तृतिय स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । स्मरोनिश्रीचेचरण । निघालाजेव्हांसुदर्शन । मार्गीपाहिलेंराजसैन्य । सुबाहूउद्विग्नमानसीं ॥१॥

अंबेचेंकरीचिंतन । शत्रूनींवेष्टिलासुदशन । कन्याकरावयाहरण । युद्धासिद्धनृपझाले ॥२॥

कित्येक उगेतिष्ठले । कौतुकपाहतीभले । तवदोघेंसमोर आले । युधाजितशत्रुजित ॥३॥

शस्त्राचेप्रहारकरित । सुदर्शनतेव्हांछेदित । निजबाणींझांकिलेसमस्त । हस्तलाघवीशूरतो ॥४॥

जामाताशीसाह्यकरी । सुबाहूपरवीरांमारी । रणवाद्येंवाजतींभेरी । युद्धचाललेंदारुण ॥५॥

तवतीकरुणालहरी । जगन्मातासर्वेश्वरी । आरुढोनिसिंहावरी । स्वयेंप्रत्यक्षप्रगटली ॥६॥

दिव्यनेसलीपीतांबर । कंचुकीवरुग आलापदर । कंठींशोभेमंदारहार । मुकुटझळके मस्तकी ॥७॥

चतुर्भुजाभुजंगवेणी । मस्तकीशोभेउड्डमणी । कुंकुमतिलकनेत्रतीनी । नानायुधेंधारण ॥८॥

एवंरुपनृपेंपाहती । आश्चर्यतेव्हांमनींकरिती । पाहुनिसुदर्शनाप्रीति । वंदिलीमानसेंप्रेमभरें ॥९॥

स्वशुरासीम्हणेजामात । देखिजेममकुलदैवत । प्रकटलीहीदयान्वित । आदिमायाईश्वरी ॥१०॥

निर्भयझालोंयेवेळीं । आनंदेवाजवीटाळी । दोघेवंदितिचरणकमळी । सुदर्शनस्रुबाहू ॥११॥

सुदर्शनम्हणेसेनापती । निर्भयचालेराजवीथी । हेदुष्टकायकरिती । अनुकूलझालीपरांबा ॥१२॥

आज्ञावंदूनीसेनानी । ससैन्यनिघेमार्गानी । युधाजितेंअतिकोपुनी । दौहित्रासहधांविन्नला ॥१३॥

पतंगजेवीदीपावरी । नदीजेवीसागरीं । कींबस्तमोहेव्याघ्रावरी । तेवीदोघेधांवले ॥१४॥

बाणसोडीत अपार । गतायूवेगावलाफार । दुर्गाकोपूनिसाचार । बाणमारीयुधाजिता ॥१५॥

गर्जलातेव्हांकेसरी । बाण असंख्यपरोपरी । छदितीसैन्यतयाचे ॥१६॥

सुटलावायूअपार । दिशाज्ञाल्यासतिमिर । नानारुपेंकरुनीसमर । तुमुलकेलाअंबेनें ॥१७॥

शत्रुजितयुधाजित । गतप्राणभूमीप्रत । पडतांचीजयशब्दहोत । पाहूनस्तवींसुबाहू ॥१८॥

नमोनमोमूळदुर्गे । आदिअनादिविश्वसर्गे । तेजस्विनीमहाभर्गे । जगद्धात्रीनमोस्तु ॥१९॥

तूंसर्व ऐश्वर्यवती । तेणेंनामभगवती । कल्याणतूंचीयाजगतीं । शिवातेणेंतवनाम ॥२०॥

सहजकदांनातुडशी । वेणेंदुर्गाम्हणविशी । इच्छीतभक्तातेदेशी । कामदानामयेणेंगुणे ॥२१॥

अपराधपोटींघालिशी । शांताम्हणोनिम्हणविशी । सेवकाचेंअज्ञानहरिशी । विद्यानामयाकरितां ॥२२॥

मोक्षदातूंमोक्षदाने । सर्वांतरींतूंचेतनें । विश्वव्याप्तानामतेणें । आधारेतूंजगद्धात्री ॥२३॥

हे झालेतुजपासून । जगन्मातानामम्हणून । दुर्गतीचेंकरिशीशमन । दुगतिनाशिनीनमोस्तु ॥२४॥

सगुणकेवीनिर्गुण । मीनेणेंतयाचीखूण । मूढेंम्याकायस्तवन । करणतुझें पामरें ॥२५॥

वाणीबुद्धीविद्यामती । तूंचसर्वजंतूचीगति । प्राणजीव आत्मज्योती । तूंचसर्वओतप्रोत ॥२६॥

विधिहरिहरफणीश्वर । तुजस्तवितीनिरंतर । नेणतीतवगुणापार । तेथेंजडमीकायसा ॥२७॥

परीहोयजैंसत्संगती । शुद्धताहोयतेणेंचित्तीं । जामाताचीघडतासंगती । तवदर्शनजाहलें ॥२८॥

इंद्रादिकजेवांछिती । मुनीतुजह्रदयींध्याती । तेहीदर्शननपावती । सहजलाधलोंतेंआज ॥२९॥

कोठेंमीमतिमंद । कोठेंतूंआनंदकंद । भक्तावरीवर्षसीमोद । अमरपूज्येभवानी ॥३०॥

शत्रूचेकरुनिमंथन । रक्षिलाभक्तसुदर्शन । करीसीत्रिलोकरक्षण । काय आश्चर्यतुजलागी ॥३१॥

करिसीतूंभक्तरक्षण । त्यांचेयशदीप्यमान । म्हणोनीआजसुदर्शन । कुशलपावलापरांबे ॥३२॥

भक्तांचेंतूंजन्ममरण । नाशकरिशींनलागतांक्षण । तेथेंहेंभक्तरक्षण । नवलकायम्हणावें ॥३३॥

तुजनसेपापपुण्य । तूंचसगुणनिर्गुण । तवदर्शनेंझालोंधन्य । भजनबीजनेणता ॥३४॥

स्तवेंझालीसुप्रसन्न । म्हणेमागनृपावरदान । सुबाहुम्हणेतवदर्शन । होतांसर्वलाधलों ॥३५॥

दृढभक्तिमजदेईजे । तूयेथेंचीराहिजे । काशीपुरीशीरक्षिजे । यावत्‍ असेवाराणसी ॥३६॥

नानाविधकामना । पूर्णकीजेममवासना । करावेशत्रुनाशना । अंतिनेईतवपदीं ॥३७॥

व्यासम्हणेनृपती । वरदिधलासुबाहूप्रती । दुर्गानामेंविख्याति । अशीसंगमीविराजे ॥३८॥

तवपातलासुदर्शन । अतिप्रेमेंवंदन । प्रेमपदेंकरीस्तवन । श्लोकद्वयेकरुनी ॥३९॥

महिमातवदयेचा । वर्णूंकायमीवाचा । सांभाळकेलाअभक्ताचा । भक्तीहीनकेवळमी ॥४०॥

स्वभक्ताचातारक । होतसेसवलोक । परीतवव्रतदेखिलेंएक । अभक्ततेहीतारिसी ॥४१॥

रचिशीपाळिशीहरिशी । एकलीतूंचिसर्वकरिशी । नवलकायदेवेशी । रक्षणमाझेंकेलेंत्वां ॥४२॥

आतांमीकायकरणें । तेंमज आज्ञापिणें । मीबाळकांहीनेणें । वर्तेनजेवींसांगशी ॥४३॥

वाक्यत्याचेऐकून । देवीबोलेकरुणावचन । बाळाअयाध्येशीजाऊन । कुलोचितराज्यकरी ॥४४॥

नित्यकरीमाझेंस्मरण । करीनतुझकल्याण । ममप्रतिमास्थापून । नगरामाजीकरावी ॥४५॥

अष्टमीनवमीचतुर्दशी । बलिदानकरियेदिवशीं । करीकरवीममपुजेसी । नवरात्रविधानें ॥४६॥

चैत्र आषाढ आश्विन । माघहेउत्सवदिन । राजपूजाविधिविधान । करीआणिकरविजे ॥४७॥

नृपासांगेबादरायण । गुप्तझालीएवंवदोन । समस्तनृपयऊन । नमस्कारितीसुदर्शना ॥४८॥

म्हणतीधन्यधन्यनृपती । प्रसन्नतुजभगवती । तूंशास्ताआम्हाप्रती । सेवक आम्हीसमस्त ॥४९॥

नजाणोआम्हीचरित । देवीचेंअतिविख्यात । कोणरुपेंभासत । पराक्रमकायवर्णिजे ॥५०॥

सुदर्शनेंतिजस्मरोनी । म्हणेइचेंचरित्रवणनी । समर्थनाहींदेवतीनी । तेथेंमाझापाडकाय ॥५१॥

परीसांगतोंकिंचित । निर्गुणरुपएकविख्यात । तीनरुपेंगुणाचीहोत । निर्गुणअदृश्यचक्षूंशी ॥५२॥

रजोविशिष्टातीजननी । सत्वाधिकातेपालिनी । तमबहुलासंहारिणी । त्रिगुणरुपिणीतींचएक ॥५३॥

प्रकटलीहीसत्वाधिका । सकलजगाचीपालिका । दुष्टजनाचीनाशिका । महालक्ष्मीहीचती ॥५४॥

इच्छामात्रेंजगताशीं । रचीपाळीआणिनाशी । स्वयेंसर्वदाअविनाशी । गुणानिर्गुणाहीचही ॥५५॥

बाळपणींमीसहज । लाधलोंदैवेंकामबीज । स्मरलोंतेंह्रदयींचिगूज । ऋषीकृपेंजाणिलें ॥५६॥

ऐकूनीसर्वनृपती । आनंदेंस्वगृहांजाती । सुबाहूहीकाशीप्रती । गेलापुसूनिजामाता ॥५७॥

अयोध्येंआलासुदर्शन । समोर आलेसर्वजन । महामहोत्सवेंकरुन । राजवाडाप्रवेशला ॥५८॥

शत्रुजिताचीजीमाता । बैसलीहोतीअतिदुःखिता । नमूनीतीशींतत्वता । शांतवीतसुवाक्यें ॥५९॥

तिचेंअनुमतघेऊन । स्वीकारिलेंनृपासन । देवीचेंमंदिरकरुन । स्थापनकेलेंमूर्तीचे ॥६०॥

उत्सवकेलानगरी । स्वयेंआपणपूजाकरी । भक्तिवाढली अपार ॥६१॥

न्यायेंराज्यचालवी । एकसूत्रेंसर्वहालवी । समस्तनृपसवैभवीं । जया वश्यजाहले ॥६२॥

रोगजराअपमृत्य । पळालेदुःख अनृत । कालींकालींवृष्टीहोत । दोषदुष्काळनसेची ॥६३॥

धर्मवृत्तीसुरुप । वाढलीप्रजाअमूप । आवडतातोसर्वांसिभूप । रामापरीजाहला ॥६४॥

चारीनवरात्रपूजन । प्रेमेंकरीसुदर्शन । तियेचकुपेंकरुन । धन्यमान्यजाहला ॥६५॥

सुबाहूनेंनगरींजाऊन । सुंदरप्रासादनिर्मुन । दुर्गेचेंकेलेंस्थापन । पूजनकेलेंविधीनें ॥६६॥

सर्वजनतीसपूजिती । अनन्यभावेंभजती । जेवींतेथेंविश्वेशाप्रती । तेवींमानितीअद्याप ॥६७॥

व्यासम्हणेनृपनंदना । करीदेवीचपूजना । पूर्णहोईलमनकामना । निःसंशयेंजाणिजें ॥६८॥

हेंसुरस आख्यान । देवीदयेचेंवर्णन । पापनाशीहेंसुदर्शन । सुदर्शनदेवीचें ॥६९॥

भक्तिभावेंपठणकरितां । भोगमोक्षयेतीहातां । अन्यलाभयापरता । नसेकांहींसुदर्शना ॥७०॥

साधकवरदेश्रीरमे । भक्तवत्सलेमातेउमे । सर्वरक्षकेअगमनिगमे । ब्रीद आपुलेंसांभाळी ॥७१॥

एकशतएक्कावन । श्लोकेंचरित्रसुदर्शन । अंबाबोलेकृपाकरुन । श्रवणेंप्रसन्नहोतसे ॥७२॥

देवीविजयेतृतीयस्कंदेसप्तमोऽध्यायः ॥७॥    

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP