TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

भाग एक - कलम ४

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


कलम ४

पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ खाली करण्यात आलेले कायदे .

४ . ( १ ) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्यात , त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा , पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप तरतुदी ( अशा कायद्याचा परिणाम होणार्‍या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळांमधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह ) अंतर्भूत असू शकतील .

( २ ) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-19T03:58:55.4270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

थड

  • क्रि.वि. १ धडक , रट्टा इ० चा ध्वनि होऊन . २ झटक्याने ; थरकांप होऊन [ ध्व . ] 
  • स्त्री. १ किनारा ; तीर ; कांठ ; कड . २ ( ल . ) सिद्धि ; समाप्ति ; शेवट ( काम , धंदा यांचा ). ३ नदीच्या बाजूचे खोरे ; दरी . जसेः - गंगाथड - भीमथड [ सं . तट ] ( वाप्र . ) थडीस लावणे - नेणे - आणणे - घालणे - पोहोंचविणे - सिद्धीस , शेवटास नेणे . थडीस लावणे - जाणे - येणे - शेवटास जाणे . ही थड ना ती थड - निराश्रितपणाची स्थिति ; इकडे आधार नाही व तिकडे आधार नाही अशी स्थिति . 
  • ना. कड , कांठ , किनारा , तीर , थडी ; 
  • ना. खोरे ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.