तृतिय स्कंध - अध्याय नववा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । कृष्णासीनृपविचारी । रामकेवींव्रतकरी । केवींनेलीत्याचीनारी । राज्यभ्रष्टकसासांगा ॥१॥

व्यासम्हणेपरियेशी । राजादशरथ अयोध्येशी । महाधार्मिकसूर्यवंशी । चारपुत्रतयाचे ॥२॥

कौसल्येशीरामसुत । कैकयीसझालाभरत । सुमित्रेशीजुळेंहोत लक्ष्मण आणिशत्रुघ्न ॥३॥

तेझालेकिशोर । सुरुप आणिधनुर्धर । नृपेंकेलासंस्कार । प्रियकरबहूतयाशी ॥४॥

तयाचेंषोडषवर्षी । प्राप्तझालागाधिजऋषी । यज्ञसंरक्षकणाशी । रामाप्रतीतोमागे ॥५॥

करायासत्यरक्षण । वसिष्ठानुमतेंकरुन । दिधलेंरामलक्ष्मण । घेऊनीमुनीचालिला ॥६॥

ताटिकाघोरराक्षसी । गुरुवचनेंरामेंतिशीं । एकबाणेंदिव्यलोकांशीं । पाठविलीअतिदुष्टा ॥७॥

करितीदोघेंमखरक्षण । रामेंसोडिलाएकबाण । सुबाहूकेलागतप्राण । मारिचपाडिलासागरीं ॥८॥

बाणपुंखप्रभंजन । मारीच उडालातेण । सर्वमारिलेंत्याचे सैन्य । लक्ष्मणानेंतेधवा ॥९॥

एवंमखसंपऊन । दोघांसहगाधिनंदन । मिथिलेसीजातांमार्गान । राम उद्धरीगौतमवधू ॥१०॥

जनकेंकेलाअसेपण । भंगिलेंरामेंशरासन । रमांशसीतासूजाण । माळघालीरामचंद्रा ॥११॥

उर्न्मिलादिलीलक्ष्मणा । जनकबंधूयादोनकन्या । दिधल्याभरतशत्रुघ्ना । पाचारुनिविदेहे ॥१२॥

चौघेंहीशुभलक्षण । रामज्येष्ठगुण । यासींचपदसमर्पण । नृपमानसीविचारी ॥१३॥

अभिषेकसामग्रीपाहून । कैकेयीमागेवरदोन । ठेवकाढिलीपुरातन । मंथरेच्याविचारें ॥१४॥

एकेवरेंराज्यभरत । करीलह्मणोनिश्चित । प्रातःकाळींचवनांत । रामेंचौदावर्षजावें ॥१५॥

एवंमाझेंदोनवर । नमिळतांमजसत्वर । प्राणहानीनिर्धार । नृपातुजनर्कगती ॥१६॥

ऐकतांचिऐसेंवचन । रामेंसेविलेंघोरवन । सवनिघालालक्ष्मण । सीतासतीजायपाठ ॥१७॥

पुत्रदुःखेंतोनृपती । गेलास्वर्गलोकगती । भरतेंजाणूनमातृकृती । राज्यस्वीकारनकरितो ॥१८॥

पंचवटींतराहेराघव । शूर्पणखेचीपाहूनमान । तिचाकेलागौरव । कर्णनासाछेदनें ॥१९॥

खरदूषण आणित्रिशिरा । क्रोधेंपातलेसमरा । रामपाठविलेयमपुरां । नलागतांक्षणएक ॥२०॥

शूर्पणखालंकेसगेली । रावणासीमातकळली । त्याणेंयेऊनीमावरचिली । सीताहरणकराया ॥२१॥

रत्नमृगमारीचझाला । सीताश्रमींनाचूलागला । जानकीमागेचर्माला । रामजायदैववशें ॥२२॥

मृगापाठींगेलादूर । ताडितांचित्यासीशर । रामापरीआक्रंदेथोर । धांवबंधोह्मणेकपटी ॥२३॥

ऐकूनिसीतातोस्वर । ह्मणेलक्ष्मणाजायसत्वर । नजायह्मणेदेवर । रामवाक्यनोल्लंघ्य ॥२४॥

यात्रैलोक्यामाझारीं । ऐसाकोणरामामारी । एकलीतुजवनांतरी । सोडूनियाकेविजाऊं ॥२५॥

एवंऐकूनिवचन । भावियोगेंअतिकोपून । अक्रुरातेहीक्रुरवचन । बोलेतेव्हालक्ष्मणा ॥२६॥

दुखिततोसाश्रुवदन । दैवप्रबळम्हणून । निघालातिजवंदून । रामदर्शनाकारणें ॥२७॥

एकलीसीतापाहून । यतीरुपेआलारावण । बळेंचसीताउचलून । निराळमार्गेचालला ॥२८॥

सीतेचेंऐकिलेंरुवन । जटायूआलाधांऊन । रथतयाचाभंगून । मार्गीरावणरोधिला ॥२९॥

परीबलाढयरावण । तयापाडिलेंपक्षछेदून । सवेंचीपावलास्वस्थान । सीतेसहितदुरात्मा ॥३०॥

सीताठेवीअशोकतळी । तीससमजावीवेळोंवेळीं । वशनोहेचीकदांकाळीं । महासाध्वीपतिव्रता ॥३१॥

मृगामारुनरघुवर । परतयेतसत्वर । लक्ष्मणापाहूनिसमोर । किंचिद्वदेनिष्टुरतो ॥३२॥

आश्रमाआलेदोघेजण । सीतेसीतेथेंनदेखोन । दुःखभरेंतेगहनवन । फिरतीशोधार्थतियेच्या ॥३३॥

जटायूमुखेंकळलेंवृत्त । तयाचाझालादेहान्त । संस्कारुनितयापितृवत । जायरामवनोवनीं ॥३४॥

मार्गींमारिलाकबंध । वानरासीपडलासंबंध । रामेकरुनिवाक्बंध । मित्रसुग्रीवजोडिला ॥३५॥

एकबाणेंवालीमारिला । राज्यींसुग्रीवस्थापिला । आपणपर्वतींराहिला । वृष्ठिकालींबंधूसह ॥३६॥

सीताविरहेंदुःखित । रामह्मणेबंधूप्रत । कोसळलादुःखपर्वत । व्यर्थजिणेंजाहलें ॥३७॥

कैकयीसीसुखझालें । पितयासीमरण आले । स्वकीयराज्यहीगेलें । वनवासमिळाला ॥३८॥

सर्वदुःखांटाकूनीमागें । सुखींहोतोंसीतानुरागे । तिहीनेलीदैवयोगें । लंकाधीशेंयेकाळीं ॥३९॥

केवींदुःखातेंसहन । करीलप्रियामजवांचून । केवीराहीलतिचाप्राण । राक्षसामाजीलक्ष्मणा ॥४०॥

वशनहोयकदांकाळीं । रावणासीतीवेल्हाळी । दुःखलिहिलेंकपाळीं । प्राणहीदेहानटाकी ॥४१॥

सीतेचाजाताप्राण । किमर्थंहादेहरक्षण । तूंहीमजसवेंयेऊन । दुःखभागीझालाशी ॥४२॥

मनुकुळींसूर्यवंशी । जन्महोऊनीआम्हांशी । भोगावेंएवंदुःखाशी । धिक्कार असोआम्हात ॥४३॥

ऐकूनीज्येष्ठाचेंवचन । महाधीरतोलक्ष्मण । करीतेव्हांशांतवन । नानावाक्येंकरुनी ॥४४॥

ह्मणेरामाकालगती । भोगीतांयेथेंकायखंती । धैर्येकीजेमनाशांता । धीरवीरेसमर्थतूं ॥४५॥

सुखदुःखांदिसर्वभाव । मनचीकरीअनुभव । आत्मारामीस्वानुभव । दुःखस्पर्शकैचातेथें ॥४६॥

देहांमाजीषडिवकार । तेचिहेंसुखदुःखाकार । आत्माएकनिर्विकार । सुखघेइजेअनुभवें ॥४७॥

दुःखमयहासंसार । धैर्य उद्यमयेथेंसार । रावणावधनिसाचार । आणीनसीतास्वयेंमी ॥४८॥

साह्यकोटिशावानर । शोधूनीकाढितीदिगंतर । प्रयत्नकेल्यापरमेश्वर साह्यकरीसर्वथा ॥४९॥

दुःखमूलहासंसार । त्रिलोकेशतोपुरंदर । सेविलेंतेणेंमानससर । भ्रष्टराज्यजाहला ॥५०॥

इंद्रपदींनहुषबैसला । कालफिरतांतोहीमोहिला । ऋषीशापेंअजगरजाहला । वनींअद्यापीपडलासे ॥५१॥

कालतोंचिजैफिरला । इंद्रपदातेंपावला । कालयोगेंसर्वाला । सुखदुःखहोतसे ॥५२॥

एवंकरितीभाषण । तवनारदपातलेजाण । रामेंदेऊन उत्थान । श्रेष्ठासनीबैसविलें ॥५३॥

नारदह्मणेरामा । शोककिमर्थपूर्णधामा । स्ववधार्थतुझीरामा । रावणेंनेलीस्वगृहीं ॥५४॥

सीताहीपूर्वभवीं । तपकरीतसेदेवी । रावणेंतेव्हांकामभावीं । बलात्कारेंओढिली ॥५५॥

तयाबोलेतीतापसी । अयोनिजाकरुनजन्मासी । येऊनीयातवगृहासी । नाशकरीनसकलतुझा ॥५६॥

तींचरामाहीसीता । रावणेंनेलीतत्वता । अवतारतुझायाकर्ता । देवप्रार्थितविष्णवांश ॥५७॥

कामधेनूचेंक्षीर । स्वयेपोंचवीपुरंदर । क्षुधातृषाअनिवार । सीतेसीपरीनबाधती ॥५८॥

रावणासीवशनाहीं । पाहिलीम्यारावणगृहीं । रावणवधार्थतूंही । व्रतकरीनवरात्र ॥५९॥

सांप्रत आलासेआश्विन । देवीचकरीपूजन । करीलमनोरथपूर्ण । सर्वेश्वरीआदिविद्या ॥६०॥

ब्रम्हाविष्णुआणिरुद्र । बृहस्पतीवरुण इंद्र । यमकुबेर आणिचंद्र । नवरात्रकरितीते ॥६१॥

वसिष्ठादिमुनीगण । देवीचेकरितीसेवन । तूंहीतव उपोषण । करुनीव्रत आचरावें ॥६२॥

व्याससांगेनृपासीं । रामेंआचरिलेंव्रतासी । भावेंकरितांपूजनासी । प्रसन्नझालीतीदुर्गा ॥६३॥

अर्धरात्रींअष्टमास । प्रगटलीतीप्रत्यक्ष । वरमागम्हणेरामास । चतुर्भुजाप्रसन्ना ॥६४॥

रामातूंमत्स्यहोऊन । देवांकेलेंवेददान । शंखासुरतुवांमारुन । सुखींकेलेसुरवर ॥६५॥

तूंचिझालासीकासव । अमृतेंतर्पिलेंदेव । कोलहोऊनीस्वयमेव । हिरण्याक्षमारिला ॥६६॥

तूचिझालासीनरहरी । हिरण्यकशिपाविदारी । वामनरुपेंमुरारी । तूंचिछळिलाबळिते ॥६७॥

मगझालासीपरशुराम । क्षत्रियमारिलेसीअधम । आतांझालासिताराम । रावणवधाकारणें ॥६८॥

मत्प्रसादेकरुन । रणींमारीरावण । अकरासहस्त्रवर्षेंपूर्ण । राज्यकरीपृथ्वीचे ॥६९॥

व्यासम्हणेनृपती । एवंवदोनीभगवती । गुप्तझालीपरंज्योती । रामतेव्हांसंतोषे ॥७०॥

व्रतपारणाकरुन । दशमीसकेलेंप्रयाण । सकुलामारुनीरावण । सीतेसहराज्यकेलें ॥७१॥

भगवतीदयकरुन । होयसमस्तकल्याण । पाठकरितांरामाख्यान । कृपाकरील अंबिका ॥७२॥

तृतीयस्कंदभावार्थ । देवीबोलिलीपरमार्थ । शतचौर्‍यायंशीश्लोकार्थ । श्रवणेंहोयसर्वसिद्धी ॥७३॥

देवीविजयेतृतीयस्कंदेनवमोध्यायः समाप्तः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP