प्रथम स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


॥ श्रीगणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्रीमत्सदगुरवेनमः ॥ श्रीमातापितृभ्यांनमः ॥ श्रीमद्राजराजेश्वर्यैनमः ॥ श्रीमद्देवीभागवतसारभूत महाराष्ट्रभाषाग्रंथित श्रीदेवीविजयः प्रारंभः ॥ तत्रादौहेत्वावतरणार्थाः पंचश्लोकाः ॥ तत्रप्रथ मोसुमंगलार्थः ॥ दृश्यंचित्रंजगद्रूपंययासर्वंविजूंभते ॥ वंदेतांपरमांशक्तिंसच्चिदानंद रुपिणीं ॥१॥

हेतुत्वार्थौ ॥ सत्यंतन्मनसाज्ञातुंशक्यतेवचसानयत्‍ ॥ तल्लब्धये सतीगाथासारमुदगीयतेमया ॥२॥

अज्ञानांसुखबोधायमनस्तापापनुतये । वक्ष्येभागवतंदिव्यंभाषयामहाराष्ट्रया ॥३॥

अहंकृतिनिरासपूर्वक श्राव्यमितिद्वाभ्यां । वक्ताश्रोतापुरस्कर्तालेखकोलेखनीमषी । कालः क्रियामनोवाणी सर्वंदेवीमयंयतः ॥४॥

तस्मांनाहंपृथकदेव्याः कतृत्वंतत्पृथककुतः । अतः सर्वात्मनाभक्तैः सेवनीयंकथामृतं ॥५॥

श्रीमात्रेनमः । सतीपुत्रगजानन । करुआधींतयानमन । जयाचेकृपेंकरुन । कार्येंनिर्विंघ्नसर्वहीं ॥१॥

अनुपम्यतोमनोहर । शुंडादिसेप्रणवाकार । कपोललालसुकुमार । एकदंतसाजिरा ॥२॥

भूषणझालीचंद्ररेखा । रत्नमयमुकुटदेखा । नेत्रींपाहतांसुमुखा । सुमुखविश्व तयासी ॥३॥

विशालकर्णपालवित । भ्रमरमांदीतेव्हांउडत । कुंडलेजैडुल्लत । प्रभाफांकेकपोली ॥४॥

चतुर्बाहूअतिसुंदर । पाशांकुशअभयवर । निर्दाळिलेबहुअसुर । अनेकभक्तरक्षिले ॥५॥

कंबुकंठनागभूषित । आभरणेंल्याला अमीत । सुवाससुमनेंबहूत । हारगजरेतुरेही ॥६॥

विशाळशोभेवक्षस्थळ । दोंदहीतैसेसुढाळ । आसनीविराजेकृपाळ । उंदिरबैसेपुढारा ॥७॥

फुल्लपद्में जेंवीत्रिनेत्र । प्रसन्नमुखपवित्र । पुष्पाक्षताशमीपत्र । गंडस्थळींशोभती ॥८॥

अष्टनायकादोभागीं । सेवितीज्याअनुरागी । जेणेंयोगेत्रिजगीं । धन्यमांन्यजाहल्या ॥९॥

ऐसाहाश्रीगणेश्वर । भक्तजनाचेंमाहेर । कोंळेअर्पिंतादुर्वांकुर । सर्वस्वदेततयासी ॥१०॥

नमस्कारुनियाचरणा । मनेपूजिलादेवराणा । ह्रदईं प्रादुर्भऊनीकरुणा । ग्रंथकरीम्हणतसे ॥११॥

लाधलोजईंवरदान । ग्रंथांतरींशिरलेंमन । प्राकृतेचरित्रवदेन । ऐसेंमनींवाटलें ॥१२॥

सरस्वतीमाता पिता । गुरुज्येष्ठइष्टदेवता । व्यासवाल्मिकादिभ्रुगुसुता । नमितोंमीसंतासी ॥१३॥

श्रोतीऐकिजेसादर । श्रीमदभागवतमनोहर । प्राकृतह्मणोनीअव्हेर । संतजनीनकीजे ॥१४॥

संस्कृतआणिप्राकृत । स्वयेंबोलिलापद्मजात । ऐसे स्पष्टवेदवदत । व्यर्थभेदजाणिजे ॥१५॥

दिनेदिनेकलीमातला । सर्वधर्मलोपावला । अज्ञानतम उदेला । मूर्ख उलूकबोभाती ॥१६॥

तयातकोणीविरळ । जेकांप्राकृतप्रेमळ । तईंवाचिताग्रंथनिर्मळ । कृपाकरीलपरांबा ॥१७॥

संसार तापेतापला । विषयसुखानाकारिला । श्रीगुरुशीशरण आला । जन्मादिका भ्यालाजो ॥१८॥

तोयेथीचाअधिकारी । विश्वासठेवीग्रंथाक्षरी । भुक्तियुक्तें पठणकरी । कलीतयानबाधे ॥१९॥

भक्तीवाढेदेवीपदी । भवाब्धींतयागोः पदी । नगवसेतोआपदी । जन्ममृत्युतरेल ॥२०॥

तयानाहींकदादुःख । इह लोकींसर्व सुख । जीवताचिमोक्षसुख । अंबादेईलतयासी ॥२१॥

वेदाचीजी माउली । ब्रह्मरुपाचीसाउली । जीजगींविद्याह्मणविली । मंगलकरुतियेचे ॥२२॥

श्लोक । सर्वचैतन्यरुपांतामाद्यांचधीमही । बुद्धिंयानः प्रचोदयात्‍ ॥१॥

स्थिरचरदृश्यमात्र । स्थूलसूक्ष्मअणुमात्र । माजीचैतन्यजेंअतिपवित्र । तेचिरुपअंबेचे ॥२३॥

जईहेंकांहींचनवते । तेव्हांहीजेकायहोते । आद्य स्वरुपनिगुते । परांबेचेतेचिपै ॥२४॥

अरुपिणीरुपिणीवा । हेनकळेब्रह्मदेवा । ऐसादेवकेवीघ्यावा । ह्रदयकोशामाझारी ॥२५॥

तरीजेंहेंप्रसवली । सर्वांतभरुनउरली । तीचयेथेंप्रेरकझाली । ममबुद्धींतएकसरें ॥२६॥

एवंमंगलकरुन । व्यासबोले ग्रंथ आपण । गायत्रीरुपेंसुजाण । भागवतसर्व बोलिला ॥२७॥

शौनकम्हणेसूताशी । धन्यधन्यतूंअससी । सर्वपुराणेंजाणसी । लाधलासीव्यासगुरु ॥२८॥

दीर्घकालचिरंजीव हो । सांगपुराणवैभव । गायनकरीअभिनव । पातलाशीपुण्ययोगें ॥२९॥

व्यासेंगाइलीपुराणें । आठराचिउपपुराणें । तयांचीपांचलक्षणें । जाणतोशीतूंसर्व ॥३०॥

प्रार्थिला अम्ही विधि । कलीयेतोदोषनिधी । पूर्णनसेजोअवधी । काळकेवीक्रमावा ॥३१॥

ऐकूनीपद्मजेबोधिले । पुढाएकचक्रप्रेरिलें । देखालजईभंगले । पावनस्थळतेचिपैं ॥३२॥

तेथेंसुखेंबसावें । कलीकदातेथेंनपवे । यावत्कृत प्रभवे । बैसास्वस्थह्मणतसे ॥३३॥

येथें चक्रनेमीविरालें । तेणेंहेंनैमिषझालें । पुण्यक्षेत्रहेंवहिले । राहिलोयेथेंनिर्भय ॥३४॥

आरंभिलेपवित्रसत्र । याजीतसोवीतिहोत्र । ततीयप्रहरींचरित्र । ऐकवीगापुराणें ॥३५॥

ऋषी समाजबहुवस । श्रवणेच्छासर्वांस । उपाय हा काळक्रमास । उत्तमसूताअसेकीं ॥३६॥

व्यसनेजेकाळक्रमिती । तेमूर्खत्वपावती । निरंतरशास्त्रेंचिंतिती । म्हणवितीतेउत्तम ॥३७॥

शास्त्रेंत्रिविधबोलिली । वेदांतसत्वगुणशाली । रजतेमीमांसाल्याली तमयुक्ततर्कतो ॥३८॥

अष्ठादशपुराणांत । चतुर्थजेभागवत । ह्मणवेजेवेदसंमत । ऐकवीगासूतराया ॥३९॥

नवभक्तीमाजीश्रेष्ठ । श्रवणभक्तीवरिष्ठ । श्रवणसार्थकयथेष्ठ । पुराणश्रवणेहोवोकीं ॥४०॥

श्रवणसुख अलोलिक । चक्षुश्रवाहीश्रावक नादेडोलेलुब्धक । एणमुकेप्राणासी ॥४१॥

श्रवणीकीजेआदर । असद्वार्ताअनादर । निंदादिभाषणीबधिर । कथाश्रवणकरावें ॥४२॥

प्रश्न ऐकूनियासूत । हर्षेप्रमेसदगदित । स्मरेह्रदईंश्रीगुरुप्रत । उत्तरदेतसविस्तर ॥४३॥

तोइतिहासपावन । पुढील अध्याये करुन । श्रवणकरोतसज्जन । प्रेमळपूर्ण विवेकी ॥४४॥

कलिपातकापासून । सहजजावेतरुन । यालागींपरांबा आपण । वदलीयेथेंप्राकृते ॥४५॥

कमलाकराचा नंदन । पर्शुरामएक ब्राम्हण । मुखींत्याचेबैसोन । स्वयेबोलिलीशारदा ॥४६॥

तत्वसंख्यापद्य संस्कृत । प्रथमोध्यायभागवत । तात्पर्यचरित्रप्राकृत । ओवीबद्धगोडहें ॥४७॥

इतिश्रीमद्देवीभागवतसारसंग्रहेश्रीदेवीविजयेशौनकप्रश्नचरितंनाम प्रथमोऽध्यायः ॥१॥

श्रीजगदंबाराजराजेश्वरीप्रीतयेभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP