तृतिय स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सूतसांगेऋषीशी । व्याससांगेजन्मेजयाशी । नारदसांगेव्यासाशीं । विरचिसांगेनारदा ॥१॥

श्रोतींहोऊनीसावधान । पुढेंकथाकीजेश्रवण । अंबपदींजडलेनयन । ब्रह्माविष्णुशिवाचें ॥२॥

नखदर्पणामाझारी । ब्रह्मांडेदेखिलीपरोपरी । स्त्रीरुपेंतोमुरारी । स्तवनकरीतियेचें ॥३॥

नमोनमोमूळप्रकृती । नोव्हेजेथेंकदाविकृती । ब्रम्हमयपरंज्योती । अनादितीनिर्विकल्प ॥४॥

अणुपासावब्रह्मांडे । अनंतनिर्मिलीअखंडे । सहजधरीसीसर्वप्रचंडे । नमस्कारशतकरितोंमी ॥५॥

सर्वसुखाचीपेटी । इच्छिताचीभरलीवाटी । भक्तकुलाचीलाविसीवाटी । स्वदृष्ठीमाजीकृपेनें ॥६॥

नमस्कारतुज आधीं । करितांओपिशीसर्वसिद्धी । सेवकाचीनिर्मलबुद्धी । करीशीशुद्धमानस ॥७॥

मनवाचेसीजेंनातुडे । जेंजगींसंचिलेंअखंडे । अखंडसुखाचेंभांडे । तेंएकतूंची ॥८॥

विश्वाचेंउत्पत्तीस्थान । तेंतूंचीमुख्यनिधान । स्थितीलयाचेही विधान । तुजमाजीहोतसे ॥९॥

अहंकारएकयजमान । स्त्रीतयाचीइच्छाजाण । तेणेंकल्पूनीजगद्यज्ञ । वेदीरचिलीवासनेची ॥१०॥

पंचतत्वाचीकुंडेरचिली । इंद्रियपात्रेंबहुकल्पिली । अरणीतेथेंआणिली । ब्रह्मगर्भ आदिमाया ॥११॥

मंथाकेलानिश्चयाचा । दडपारचिलामोहाचा । बळकटदोर आशेचा । गुणत्रयमंथिती ॥१२॥

तन्मात्रारुपें सोज्वळ । पांचप्रकारेझालाअनळ । पंचप्राणचिलावितांबळ । प्रबळदीप्तजाहले ॥१३॥

जीव अध्वर्यूवैदिक । ब्रम्हायेथेंमनकल्पक । अंतःकर्णहोतासंम्यक्‍ । निश्चय आग्नीध्रजाहला ॥१४॥

घृत आणिलेंकाममय । पशुयेथेंक्रोधमय । पुरोडाश अनेकविषय । इध्मालोभयोजिला ॥१५॥

मत्सरदर्भपसरले । विषयभोगाचेयज्ञकेले । स्वर्गनर्कादिलाधले । यजमानसंगेऋत्विजा ॥१६॥

हाचियज्ञबुद्धिसहित । घडताऋत्विजामोक्षदेत । तोचिअसतांइच्छान्वित । जन्ममरणदाखवी ॥१७॥

एवंयज्ञाचीअरणी । तूंचिमायेविश्वजननी । पंचकृत्येंतवकरणी । सहजस्वभाव असेकी ॥१८॥

सृष्टीस्थितीसंव्हार । चौथाव्यापिलाअहंकार । पांचवेंसुखाचेंभांडार । एवंकृत्येंकरीसीतूं ॥१९॥

सर्वांचेतूंचिस्थान । जेविशिंपींरजतभान । अंतरीगुप्तहोऊन । राहसीतुजनमस्कारुं ॥२०॥

जेह्मणतीपरावाणी । अर्धमात्राजीवाखाणी । ह्रदयांतसांटवणी । तूंचएकनमोस्तु ॥२१॥

जाणीव आजीलाधलें । सर्वतुंचीओळखिलें । लोकरंजनार्थकेलें । तत्वादिकसर्वही ॥२२॥

अशक्तसर्वतुजवांचोनि । चैतंन्यपावेतुझेंनी । तुझेंचरित्रजननी । कोणजाणेंनेटका ॥२३॥

मधुकैटभसंहारीले । ब्रह्मांड आम्हांदाखविलें । अतिशयेचिसुखदीधलें । तवदर्शनेंयेसमईं ॥२४॥

एवंब्रम्हांडेंकिति । नेणोतुवांरचिलींअसतीं । तीनीदेवेअसंख्याति । रचूनीखेळसीस्वतंत्र ॥२५॥

मागतोंतेंदेईजे । सदाचरणीठेविजे । ह्रदईंमाझेंराहिजे । मुखामाजीतवनाम ॥२६॥

दृष्ठीशीदिसोहेमूर्ती । ह्रदयींज्ञानाचिस्फूर्ती । तवक्षेत्र गमनाप्रती । चरणसर्वदावर्तावे ॥२७॥

हाआपुलाकिंकर । ऐसीभावनादृढतर । नकीजेकदाअंतर । तुजमाजीजगदंबे ॥२८॥

म्यापामरेंबोलिजेंकाय । ह्रदयींदृढधरिलेपाय । नकोनकोअंतराय । दुःखदहोय अतिशये ॥२९॥

मीब्रह्माआणिहर । कर्तृत्वाचाबडिवार । तवसत्तेनेंसर्वहोणार । सत्यत्वेंतेंआम्हांशीं ॥३०॥

वेदाचीजेकलापहिली । तेतूंचीगायत्रीवहिली । स्वाहास्वधातूंचीजाहली । पितृदेवतृप्त्यर्थ ॥३१॥

तवरुपमहासागरीं । अनंतजगहेचिलहरी । खेळसीतूंनटापरी । घडीमोडीकरिशीतूं ॥३२॥

एवं संसारगहनीं । रक्षणकीजेभवानी । ज्ञानप्रकाशतरणी । नमितोंआतांउगवूंदे ॥३३॥

नारदासांगेविरंचि । विष्णुस्तुतीहोतांचि । शिवबोलिलासुरुचि । वेदतुल्यस्तुतिपद्यें ॥३४॥

जरीतुजपासावशौरी । विधीसीतो उत्पन्नकरी । उभयतांसीप्रसवणारी । निश्चयेंतूंचिअंबिके ॥३५॥

सत्वरजजेव्हांप्रसवली । तमासीतेव्हांचिनिपजली । तितीदेवांचीमाउली । अससीतूंचिजाणिलें ॥३६॥

लीलामात्रेंभुवन । करसीजरीउत्पन । कायनवलमागुत्यान । उत्पादिताआह्मांसी ॥३७॥

भूजल आणिकुशान । आकाशतैसाचिपवन । तूंचिनटलीसत्याचेगुण । देहेंद्रियादितूंचितं ॥३८॥

तेमन्दनजाणती । जेतिघांशींचईशह्मणती । तुजपासाव उत्पत्ती । आमचीहेकळेनो ॥३९॥

पांचाचिहेरचनाझाली । माजीतवकलाबैसली । तुजवांचूनिकल्पिली । कोणीसांगहीलीला ॥४०॥

शिवविष्णुब्रह्माकृती । नटलीसतूंचिप्रकृति । अनेककरुनिआकृती । खेळसीतूंस्वानंदे ॥४१॥

तुझेंहेचरणरज । लागलेमस्तकींसहज । जनत्कर्तृत्वाचेचोज । लाधलोंतेव्हां तिघेही ॥४२॥

सदातुझीदयाजरी । नसतीमातेआम्हावरी । यथाकालींगुणलहरी । प्राप्तकैचिमग आह्मां ॥४३॥

जरीनसेविषममती । तुझीतरीयाजगतीं । रकरावमूर्खपंडिति । केवीहोतिगजबज ॥४४॥

विमानींबैसोनीपाहिलें । केवींहेंब्रह्मांडरचिलें । केवींतेंसंहारिलें । जेथोनिआणिलेंआम्हांसी ॥४५॥

अनेकलीलातूंकरीशी । स्वपतीशीरमविशी । नेणोआम्हीगतीशी । जननीतुझ्याचरित्रा ॥४६॥

स्त्रीरुपेंचितवचरण सदैव असोसेवन । सुखकायपुरुषहोऊन । अंतरपडेचरणासी ॥४७॥

नावडेमज अन्यकांहीं । तवचरणींचठावदेई । स्त्रीरुपेंजडलोंपाई । त्रिभुवनीकीर्तिहीचिगाजो ॥४८॥

टाकूनिहेंपादसेवन । राज्यसुखवांछीलकोण । पादवियोगएकक्षण । युगापरीभासते ॥४९॥

तवपादपूजाटाकून । करितीजेतपानुष्ठान । प्रारब्धेंठकलेजन । जन्ममरणचुकेना ॥५०॥

काढायाभवडोहांतुनी । जीशक्तीपादरजःकणी । तीनसेसमाधिसाधनी । यज्ञादिकींनपवे ॥५१॥

पूर्णदयामजवरी । मातेतुझीअसेजरी । मंत्रदीजेनवाक्षरी । तारीमजतारके ॥५२॥

पूर्वजन्मींतुवांमज । सांगीतलेंसीमंत्रगुज । परीनाठवें जननीआज । कृपाकरुनिदेईजे ॥५३॥

विधीम्हणेनारदासि वाक्य ऐकूनींशिवासी । नवार्णवमंत्र उपदेशी । स्वयेंपरांबाआनंदें ॥५४॥

स्तविलीम्याभुवनेश्वरी । नम्रत्वेमृदुवैखरी । जोडूनियादोहींकरी । एवंप्रकारेंनारदा ॥५५॥

वेदजरीतुजनजाणते । तरी जगद्धात्रीनह्मणते । स्वाहानामकेवींगाते । निश्चयेंतुजजाणती ॥५६॥

हेंसर्वम्याचरचिलें । प्रभुत्वमजबाणले । धन्यत्वमीचमिळविलें । गर्वेभरलोंपूर्वीमी ॥५७॥

आजही पायधूळीं । स्पर्शतांमाझेंभाळीं । आनंदगर्वाचीउमाळी । येताधन्यनिश्चये ॥५८॥

मोहबेडीतोडिजे । मोकळेंमजसोडिजे । तवभक्तियुक्तकीजे । अहर्निशमागतों ॥५९॥

जेतवचरित्रनेणती । तेकर्तामजम्हणती । कर्तुत्वाचीमूळशक्ती । तूंचिएकपरांबे ॥६०॥

चतूंर्विधहीसृष्टी । तदर्थरचिलापरमेष्टी । मीचजाणेहीगर्वदृष्टी । अपराधक्षमाकरावी ॥६१॥

नानायोगसाधनें । नानाजपअनुष्ठानें । आचरतीजेबहूश्रमानें । नाममहिमा नेणती ॥६२॥

हेअबइर्श्वरी । बालेकन्येसुंदरी । आईशक्तीशिवागौरी । ह्मणतां सुख उणेंकी ॥६३॥

मजवांचूनिजगाशी । दृष्टिमात्रेकांननिर्मिशी । परीक्रीडार्थ आम्हांरचिशी । वृथाचिगर्वकरीतसे ॥६४॥

सर्वरक्षकह्मणवेहरी । मधुकैटभाचेझुंजारी । त्वांचिरक्षिलाहाशौरी । बडिवारव्यर्थआमुचा ॥६५॥

तैसाचिकल्पांतीहर । रक्षिसी तूंनिरंतर । जन्ममाझेंभ्रुवातर । वेदयासीह्मणतीकी ॥६६॥

तुजनपाहिलेंउपजतां । तेथेंमृत्यूचीकायवार्ता । कर्तापाहतांहर्ता । तूंचिएकसुनिश्चये ॥६७॥

आम्हींहोतातुजसहित । समर्थझालोंजगांत । तुजनेणोनीमोहित । होतसोंकींघडोघडी ॥६८॥

निर्विकारनिरामय । अरुप आणिअव्यय । ब्रह्मकेवळ अद्वय । तथापिसगुणत्वाकेलें ॥६९॥

ब्रह्मआणिमाया । याहूननदिसेंतृतीया । एकमेवाद्वितीया । वेदगातिमहावाक्यें ॥७०॥

वेदामिथ्यानम्हणवें । विरोधहीयेथेंनकरवे । परीमनासीतेंनपवें । संदेहतेणेंजाहला ॥७१॥

वेदींअद्वयगाइलें । तेतूंचिकींवहिलें । अथवाअसेंअन्यठेलें । उकलोनिमजउपदेशी ॥७२॥

संदेहनिरासकरावा । तूंअससीस्त्रीकिंवा । पुरुषदुजाजाणावा । स्वमुखेंसांगदयाळे ॥७३॥

यथार्थतुजजाणून । मोक्षसुखमीपावेन । नारदाऐकतांमाझेंवचन स्वयेंबोलिलीपरांबा ॥७४॥

मीआणिसत्‍ । भेदनसेकिंचित्‍ । तेमीमीचितत्‍ । मतिभ्रमेंभेद असे ॥७५॥

आम्हादोघांचेअंतर । सूक्ष्मजाणेंजोनर । मोक्षसुखसाचार । बुधिवानतोचिपावें ॥७६॥

एकचिब्रम्हनिर्विकार । कदानोहेंसविकार । दिसेंतेंचिद्वैताकार । उत्पत्तिकालींविधात्या ॥७७॥

तीचिभ्रांतिउठावली । नानाकारेआकारली । कल्पनेचक्षयकाली । एक उरेंअद्वैत ॥७८॥

तीच अद्वैताचिटेवि । साकारलेंमीदेवी । स्त्रीपुंनपूंसकमावी । नसेंकांहींमजेपरतें ॥७९॥

द्वैतदाखवीउपाधी । अद्वैत्तजाणेंसमाधी । शुद्धहोतांमनबुद्धी । स्वयेअद्वयपरमात्मा ॥८०॥

उपाधीम्हणजेदीपजैसा । एकापासावदुजातैसा । हातींधरितांआरसा । जेवींस्वयेंद्विधाभासे ॥८१॥

तेवींयेथेंभ्रांति । नानारुपेंभासती । मजकोठूनीझालीजाती । स्त्रीपुमान्नपुंसक ॥८२॥

सर्गक्षयाचेसमई । नाम रुपमजनाहीं । पुन्हाउत्पंत्तिसमईं । कल्पिलेंसर्वबुद्धीनें ॥८३॥

तीबुद्धीलक्ष्मीकांति । धृतिदयाश्रद्धास्मृती । मेधालज्जाक्षुधाकीर्ति । तृष्णाक्षमापिपासा ॥८४॥

निद्रातंद्राज राशांति । अजराविद्याविद्याकांती । स्पृहावांच्छाशक्तिशक्ति । वसामज्जात्वचादिक ॥८५॥

दृष्ठीवाणीसत्यासत्या । परामध्यादिपश्यंत्या । सर्वनाडीशरीरस्था । मीचनटलें चराचर ॥८६॥

जेंहेंसर्वादिसें । मजवांचूनिकांहींनसे । निश्चयेंतूंजाण ऐसें । सहज अद्वैत अनुभवी ॥८७॥

सर्वदेवांचेंशरीरीं । प्रवेशूनसृष्टयवसरी । मीचसमग्रकार्यकरी । निमित्तमात्रनिर्मिलें ॥८८॥

गौरीब्रांह्मीरौद्रीवैष्णवी । वाराहीवारुणीवासवी । शिवाकौ बेरीभार्गवी । नारसिंव्हीगुहेश्वरी ॥८९॥

जलामाजीशीतता । अग्नीमाजीउष्णता । सूर्यामाजीप्रकशता । चंद्रामाजीहिमरुप ॥९०॥

इच्छेनुरुपेंसर्वकाम । करुनिउरलेंनिष्काम । मजवांचुनसर्वकाम । राहिलेंकीसहजची ॥९१॥

शक्तीवांचून अशक्त । कांहींचतेथेंनघडत । मजवांचूननिश्चित । व्यर्थसर्वजाणिजे ॥९२॥

माझेनियोगेंझालाथोर । ओसंडितांचिमीअव्हेर । मजवांचोनीहरिहर । दुर्बलहोतीजाणविरंचि ॥९३॥

नह्मणती रुद्रविष्णुहीन । ह्मणतीजाहलाशक्तिहीन । भ्यालाझालापराधीन । अरुद्रत्यासीनह्मणती ॥९४॥

जैसातूंसर्वरचिशी । माझेनियोगेंयोग्यहोशी । तेवींचजाणहरिहराशीं । इंद्रचंद्रयमसूर्य ॥९५॥

त्वष्टावरुण आणिपवन । कार्यकरितींमाझेन । पृथ्वीकरितेधारण । शक्तिसर्वमाझीच ॥९६॥

कुर्मदिग्गजशेष । माझेनिसमर्थनिःशेष । मजवांचुनिकार्यलेश । अणुमात्रनोहेची ॥९७॥

जरीमीइच्छिन । जलसर्वप्राशीन । अग्नीचेकरीनशमन । स्तंभवीनमहावायु ॥९८॥

जडाचानाशपाहून । शंकितनकरीकदामन । मृदगोलवाकपालपाहुन । घटनाशजेवितेवी ॥९९॥

मृदतेचिजाणिजेसत्‍ । कपालतेचिमायाअसत । सदाकारेघटादिबहुत । सद्रूपसर्वसृष्ठी ॥१००॥

नाशिवंतहाआकार । शाश्वततेंनिराकार । निराकार तोचिसाकार । भ्रांतियोगेभासतें ॥१०१॥

शुक्तिवरिरजत । जलितरंगबहूत । तंतूमाजीपटभासत । जगतदेवींब्रह्मींहें ॥१०२॥

सत आणिअसत । अभेदजेजाणत । तेंचिअनुभवीसंत । जीवन्मुक्ततेचिसदा ॥१०३॥

वेदींजेंगाइलेंसत । भ्रमेंत्याचेंभेदसात । ऐकविरंचीदेऊनिचित्त संक्षेपरुपेंबोधितें ॥१०४॥

प्रथमतेंअसेंशाश्वत । पारनेणवेतेंअनंत । रुपमाझेंतेंचिनिश्चित । मनवाणीसीनपवेजें ॥१०५॥

तेंचिजाणनिराकृती । तयापासावझालीआकृती । क्षणोक्षणींनासती । क्षणिकह्मणोनीह्मणविलें ॥१०६॥

दुजेंरुपमाझेंक्षणिक । आकारलें बहुवर्णक । तेंचिनासतांशून्यनामक । तिसरेंरुपओळखी ॥१०७॥

जडजक्षेंणिकदिसें । चिदयोगेंनित्यभासे । तेंचिद्रूपचिगोडसें । चौथेंमाझेंनित्यरुप ॥१०८॥

आकारीजोंवरीनित्य । तोंवरीक्षणिकतेंचिनित्य । संघातयोगेतेंचिचित्‍ । क्षणिकयोगेंभासतें ॥१०९॥

चर्मचक्षूंसीहोयभास । तोअसेआकारास । निराकाराचाजोभास । कळेंकेवींबाह्यदृष्टी ॥११०॥

संघातम्हणजेपंचभूत । होतीजेव्हांमिश्रित । देहाकारेंभासत । पृथकहोतांअनित्यतें ॥१११॥

समईतेल आणिवात । एकत्रहोतांअग्निसहित । समानवायूसीसंगत । दीपएकप्रगटेजेवी ॥११२॥

यापांचाशींकारण । मनुष्यजेवीअवश्यजाण । कदानुपजेस्वयेआपण । तेवींजाणक्षणिकहें ॥११३॥

पृथक्‍ होतांनदिसेचित्‍ । तेव्हांतेंचिनित्य अनित्य । तेंहीरुपमाझेंसत्य । सर्कतृकभेदसाहवा ॥११४॥

भूतांचे एकत्रहोणें । तैसेंचनिराळेंकरणें । हेंकतृत्वकेलेंजणें । भ्रांतिरुपमीचती ॥११५॥

मुळींचजेंअद्वैत । कोठुनिआलेंतेथेंद्वैत । नसतेचिमिथ्याभासत । भ्रांतियोगेसर्वथा ॥११६॥

अहंकाररुपसातवे । जगत्‍ तेव्हांचिसंभवे । अहंकारेविणस्वभावें । शाश्वतएक उरेमी ॥११७॥

प्राग्भावतोअहंकार । जेणेंरचिलाससार । प्रध्वसाभावनिरहंकार । जाणुनिसंदेहटाकिजे ॥११८॥

महत्तत्वहेंग्रहणकरी । अहंकारहेंचिप्रगटकरी । पंचभूताचिरचनाकरी । जेवीपूर्वीतेवींच ॥११९॥

रचुनियानिवासस्थानें । राहवेतेथेंसुखानें । स्वस्वकार्याचीसाधनें । दैवयोगेंकरावी ॥१२०॥

शक्तिघेईजेसरस्वती । रजोगुणाहीयुवती । श्वेतवस्त्रारुपवती । हस्यवदनाक्रीडार्थ ॥१२१॥

हीतुझीसहचरी । होईलसदाकार्यकरी । इचाअवमाननकरी । मदंशाहीजाणिजे ॥१२२॥

सत्यलोकरचुनी । राहातेंथेंस्वस्थमनीं । चतुर्विधबीजापासुनी । उत्पन्नकरीविधात्या ॥१२३॥

महत्तत्वहेंबीज । कालकर्मस्वभावसहज । ममबुद्धींद्रियसमाज । गुणत्रयपंचभूतें ॥१२४॥

पूर्वीजेवींहोतें । तैसेंचिरचीमागुतें । विष्णुशीमानिजेचित्तें । सत्वगुणीश्रेष्टहा ॥१२५॥

देवमनुष्यराक्षस । नानाजातीबहुवस । जारजस्वेद अंडजास । उद्बीजचौथेंजाणिजे ॥१२६॥

ब्राम्हणक्षत्रीवैश्यशूद्र । कर्मेंकरितीभद्राभद्र । फलतयाचेन्यायशुद्ध । प्राप्त असोतयाशीं ॥१२७॥

संकटजेव्हांपडेल । नानारुपेंविष्णूकरील । कार्यतुमचेसाधील । सेवनीय सर्वांसिहा ॥१२८॥

तमोगुणीहाशंकर । होईलतुम्हांसहाकार । सन्मानावातयाफार । यज्ञादिकींपुजावा ॥१२९॥

यज्ञकरितीलब्राम्हण । माझेंनामकरुनिग्रहण । हवीकरितीदेवार्पण । तृप्तसर्वमदनुग्रहे ॥१३०॥

संकटसमईमजस्मरतां । अनेकरुपेंतत्वता । रक्षीनमीनकराचिंता । नकाविसरुंमजलागी ॥१३१॥

नारदासिसांगेविधाता । एवंवदो निजगन्माता । नवाक्षरमंत्रतत्वता । सांगतीझालीमजलागी ॥१३२॥

मजदेउनीसरस्वती । आज्ञापिलेंहरिप्रती । लक्ष्मीदेउनियाशक्ती । चायह्मणेवैकुंठा ॥१३३॥

अपमान इचानकरी । सुखानेंराहेक्रीडाकरी । जोडानिर्मिलाअतिकूसरी । लक्ष्मीनारायणनामक ॥१३४॥

सर्वांचेंव्हावयाजीवन । यज्ञकेलेमीउत्पन्न । अविरोधेंतुम्हीतीन । असावेंसुखेंसर्वदा ॥१३५॥

माझेंगुणापासून । तुह्मीतिघेउत्पन्न । मान्यपूज्यश्रेष्ठधन्य । जगामाजीतिघेही ॥१३६॥

जेकोणीमूढचित्त । भेदमानितीतुम्हांत । जातीलतेनरकांत । भेदबुद्धीनिश्चयें ॥१३७॥

परमात्मरुपचिंतन । तयातूंसत्वगुणप्रधान । मध्यमतुजदोनिगुण । रजतमजाणनिश्चयें ॥१३८॥

वाणीकाममायायुत । मंत्रजपेपरमादभुत । मृत्युकालाचेजनित । भयनसेतुह्मांसी ॥१३९॥

जेव्हांहेंमीसर्वहरीन । तैंमजमाजीव्हावेंलीन । सर्वदाकीजेमाझेंस्मरण । उदगीथादिसामगानें ॥१४०॥

एवंविष्णूशीबोलून । शंकराबोलेप्रियवचन । हीमहाकालीघेऊन । सुखेंविहरेशंकरा ॥१४१॥

रचुनियाकैलास । कालीसवेकरीविलास । कदानावमानीइयेस । तमोगुणप्रधानतूं ॥१४२॥

वस्तुमात्रजेंजेंदिसें । त्रिगुणेंसर्वव्यापिलेंसें । निर्गुणतेंकदानदिसें । नाहींदेखिलेकोणीच ॥१४३॥

सगुणाआणिनिर्गुणा । उभयरुपेंमाझीजाणा । कारणरुपामीसगुणा । ब्रह्मलीनानिर्गुणामी ॥१४४॥

आतांशक्तीसहविमानीं । जावेंतेथेंसर्वांनी । मजस्मरतांनीश्चलमनीं । दर्शनेंहरीनसंकटें ॥१४५॥

मीअथवानिर्गुण । दोघांचेहीकरितांस्मरण । दुःखहोयनिवारण । अखंडसुखप्राप्तहोय ॥१४६॥

एववदोनिशिवासी । निरोपदिधलातिघांसी । बाहेरयेतांपूर्वरुपासी । पावलोंआह्मीनारदा ॥१४७॥

मगबैसतांचिविमानी । चालिलेंविमानतेंगगनीं । पातलोंत्वरेंपूर्वस्थानीं । मधुकैटभवधजेथें ॥१४८॥

रचूनियास्थानेंसुंदर । शक्तीसहनिरतर । सुखेंकरितोंकार्यभार । आज्ञेनुरुपतियेचे ॥१४९॥

व्यासह्मणेनृपती । वाक्य ऐकूनिपित्याप्रति । नारदविचारीअतिप्रीती । परीसेआतांजन्मेजया ॥१५०॥

अविनाशीजोनिराकार । पाहिलाकींपुरुषपर । गुजसांगावेंनिर्धार । केवींरुप असेंतें ॥१५१॥

गुणाचेंसांगालक्षण । सृष्टिकेवीविलक्षण । केवीतुम्हीतिघेजण । रुपेंसांगाविस्तारें ॥१५२॥

ऐकुनिसांगेविधी । अनित्यहेंदृश्य आधी । अदृश्यतेंत्रिशुद्धी । दृश्यकेवींहोईल ॥१५३॥

न आदिमध्य अंत । प्रकृतिपुरुषतेअनंत । विश्वासीचकळोंयेत । गुणरहीतझालिया ॥१५४॥

चैतन्यजेंसर्वांत । निर्गुणतेंचिनिश्चित । अनुभवेंचिकळोंयेत । अन्य उपायनसेची ॥१५५॥

जेसगुणानिर्गुणातेची । भेदनकीजेमनोवाची । गोष्टीजाणतत्वाची । ब्रह्मतेचीपरांबा ॥१५६॥

गुणाचेऐकविंदान । गुणराहतीएकत्रहोऊन । तिघांच्याहीशक्तीतीन । जगत्कार्यरचितीत्या ॥१५७॥

सात्विकाचीज्ञानशक्ती । रजाचीजाणक्रियाशक्ती । तमाचीतीद्रव्यशक्ति । कार्येत्यांचीसांगतों ॥१५८॥

पंचभूतेंपंचगुण । जाहलींतामसीपासून । अहंकारतोतमोगुण । मूळकारणसृष्ठीचे ॥१५९॥

तमोगुणीशिवासिजाण । दशद्रव्येंकरोनिनिर्माण । अहंकाररुपेंआपण । मूळकारणपुढारी ॥१६०॥

राजसीपासावपंधराजण । ऐकतेझालेनिर्माण । दहाइंद्रियेंपंचप्राण । रजोगुण उपादानमी ॥१६१॥

चिद्रूपाहीअनुवृत्ती । इंद्रियाचालक असेती । सात्विकीचिसंतती । ऐकासांगतोंदेवऋषे ॥१६२॥

दिशावायूसूर्यवरुण । अश्विनीकुमारासहपांचजण । ज्ञानेंद्रियदेवतांगण । तदनंतरकर्मेद्रियें ॥१६३॥

चंद्रब्रह्मारुद्रक्षेत्री । मनादिचतुष्टयज्ञात्री । स्वरुपीनसतीअणुमात्री । इंद्रजालमिथ्याहें ॥१६४॥

लीनहोतांचिमन । नदिसेंतेथेंगोगण । वर्णिलेंह्मणोनीपंधराजण । मनादिककासया ॥१६५॥

ज्ञानशक्तीचापरिवार । एवंसृष्टीचाविस्तार । शेवटयाचेंज्ञानसार बडिवारहाअज्ञानें ॥१६६॥

स्थूलसूक्ष्मपणेंदोन । मुमुक्षुसीकरायाध्यान । स्थूलविराटसगुण । सूक्ष्मशरीरींचपाहणें ॥१६७॥

गुणाचीऐकठेवणी । राहतीएकत्रहो उनी । निराळेनदिसतीनयनीं । जेवींआह्मीतिघे एक ॥१६८॥

सत्वतोअसेगौर । धर्माचातोप्रियकर । सुखप्रीतिवाढविणार । श्रद्धाभक्तीवाढवी ॥१६९॥

त्रिगुणाश्रद्धागाइली । सत्वापासावझाली । रजसत्वतमावर्णिली । वसिष्टादिमुनिश्रेष्टीं ॥१७०॥

रजतोअसेरक्तवर्ण । अप्रीतिदुःखाकारण । द्वेषलोभमत्सरजाण । श्रद्धातेथेंराजसी  ॥१७१॥

कृष्णवर्ण असेतम । आलस्यादिमोहधर्म । दैन्य अज्ञानवैषम्य । श्रद्धायेथेंतामसी  ॥१७२॥

सर्वलक्षणेंमिळुनी । देहीवसतीएकहो उनी । गुणचरित्रत्रिभुवनी । जाणेकोणीविरक्त ॥१७३॥

उपमापाहेयासी । स्त्रीरुपवतीबहुवसी । पतीआणिबंधुवर्गासी । सुखप्रीतीवाढवीते ॥१७४॥

तीचआपलेसवतीशी । वाढवीदुःखमोहासी । नासेतेवीसाधूशी । सुखदुःखदचोराशिती ॥१७५॥

मेघेंआच्छादेंगगन । तयाह्मणतीदुर्दिन । परिकर्षकासिस्रुदिन । दुर्दिनतोचिदरिद्रा ॥१७६॥

तेल अग्निआणिवाती । परस्परांचानाशकरिती । परीएकत्रजेव्हांमिळती । दिसेतेव्हांपदार्थ ॥१७७॥

तेवींगुणाचेविंदान । नारदातूंह्यदईंजाण । एकत्रभावहोऊन । सृष्टीक्रमचालतो ॥१७८॥

एवंगुणासीजाणोनी । वर्तेंसदासत्वप्रधानी । तोचिह्मणावामहाज्ञानी । घडेंसर्वतिच्याकृपें ॥१७९॥

वेदव्यासह्मणेराया । एवंनारदेंसांगूनिया । गेलानिघुनीअन्यठाया । महाज्ञानीदेवर्षी ॥१८०॥

गुणादिकांचीखेळणी । करीतसेभवानी । अहिर्निशध्यावीमनीं । सहजसोडवीकृपेनें ॥१८१॥

राजेंद्रांतूंचिंतानकरी । अंबाध्यानह्रदयींधरी । भागवतहेंश्रवणकरी । पूर्णहोईलइच्छित ॥१८२॥

ऋषिसमाजींऐकिलेंनवल । सूकरशद्बऐकुनीकेवळ । तैसेंचवदलाउतावेळ । मुर्खएकऋषिपुत्र ॥१८३॥

बिंदूहिनबीजाक्षर । सहजहोतांउच्चार । ज्ञानींकेलामहापामर । दयासागरजगदंबा  ॥१८४॥

श्रीललितेदयापरे । वाग्भवरुपेंपरात्परे । वेदवेद्येप्रणवाक्षरे । कृपामुर्तीनमोस्तू ॥१८५॥

ब्रह्मविष्णूरुद्रशिव । मंचकाधार अभिनव । मांचवाजीचापरमशिव । वंदूंतीचसुखमूर्ती ॥१८६॥

महामायासर्वजननी । जीकामेशांकवासिनी । जीसर्वबुद्धीप्रेरिणी नमनतीससर्वदा ॥१८७॥

सृष्ठिस्थितीसंहार । सहजलीलाप्रकार । ऐसीदेवतामहाथोर । नमूंआह्मीप्रेमभावें ॥१८८॥

श्रीमतीशीव्हावेंशरण । प्रेमेंनमावेचरण । मगनाहीजन्ममरण । ज्ञानरुपापरांबा ॥१८९॥

तीनशतचाळीस । भागवताचेंश्लोकस्रुरस । वर्णिलेंश्रीचेस्तुतीस । प्राकृतयेथेंअंबेनें ॥१९०॥

देवीविजयेतृतीयस्कंदेद्वितीयोध्यायः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP