तृतिय स्कंध - अध्याय आठवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपह्मणेमुनिराया । मजवरीकरुनिदया । नवरात्रविधीविस्तारुनिया । कथनकीजेमजप्रती ॥१॥

व्यासतयासींसांगती । तवसांगेऋषीप्रती । शरत्काल आणिवसंती । अवश्यदेवीपूजिजे ॥२॥

हेऋतुभवते । असतीजीवनाशकर । वैद्याचेहेप्रियकर । रोगभांडारह्मणूनी ॥३॥

करितांदेवीपूजन । होतसेरोगनाशन । ऐकनवरात्रविधान । संक्षेपेंतुजसांगतो ॥४॥

अमावास्यापूर्वदिनी । हविष्यांनैकभोजनी । ब्रह्मचर्यव्रतेंशयनी । साधकोत्तमेराहिजे ॥५॥

पातः काळीमंगलस्नान । नित्यसर्व आटोपून । मंत्रवेत्तेद्विज आणून । गणेशपूजनकरावे ॥६॥

करुनस्विस्तिवाचन । नियमेंकीजेउपोषण । अथवाएकांनभोजन । नऊदिवसकरावें ॥७॥

पूर्वींचमंडपकरावा । सोळाहातचतुष्क असावा । ध्वजतोरणींशोभवावा । रंभास्तंबरोपिजे ॥८॥

शुभ्रमृत्तिकगोमयानीं । भूमीकाढिजेलिंपुनी । चारहाताचीचौकुनी । वेदीमध्येंकरावी ॥९॥

तयामाजीएकहस्त । उंचवेदीप्रशस्त । संकल्पकरुनीविधीयुक्त । देवतांस्थापनकरावे ॥१०॥

चतुर्भुजमूर्तिअसावी । पट्टवस्त्रेंशोभवावीं । शंखादिआयुधेंद्यावी । हस्तामाजींसुरेख ॥११॥

अथवाअष्टादशभुजा । भक्तियुक्तकीजेपूजा । अथवास्थापिजेयंत्रराजा । नवार्णवबीजयुक्त ॥१२॥

पंचपल्लवरत्नयुक्त । पूर्णकुंभपार्श्वभागांत । स्थापिजेताफलसहित । षोडशोपचारेंपुजावा ॥१३॥

पशुआणिमहिष । बलीकीजेविशेष । याहिंसेसीनसेदोष । याज्ञिकीसशास्त्रह्मणे ॥१४॥

पशुसहोयस्वर्ग । कर्त्यासीभोगापवर्ग । देवतार्थ असेमार्ग । दोष आत्मार्थ असेकीं ॥१५॥

कुंडकरावेंत्रिकोण । होमकीजेसंविधान । नित्यकुमारीपूजन । ब्राह्मणभोजनकरावें ॥१६॥

कन्याअसावीकैंसी । विप्रकन्यासर्वांशीं । क्षत्रियातीक्षत्रियाशी । वैश्यावैश्येंपूजीजे ॥१७॥

शूद्राघरींशूद्रकुमरी । शूद्रेंपुजाव्याचारी । वैश्येंत्रिवर्णांतरी । क्षत्रियेंदोनपुजाव्या ॥१८॥

विप्रेंपुजाविविप्रकन्या । कन्यानसावीअंगहीना । रोगीकुरुप अतिमलिना । एकवर्षानसावी ॥१९॥

द्विवर्षातेकुमारी । त्रिवर्षात्रिमूर्तिसुंदरी । कल्याणीतीवर्षचारी । रोहिणीतीपंचवर्षा ॥२०॥

षडवर्षातीकालिका । सप्तवर्षातीचंडिका । अष्टवर्षाजीबालिका । शांभवीनामतियेचें ॥२१॥

दुर्गानामनववत्सरी । सुभद्रादशवत्सरी । याहूनथोरकुमरी । पूजनासीअयोग्यती ॥२२॥

नहोयजरीनित्यपूजन । अवश्यकरीजे एकदीन । शुक्लाष्टमीमहादिन । नवर्जावाकदापि ॥२३॥

याअष्टमीचेदिनी । कालीप्रगटेदक्षभुवनीं । सवेंघेऊनीकोटियोगिनी । विध्वंसिदक्षमख ॥२४॥

म्हणोनिअवश्येदिनी । पुजावितीभवानी । फलपुष्प उपहारानीं । संतुष्टहोयपरांबा ॥२५॥

सप्तमीअष्टमीनवमी । त्रिरात्रपूजितासकामी । नवरात्रफलकामी । प्राप्तहोयनिश्चयें ॥२६॥

अनेकव्रतेंदानें । परीनाहींनवरात्रसमानें । जेंजेंइच्छीतेंयेणें । प्राप्तहोयमनुष्या ॥२७॥

पूर्वीकोणीवैश्य असे । धनहनिगृहींवसे । मुलेंमुलीबहुवसे । दुर्लभ अन्नतयाशी ॥२८॥

नामतयाचेसुशील । यथार्थतोधर्मशील । दारिद्रेंअतिव्याकुल । शरणगेलाब्राम्हणा ॥२९॥

शरन आलोंभूदेवा । दरिद्रव्याधीसोडवा । कुटुंबभरणाउपायबरवा । सांगाकांहींमजप्रती ॥३०॥

ऐकूनीतयाचेंवचन । सदयझालेंविप्रमन । वैश्यासीसांगेव्रतविधान । मायाबीज उपदेशिलें ॥३१॥

म्हणेवैश्यापरमपवित्र । व्रतकीजेतूंनवरात्र । दारिद्रादिदुःखसर्वत्र । नासेलयेणेंनिश्चयें ॥३२॥

राज्यभ्रष्टसीताविरहित । रामझालाअतिदुःखित । व्रततेव्हांआचरित । किष्किंधासमीपपर्वती ॥३३॥

व्रतप्रभावेंकरुन । युद्धींमारिलारावण । सीतेसह अयोध्यापट्टण । पावलाराज्यह्याचिव्रतें ॥३४॥

ऐकूनीवैश्यसंतोषला । नववर्षेंव्रत आचरला । अर्धरात्र अष्टमीला । प्रत्यक्षप्रगटलीपरांबा ॥३५॥

पुरविलेंसर्वमनोरथ । वैश्यझालाकृतकृत्य । नृपाळातूंहीसत्य । पूजनेंधन्यहोयबा ॥३६॥

अष्टादशश्लोकएकशत । नवरात्रविधीसांगत । तेंचसंक्षेपचरित । वर्णिलेंभाषेंतअंबेनी ॥३७॥

देवीविजयेतृतीयस्कंदे अष्टमोध्यायः ॥८॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP