TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सदस्यांची अपात्रता - कलम १०२

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


कलम १०२

सदस्यत्वाबाबत अपात्रता .

१०२ . ( १ ) एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तसा सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल ,

ती अशी ---

( क ) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याचे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून अन्य असे , भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद तिने धारण केले असेल तर ;

( ख ) ती मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषित झालेली असेल तर ;

( ग ) ती अविमुक्त नादार असेल तर ;

( घ ) ती भारताची नागरिक नसेल , अथवा तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्ब संपादिले असेल अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर ;

( ड ) ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली अशा सदस्यत्वासाठी अपात्र झाली असेल तर ,

[ स्पष्टीकरण --- या खंडाच्या प्रयोजनांकरता ] एखादी व्यक्ती संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढयाच कारणाने ती भारत सरकारच्या किंवा अशा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील लाभपद धारण करते असे मानले जाणार नाही .

[ ( २ ) एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास दहाव्या अनुसूचीअन्वये अपात्र असेल तर , ती अशा सदस्यत्वासाठी अपात्र होईल . ]

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-20T00:39:30.7570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उसवणें

  • क्रि. ( राजा . ) सूज उतरणें , ओसरणें . [ सं . उत + श्वि = सुजणें , वाढणें ] 
  • उ.क्रि. 
  • शिवण काढून टाकणें ; टाके उलगडणें ; दोरा काढणें ; उधडणें ( शिवण्याच्या उलट क्रिया ) 
  • ( कों . ) घरावरील शिवलेलें गवत काढून टाकणें . [ सं . उत + सिव = शिवणें ] म्ह०१ उसवलें त्यास शिवील पण निसवलें त्यास काय करील . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site