चतुर्थ स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । चाक्षुषमनूचेअंतरी । हरिअवतरेधर्मघरी । नरनारायणनामेंचराचरीं । प्रसिद्ध असेनृपाळा ॥१॥

वैवस्वतमन्वंतरी । दुजेंयुगींअत्रिघरीं । विष्णुस्वयेंअवतरी । दतात्रयजाहला ॥२॥

तीनीदेव अनुसुयेसी । गेले एकदांछळायासी । नग्नहोऊनीदेभोजनांसी । म्हणतीतिघेंवृद्धरुपें ॥३॥

अनुसूयामहासती । आश्रमीनव्हतापती । जलशिंपूनितयांवरती । बाळेंकेलीसतीनें ॥४॥

मगसोडूनवसन । करविलेंतिघांस्तनपान । तिघांहीपाळण्यांतघालून । गाणीह्मणेमधुरती ॥५॥

पतीआलाघरासी । वृतांतकळलातयासी । पूर्वरुपेंदिलींतिघांसीं । अनुसूयेनेंतेधवा ॥६॥

तेव्हांहोऊनीप्रसंन । मागह्मणतीवरदान । सतीह्मणेसुतहोऊन । येथेंरहातिघेंही ॥७॥

विधीसोमहरीदत्त । दुर्वासझालाउमाकांत । अत्र्याश्रमींराहत । संतोषार्थसतीच्या ॥८॥

चोथेंयुगींवैवस्वती । नृसिंहझालारमापती । हिरण्यकशिपूदुर्मती । मारुनरक्षीप्रल्हादा ॥९॥

पुढेंहोऊनीवामन । बलीचेकेलेबंधन । एकुणीसावेंयुगींजाण । त्रेतींपरशुरामजाहला ॥१०॥

पृथ्वीनिःक्षत्रीकरुन । कश्यपासीकेलीदान । मातृवैरनिवटिलेंतेण । रुधिरेंतर्पिलेमातेशीं ॥११॥

त्रेतायुगींरघुकुळीं रामझालामहाबळी । वधूनिरावणसकुळीं । सर्वदेवसुखीकेले ॥१२॥

अंशेंतेनारायण । द्वापरींझालेकृष्णार्जुन । एवंप्रकृतिवशहोऊन । वारंवार अवतरे ॥१३॥

कृष्णावतारचरित । ऐकनृपाएकचित्त । भूमिझालीभाराक्रांत । शरणगेलीइंद्राशीं ॥१४॥

गोरुपहोऊनीदीन । शक्रापुढेंकरीरुदन । विचारितांवर्तमान । सांगेविस्तारेकरुनी ॥१५॥

जरासंधशिशुपाल । काशिराजरुक्मीप्रबल । कंसशाल्वनरकरवल । केशिधेनुकवत्सकांदि ॥१६॥

हेअधर्मींपापाचार । तेणेंमजजाहलाभार । सहननसेदुराचार । कायकरुंकोठेंजाऊं ॥१७॥

पूर्वीहिरण्याक्षेंनेली । रसातळींमजठेविली । वराहरुपेंउद्धरिली । स्थापिलीमजनारायणें ॥१८॥

नातरीसुखेंपाताळीं । राहिलेंहोतेंनिजेली । आतांपुढेंयेणारकली । त्वरेंजाईनरसातळां ॥१९॥

भारमाझादूरकरी । एवंवदोनीपायधरी । इलेसहवृत्रारी । शरणगेलाब्रह्मदेवा ॥२०॥

तयासर्वांसहित । विधीजायविष्णुप्रत । तयाचेंघेऊनमत । स्तवनकरितोदेवीचें ॥२१॥

तंतूजेवीउर्णनाभीं । स्फुलिंगजेवीअग्निगर्भीं । नक्षत्रेंजेवींदिसतींनभीं । दिसेजगजींमध्यें ॥२२॥

जीचेमायेकरुन । चराचरहेंनिर्माण । जीचेहेंसमस्तभुवन । स्मरुंनमूंतियेशी ॥२३॥

जियेचेनहोतांज्ञान । संसार असेनिर्माण । लाधतांजियेचेज्ञान । भवनासेसमूळी ॥२४॥

तिचेकरुंआम्हींस्मरण । तिचकरीलप्रेरण । महालक्ष्मीहेंचिज्ञान । धारणाहीच आमुची ॥२५॥

तिच आम्हांसिदेवी । सर्वकार्यातेंसुचवी । यंत्रहेंतीचफिरवी । नातरीजडसर्व ॥२६॥

नमस्कारकरितोतुजसी । प्रसंनहोय आम्हांशी । दयार्द्रहोऊनीमानसीं । भारहरीधरेचा ॥२७॥

जरीतूंदयानकरसी । रणीयोग्यताकायमजशी । यक्षरुपेंदांविशी । नजळेतृणपावकें ॥२८॥

नारायणेंअसुरमारिले । अंशेंतेपृथ्वीपतीझाले । धर्मसर्वलोपावले । दुष्टाचारतयांच्या ॥२९॥

महिषशुभांदिमहासूर । जेविमारलेअपार । तेवीहेनृपरजनीचर । संहारीआतांसत्वरी ॥३०॥

प्रकटेविनतीऐकून । देवीह्मणेकार्यकरीन । तुम्हींहीअंशेंकरुन । पृथ्वीमाजीअवतरा ॥३१॥

कश्यपहीभार्येसहीत । शापयोगेंपृथ्वीप्रत । होईलयादवकुलांत । अनकदुंदुभीम्हणवेल ॥३२॥

भ्रुगुशापेभगवानहरि । येईलतयाचेंउदरी । मीस्वयेंयशोदाघरीं । जन्मकरीन आपुलें ॥३३॥

कारागृहांतूनहरीसी । पोंचवीनगोकुळांसी । देवकीगर्भांतूनशेषासी । घालीनगर्भींरोहिणीच्या ॥३४॥

इंद्रांशेंनर अर्जून । होईलतोपंडुनंदन । करितील असुरकंदन । माझेंशक्तीयोगेनें ॥३५॥

धर्मांशेंधर्मनंदन । वायुअसेंभमिसेन । दस्त्रांशेंकरुन । नकुलसहदेवमाद्रीचे ॥३६॥

वसुअंशेंगांगेय । सर्वकरितीलदुष्टक्षय । निमित्तकरुतनिश्चय । क्षयीनमीचसर्वांशीं ॥३७॥

कुरुक्षेत्राक्षत्रियक्षय । प्रभासींयादवक्षय । विप्रशापेविष्णुअव्यय । कलेंवरटाकीलतो ॥३८॥

ममतातृष्णापापमती । जिगीषामदमोहवाढती । तेणेंयादवसर्वनासती । रणकरुनीपरस्परे ॥३९॥

स्त्रियांसहसर्वांनीं । मथुरागोकुळींअवतरोनी । पुढेंकरुनशार्ड्गपाणी । सहायव्हावेंसमस्त ॥४०॥

व्यासम्हणेनृपालागुन । अंबाएवंबोलोन । सवेंचझालीअंतर्धान । सर्वगेलेगुहांत ॥४१॥

दशऊनदोनशत । कृष्णावतारचरित । अंबाबोलेप्राकृत । दीनोद्धारकराया ॥४२॥

देवीविजयेचतुर्थेषष्ठः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP