वैधानिक कार्यपद्धती - कलम १९५ ते १९८

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी . १९६ .

( १ ) धन विधेयक व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद १९८ व २०७ मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून . ज्या राज्य विधानमंडळाला विधानपरिषद आहे त्याच्या कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल .

( २ ) अनुच्छेद १९७ व १९८ च्या तरतुदींना अधीन राहून . विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहांनी एखादे विधेयक . सुधारणेशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झाल्या असतील अशा सुधारणांसह . संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही .

( ३ ) राज्याच्या विधानमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्रसमाप्ती झाल्याकारणाने व्यपगत होणार नाही .

( ४ ) राज्याच्या विधानपरिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही .

( ५ ) जे विधेयक राज्याच्या विधानसभेत प्रलंबित असेल . किंवा विधानसभेकडून पारित होऊन विधानपरिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक , विधानसभेचे विसर्जन झाले असता . व्यपगत होईल .

धन विधेयकांहून अन्य विधेयकांसंबंधी विधानपरिषदेच्या अधिकारांवर निर्बंध . १९७ .

( १ ) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने एखादे विधेयक पारित करून विधानपरिषदेकडे पाठवल्यानंतर जर ---

( क ) ते विधेयक विधानपरिषदेने फेटाळले तर ; किंवा

( ख ) ते विधेयक विधानपरिषदेसमोर ठेवल्याच्या दिनांकापासून ते तिच्याकडून पारित न होता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तर ; किंवा

( ग ) ते विधेयक विधानपरिषदेने सुधारणांसह पारित केले व त्या सुधारणा विधानसभेने संमत केल्या नाहीत तर .

विधानसभेला ते विधेयक विधानपरिषदेने केलेल्या , सुचवलेल्या किंवा संमत केलेल्या काही सुधारणा असल्यास त्यांसह किंवा त्याविना , त्याच किंवा नंतरच्या कोणत्याही सत्रात . आपल्या कार्यपद्धतीचे विनियमन करणार्‍या नियमांना अधीन राहून , पुन्हा पारित करता येईल आणि मग याप्रमाणे पारित झालेले विधेयक विधानपरिषदेकडे पाठवता येईल .

( २ ) एखादे विधेयक विधानसभेने याप्रमाणे दुसर्‍यांदा पारित करुन विधानपरिषदेकडे पाठवल्यानंतर जर ---

( क ) ते विधेयक विधानपरिषदेने फेटाळले तर ; किंवा

( ख ) ते विधेयक विधानसभेसमोर ठेवल्याच्या दिनांकापासून ते तिच्याकडून पारित न होता एक महिन्यांहून अधिक काळ लोटला तर ; किंवा

( ग ) ते विधेयक विधानपरिषदेने सुधारणांसह पारित केले व त्या सुधारणा विधानसभेने संमत केल्या नाहीत तर . विधानपरिषदेने केलेल्या किंवा सुचविलेल्या आणि विधानसभेने संमत केलेल्या . अशा काही सुधारणा असल्यास . त्यांसह विधानसभेने दुसर्‍यांदा ते विधेयक जसे पारित केले त्या रुपात ते राज्य विधानमंडळाच्या सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .

( ३ ) या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट धन विधेयकास लागू असणार नाही .

धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती . १९८ .

( १ ) धन विधेयक विधानपरिषदेत प्रस्तुत केले जाणार नाही .

( २ ) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर ते विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत . विधानपरिषद आपल्या शिफारशींसह ते विधानसभेकडे परत पाठवील व तद्‌नंतर , विधानसभेला विधानपरिषदेच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील .

( ३ ) विधानसभेने विधानपरिषदेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या तर , धन विधेयक , विधानपरिषदेने शिफारस केलेल्या व विधानसभेने स्वीकारलेल्या सुधारणांसह दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .

( ४ ) विधानसभेने विधानपरिषदेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या नाहीत तर . धन विधेयक . विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात . विधानपरिषदेने शिफारस केलेल्यांपैकी कोणत्याही सुधारणेशिवाय दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .

( ५ ) जर विधानसभेने पारित केलेले व विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवलेले धन विधेयक . उक्त्त चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत विधानसभेकडे परत पाठवण्यात आले नाही तर उक्त्त कालवधी संपल्यावर . ते विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP