचेजेंदमन । तेंचिशुष्ककानन । योगस्तब्धझालेंमन । संकल्पसर्वराहिले ॥२४॥

मनतेंचिसरोवर । संकल्पाचेभरलेनीर । उग्रतपचंडकर । शुष्कझालेंसहजची ॥२५॥

इंद्रियांच्याअनेकवृत्ती । हीचवृक्षपानेंझडती । प्राणायामेंचंडगती । महावातेरेचके ॥२६॥

दृष्टीचेकेलेंस्तंभन । नहोयविषयदर्शन । तेंचिनासलेंकोमलवृण । तपातपेकरुनिया ॥२७॥

क्षुद्रजळाल्यावासना । क्षुद्रनद्यात्याचीजाणा । प्राणवायूचीधारणा । कठिणपथतपाचा ॥२८॥

हलाकीहोयचालता । तृष्णातृषाव्याकुलता । वृक्षविचारदेखता । सघनसीतलसावली ॥२९॥

प्रपातेथेंठेविली । शांतीउदकनिर्मळी । भक्तीतेथेंबैसली । जलपानकरवावया ॥३०॥

येथेंजीववाटसरु । क्रोधलोभयाचेलुटारु । घेतीबळेंमनवारु । पादचारीशिणावे ॥३१॥

दमवैराग्यसवेअसे । तरीमगभयनसे । ब्रह्मपूर अनायासें । सापडेंपुढेंधीद्वार ॥३२॥

असोएवंतोतपला । तेणेंहरिसंतोषला । प्रत्यक्षतयाभेटला । रमेसहश्रीहरी ॥३३॥

प्रत्यक्षभेटलाहरी । हरीवर्माहर्षभरी । प्रेमेंसदगद अंतरी । लोटांगणेंकरीतसे ॥३४॥

मधुरपद्येंकेलास्तव । वरमागम्हणेमाधव । पुत्रदेइजेअभिनव । तुजसमम्हणेतो ॥३५॥

वरदानबोलेहरी । त्वांजावेंतमसातीरीं । तुजसाठींम्यारमोदरीं । बाळनिर्मूनिठेविला ॥३६॥

जाऊनिघेईसत्वर । नामठेवीएकवीर हयहयाचावंशधर । महावीरबाळतुझा ॥३७॥

एवंतयावदोनी । रमेसहशार्ग्डपाणि । पावलावेगेंस्वसदनीं । नृपजायनदीतीरा ॥३८॥

बाळासीतेथेसोडून । गेलाजेव्हांनारायण । तेव्हांचीचंपकेयेऊन । बाळपाहिलाएकटा ॥३९॥

आनंदेंतोविद्याधर । बाळ उचलोनिसत्वर । पावलावेगेंशक्रपूर । वृत्तपुशिलेंइंद्राते ॥४०॥

ऐकोनितोपरतला । बाळजागींचंठेविला । चंपकजोपरतगेला । तवपातलातुर्वसु ॥४१॥

देखिलातेणेंदिव्यकुमर । प्रेमेंउचलिलासत्वर । पातलावेगेंस्वनगर । महोत्सवकरितसे ॥४२॥

बाळदेउनिस्त्रियेशी । वृत्तसांगेअतिहर्षीं । तिणेंलाविलास्तनासि । पान्हाफुटलासत्वर ॥४३॥

वाद्येंवाजतीअपार । रायेंफोडिलेंभांडार । शुंगारिलेंसर्वनगर । महोत्सवघरोघरी ॥४४॥

पुत्रप्रावृटपातला । आनदवारासुटला । हर्यात्मामेघवळला । स्वयेचपलाझळाळे ॥४५॥

राजगृहीकोलाहल । याचककरितीबहुसाल । यथेच्छन्याम्हणेनृपाळ । मेघगर्जनाहीचितेथें ॥४६॥

पात्रापात्रविचार । नसेतोचिअंधकार । द्रव्येंरत्नेंवस्त्रालंकार । घनधारावर्षती ॥४७॥

बारादिवसांचीझडी । रावमेघडोळानुघडी । तृप्तयाचकगृहनीडी । पक्षीसर्वदडाले ॥४८॥

याचकारत्नेंमिळती । पळतांकरीझळकती । काजव्यापरीशोभती । राजमार्गेआकाशीं ॥४९॥

अतिशयेंजेलोभावले । घरींदारींधावले । क्षूद्रनद्यापरीशोभले । मूळस्वभावतेंचिपाणी ॥५०॥

जेतेथेंप्रतिष्ठित । राजद्वारींनयेत । नृपतयाघरीधाडित । तडागतोचियेथीचे ॥५१॥

विरक्त आणिउदार । तेजैसेगिरीवर । नृपदेईंअपार । परीतेनठेविती ॥५२॥

असोनृपेंअपारधन । वेचिलेंबहुसंतोषोन । मुलाचेजातकपाहून । नामएकवीरठेविलें ॥५३॥

बीजेपासावहळूंहळूं । चंद्रवाढेंतेजाळूं । तेवीबाळहीसोज्वळूं । मासपक्षींवाढतसे ॥५४॥

तिजेमासीकुशीवळें । पदांगुष्ठचाटीबळें । सुशोभितनेत्रकमळें । चंद्रापरीमुखकमळ ॥५५॥

गुटगुटींतबाळसें । चिमणेहातगोंडसें । बाळलेणेंबहुवसे । लेवविलादृष्टमणी ॥५६॥

यांचसाहासातव्यांत । क्रमेंतेव्हांरांगत । बाळखोडीजेव्हांकरीत । सुखावतीमातापिता ॥५७॥

एकवर्षाचाहोताकुमर । चालेपडेसुकुमार । नानाखेळमनोहर । करीतसेतेधवां ॥५८॥

एवंपांचवर्षेंहोतां । नृपचूडाकरीतत्वता । द्वादशवर्षंलागतां । मौंजीबंधनकरविलें ॥५९॥

गुरुज्याचाभार्गव । सर्वविद्याअतिलाघव । सर्वगुणाचाअभिनव । निधीचकेवळदुसरा ॥६०॥

पाहूनपुत्राचेतरुणपण । राज्यपदींस्वयेंस्थापुन । तुर्वसूनेंसेविलेंवन । पत्नीसहविरक्ततो ॥६१॥

राज्यकरीएकवीर । रुपादिसंपत्तीअपार । अद्वितीयविष्णुकुमर । उणीवकायमगतेथें ॥६२॥

रुपेंदुसरापंचबाण । विद्येमाजीगजानन । कलाकुशलपरिपूर्ण । त्वष्टाचिकीदूसरा ॥६३॥

शूरजेवीषडानन । दाताजेवीउमारमण । पृथ्वीपरीक्षमावान । गंभीरजेवीवारिधी ॥६४॥

रामापरीशस्त्रधर । अग्नीपरीदुर्धर । अमृताहूनिमधुर । रम्यभाषणजयाचे ॥६५॥

नीतिज्ञजेवीयम । शत्रूसीतोकालसम । तोचिमित्राइंदुसम । ज्ञानीजनकदूसरा ॥६६॥

भोगीविष्णुदुसरा । योगीकंपिल अवधारा । रोगीकेलेमहावीरा । शस्त्रयोगेंशत्रूंसी ॥६७॥

शांतीजेविचतुरानन । सुपर्णापरीवेगवान्‍ । वायूपरीबळवान । सूर्यापरीतेजस्वी ॥६८॥

अनेकऋतूंनानादानें । विप्रतोषविलेबहुमानें । मंत्रिवर्गरक्षीभयानें । पुत्रवत्प्रजेसी ॥६९॥

परस्त्रीआणिपरधन । टाकिलोंमनेंजेवींवमन । अक्षमृगयामद्यसेवन । मितक्रियसर्वदा ॥७०॥

सैन्यजेवीसागर । संपत्तीजेवीकुबेर । सत्तावर्तेंपुरंदर । थरारतीपरशत्रूं ॥७१॥

अतिभक्त अतिशांत । धर्मशालीमहादांत । एकछत्राभूमीपाळित । निष्कंटकसर्वदा ॥७२॥

अपमृत्युरोगजरा । यासीकोठेंनसेथारा । शरण आलेनृपवरा । स्थळसांगम्हणतीते ॥७३॥

भक्ष्यपशुमाजीस्थळ । अपमृत्यूसदेतनृपाळ । रोगादिलेंचंद्रमंडळ । जराधाडिलीकामादिकीं ॥७४॥

अवर्षणदोषदुष्काळ । नस्पर्शतीभूमंडळ । रितेझालेनर्कसकळ । शुद्धाचरणेंजयाच्या ॥७५॥

चारीवर्ण आणिआश्रम । नीटचालतीयथाक्रम । चोरजारकपटवाम । नामशेषराहिले ॥७६॥

विप्रगायवेदगुरु । मातापिताअतिथीथोरु । मानपावलेनिरंतरु । सर्वभूतींसर्वदा ॥७७॥

दंडएकछत्रादिसे । भेदरुपीमात्रभासे । दानसर्वत्रभरलेंसे । सामतैसोचसर्वत्र ॥७८॥

सर्वझालेज्याचेमित्र । ऐसेंआचरणपवित्र । नवलनसेंतोविष्णुपुत्र । विष्णुतुल्यसाजिरा ॥७९॥

कितीजरीकेलेंकथन । तरीतेतेथेंभासेउण । असोऐसातोनृपनंदन । राज्यकरीत आनंदे ॥८०॥

पित्याचेऐकूनमरण । सांप्रदायिककेलेंपूर्ण । गोभूहेमवस्त्रदान । केलेंबहुतयानें ॥८१॥

श्रीजान्हवीचेतीरीं । एकदांनृपविहारकरी । अनेकवृक्षांच्याहारी । आश्रमादिपाहतसे ॥८२॥

तवगंगाजलामाझारी । शतपत्र अतिसुंदरी । पाहिलेंसुगंधीमनोहरी । तोंदेखिलीवारांगना ॥८३॥

तरुणीनुतनसुदती । कृशांगीबहुरुपवती । रुदनकरीदुःखचित्ती । तियेसीबोलेनृपाळ ॥८४॥

तूंकोणाचीकोण । कांकरीसीरुदन । वेगेंसांगदुःखकारण । निवारीनस्वयेंमी ॥८५॥

माझेंराज्यांतप्रजसी । दुःखनसेंनिश्चयेशी । कोणेपीडिलेतुजसी । सांगसत्वररडूनको ॥८६॥

एव ऐकतांचिवचन । सांगेनारीदुःखकारण । तवराज्यापासून । दूरदेश असेमाझा ॥८७॥

तेथीचारभ्यनामेंनृपती । त्यासनोहेसंतती । रुक्मरेख्यात्याचीसती । दुःखित असतीस्त्रीपुरुष ॥८८॥

नृपेंमगपुत्रार्थ । यज्ञकेलेसमर्थ । कुंडांतूनीशोभिवंत । कन्याएकप्रगटली ॥८९॥

सुवर्णाचीचतीलता । रुपेंसाक्षाद्रतिदेवता । सर्वलक्षणसंयुक्ता । मुक्तामालेचियेपरी ॥९०॥

नृपासीदेईहोता । म्हणेकन्याघेईतत्वता । एकावलीनामेख्याता । होईलम्हणेनृपपत्नी ॥९१॥

रावतेव्हांसंतोषभरी । कन्येचेजातककरी । दोघेहीसुखसागरी । निमग्नझालेनृपाळा ॥९२॥

पुत्रासमतीनृपाप्रती । मीमंत्रिकन्यायशोवती । सखीतीचिनिश्चिती । जाणमजविश्वासे ॥९३॥

सुगंधकमलेंजेथेंअसती । तेथेंतिजलाबहुप्रीति । मजसमेंतयास्थळांप्रती । नित्यनित्ययेतसे ॥९४॥

श्लोकएकशेंसत्तर । एकवीरचरित्रसुंदर । येथेंवर्णिलेंकिंचितत्सार । अंबचरित्र अंबेनें ॥९५॥

देवीविजयेषष्ठेषष्ठः ॥६॥       

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP