TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - कलम ५६ ते ६०

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


कलम ५६ ते ६०

राष्ट्रपतीचा पदावधी .

५६ . ( १ ) राष्ट्रपती ज्या दिनांकास आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते अधिकारपद धारण करील :

परंतु , ---

( क ) राष्ट्रपती उपराष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल :

( ख ) राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केल्याबद्दल त्याला अनुच्छेद ६१ मध्ये तरतूद केलेल्या रीतीने महाभियोगाद्वारे अधिकारपदावरुन दूर करता येईल ;

( ग ) राष्ट्रपती , त्याचा पदावधी संपला असला तरीही , त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे अधिकारपद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवील .

( २ ) उपराष्ट्रपती खंड ( १ ) च्या परंतुकाच्या खंड ( क ) खाली त्यास संबोधून लिहिलेल्या कोणत्याही राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळवील .

फेरनिवडणुकीस पात्रता .

५७ . जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून अधिकारपद धारण करीत आहे अथवा जिने असे अधिकारपद धारण केलेले आहे ती , या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या अधिकारपदासाठी होणार्‍या फेरनिवडणुकीस पात्र असेल .

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता .

५८ . ( १ ) कोणतीही व्यक्ती ,---

( क ) भारतीय नागरिक ;

( ख ) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची ; आणि

( ग ) लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त

असल्याखेरीज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही .

( २ ) एखादी व्यक्ती भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणाच्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद धारण करत असेल तर , ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही .

स्पष्टीकरण --- या अनुच्छेदाच्या प्रयोजनांकरता , केवळ एखादी व्यक्ती ही संघराज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल [ * * * ] आहे अथवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे , एवढयाच कारणाने ती एखादे लाभपद धारण करते , असे मानले जाणार नाही .

राष्ट्रपतिपदाच्या शर्ती .

५९ . ( १ ) राष्ट्रपती , संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही , आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर , तो राष्ट्रपती म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल .

( २ ) राष्ट्रपती , अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही .

( ३ ) राष्ट्रपती , आपल्या अधिकृत निवासस्थानाचा , निवासशुल्क न देता वापर करण्यास हक्कदार असेल आणि संसद कायद्याद्वारे ठरवील अशा वित्तलब्धी , भत्ते व विशेषाधिकार यांचाही हक्कदार असेल आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत दुसर्‍या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या अशा वित्तलब्धी , भत्ते व विशेषाधिकार यांना तो हक्कदार असेल .

( ४ ) राष्ट्रपतीची वित्तलब्धी आणि भत्ते त्याच्या पदावधीत कमी केले जाणार नाहीत .

राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे .

६० . प्रत्येक राष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून कार्य करणारी किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती , आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थित असेल तर , सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध ज्येष्ठतम न्यायमूर्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करुन त्याखाली सही करील , ती म्हणजे अशी ---

" मी , क . ख ., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की , मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करीन ( किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीची कार्ये पार पाडीन ) आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन , रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-19T23:20:23.0530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

counter reference

  • पु. प्रतिनिर्देश 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site