मराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|

राज्यघटना - अनुक्रमणिका

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


भाग एक

संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
१. संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र.
२. नवीन राज्ये दाखल करुन घेणे किंवा स्थापन करणे.
२ क. [ निरसित.]
३. नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार.
४. पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरकं, आनुषंगिक व परिणामस्वरुप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ खाली करण्यात आलेले कायदे.

भाग दोन

नागरिकत्व
५. संविधानाच्या प्रारंभीची नागरिकत्व.
६. पाकिस्तानातून स्थलांतर करुन भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.
७. स्थलांतर करुन पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.
८. मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणार्‍या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.
९. परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणार्‍या व्यक्ती नागरिक नसणे.
१०. नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे.
११. संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे.

भाग तीन

मूलभूत हक्क
सर्वसाधारण
१२. व्याख्या.
१३. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे.

समानतेचा हक्क
१४. कायद्यापुढे समानता.
१५. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरुन भेदभाव करण्यास मनाई.
१६. सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी.
१७. अस्पृश्यता नष्ट करणे.
१८. किताब नष्ट करणे.

स्वातंत्र्याचा हक्क
१९. भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण.
२०. अपराधांबद्दलच्या दोषसिद्धिबाबत संरक्षण.
२१. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.
२१ क. शिक्षणाचा हक्क.
२२. विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण.

शोषणाविरुद्ध हक्क
२३. माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई.
२४. कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई.

धर्मस्वातंत्र्याचा हक्क
२५. सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार.
२६. धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य.
२७. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य.
२८. विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
२९. अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण.
३०. अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क.
३१.  [ निरसित.]

विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती
३१ क. संपदांचे संपादन, इत्यादींकरता तरतूद करणार्‍या कायद्यांची व्यावृत्ती.
३१ ख. विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य करणे.
३१ ग. विवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणार्‍या कायद्यांची व्यावृत्ती.
३१ घ. [ निरसित.]
३२. या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय.
३२ क. [ निरसित.]
३३. या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना, त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार.
३४. एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध.
३५. या भागाच्या तरतुदींची अंगलबजावणी करण्याकरता विधिविधान.

भाग चार

राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे
३६. व्याख्या.
३७. या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे.
३८. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
३९. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे.
३९ क. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य.
४०. ग्रामपंचायतींचे संघटन.
४१. कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क.
४२. कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद.
४३. कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी.
४३ क. उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग.
४४. नागरिकांकरता एकरुप नागरी संहिता.
४५. बालकांकरता मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद.
४६. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन.
४७. पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य.
४८. कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे.
४८ क. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे.
४९. राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण.
५०. न्याययंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे.
५१. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन.

भाग चार - क

मूलभूत कर्तव्ये
५१ क. मूलभूत कर्तव्ये.

भाग पाच

संघराज्य
प्रकरण एक - कार्यकारी यंत्रणा
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
५२. भारताचा राष्ट्रपती.
५३. संघराज्याचा कार्यकारी अधिकार.
५४. राष्ट्रपतीची निवडणूक.
५५. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत.
५६. राष्ट्रपतीचा पदावधी.
५७. फेरनिवडणुकीस पात्रता.
५८. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता.
५९. राष्ट्रपतिपदाच्या शर्ती.
६०. राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
६१. राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती.
६२. राष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी.
६३. भारताचा उपराष्ट्रपती.
६४. उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे.
६५. राष्ट्रपतीचे अधिकारपद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे.
६६. उपराष्ट्रपतीची निवडणूक.
६७. उपराष्ट्रपतीचा पदावधी.
६८. उपराष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी.
६९. उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
७०. इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे.
७१. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी.
७२. विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार.
७३. संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती.

मंत्रिपरिषद
७४. राष्ट्रपतीस सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद.
७५. मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी.

भारताचा महा न्यायवादी
७६. भारताचा महा न्यायवादी.

सरकारी कामकाज चालवणे
७७. भारत सरकारचे कामकाज चालवणे.
७८. राष्ट्रपतीस माहिती पुरवणे, इत्यादींबाबत प्रधानमंत्र्याची कर्तव्ये.

प्रकरण दोन - संसद

सर्वसाधारण
७९. संसदेची रचना.
८०. राज्यसभेची रचना.
८१. लोकसभेची रचना.
८२. प्रत्येक जनगणनेनंतर पुनः समायोजन.
८३. संसदेच्या सभागृहांचा कालावधी.
८४. संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता.
८५. संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन.
८६. राष्ट्रपतीचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क.
८७. राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण.
८८. मंत्री व महा न्यायवादी यांचे सभागृहांबाबत हक्क.

संसदेचे अधिकारी
८९. राज्यसभेचा सभापती व उप सभापती.
९०. उप सभापतिपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे.
९१. उप सभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार.
९२. सभापतीस किंवा उप सभापतीस पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे.
९३. लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.
९४. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे.
९५. उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार.
९६. अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे.
९७. सभापती व उप सभापती आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते.
९८. संसदेचे सचिवालय.

कामकाज चालवणे
९९. सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
१००. सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती.

सदस्यांची अपात्रता
१०१. जागा रिक्त करणे.
१०२. सदस्यत्वाबाबत अपात्रता.
१०३. सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय.
१०४. अनुच्छेद ९९ खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल दंड.

संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती
१०५. संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी.
१०६. सदस्यांचे वेतन व भत्ते.

वैधानिक कार्यपद्धती
१०७. विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी.
१०८. विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.
१०९. धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती.
११०. " धन विधेयके " यांची व्याख्या.
१११. विधेयकास अनुमती.

वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती
११२. वार्षिक वित्तीय विवरणपत्र.
११३. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती.
११४. विनियोजन विधेयके.
११५. पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने.
११६. लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने.
११७. वित्तीय विधेयकांसंबंधी विशेष तरतुदी.
११८. कार्यपद्धतीचे नियम.
११९. वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन.
१२०. संसदेत वापरावयाची भाषा.
१२१. संसदेतील चर्चेवर निर्बंध.
१२२. न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही.

प्रकरण तीन - राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार
१२३. संसदेच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार.

प्रकरण चार - संघ न्याययंत्रणा
१२४. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना.
१२५. न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी.
१२६. कार्यार्थ मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती.
१२७. तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती.
१२८. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकींमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती.
१२९. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे.
१३०. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान.
१३१. सर्वोच्च न्यायालयाची अव्वल अधिकारिता.
१३१ क. [ निरसित.]
१३२. विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता.
१३३. दिवाणी प्रकरणांविषयी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता.
१३४. फौजदारी प्रकरणांविषयी सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता.
१३४ क. सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र.
१३५. फेडरल न्यायालयाची विद्यमान कायद्याखालील अधिकारिता सर्वोच्च न्यायालयाने वापरणे.
१३६. अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा.
१३७. न्यायनिर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन.
१३८. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी.
१३९. विवक्षित प्राधिलेख काढण्याच्या अधिकारांचे सर्वोच्च न्यायालयास प्रदान.
१३९ क. विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे.
१४०. सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार.
१४१. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणें.
१४२. सर्वोच्च न्यायालयाचे हुकूमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण, इत्यादींसंबंधीचे आदेश.
१४३. सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार.
१४४. मुलकी आणि न्यायिक प्राधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करणे.
१४४ क. [ निरसित.]
१४५. न्यायालयाचे नियम, इत्यादी.
१४६. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च.
१४७. अर्थ लावणे.

प्रकरण पाच - भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक
१४८. भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक.
१४९. नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार.
१५०. संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना.
१५१. लेखापरीक्षा अहवाल.

भाग सहा

राज्ये

प्रकरण एक - सर्वसाधारण
१५२. व्याख्या.

प्रकरण दोन - कार्यकारी यंत्रणा
राज्यपाल
१५३. राज्यांचे राज्यपाल.
१५४. राज्याचा कार्यकारी अधिकार.
१५५. राज्यपालाची नियुक्ती.
१५६. राज्यपालाचा पदावधी.
१५७. राज्यपालपदावरील नियुक्तीसाठी अर्हता.
१५८. राज्यपालपदाच्या शर्ती.
१५९. राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
१६०. विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे.
१६१. क्षमा, इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार.
१६२. राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती.

मंत्रिपरिषद
१६३. राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद.
१६४. मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी.

राज्याचा महा अधिवक्ता
१६५. राज्याचा महा अधिवक्ता.

सरकारी कामकाज चालवणे
१६६. राज्य शासनाने कामकाज चालवणे.
१६७. राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये.

प्रकरण तीन - राज्य विधानमंडळ

सर्वसाधारण
१६८. राज्यांमधील विधानमंडळांची रचना.
१६९. राज्यांमध्ये विधानपरिषद नाहीशी करणे किंवा निर्माण करणे.
१७०. विधानसभांची रचना.
१७१. विधानपरिषदांची रचना.
१७२. राज्य विधानमंडळांचा कालावधी.
१७३. राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता.
१७४. राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन.
१७५. राज्यपालाचा सभागृहास किंवा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क.
१७६. राज्यपालाचे विशेष अभिभाषण.
१७७. मंत्री व महा अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क.

राज्य विधानमंडळाचे अधिकारी
१७८. विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.
१७९. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे.
१८०. उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये करण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार.
१८१. अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे.
१८२. विधानपरिषदेचा सभापती व उप सभापती.
१८३. सभापतिपद आणि उप सभापतिपद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे.
१८४. उप सभापती किंवा अन्य व्यक्ती यांना सभापतिपदाची कर्तव्ये करण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार.
१८५. सभापतीस किंवा उप सभापतीस पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे.
१८६. अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उप सभापती यांचे वेतन व भत्ते.
१८७. राज्य विधानमंडळाचे सचिवालय.

कामकाज चालवणे.
१८८. सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
१८९. सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती.

सदस्यांच्या अपात्रता
१९०. जागा रिक्त करणे.
१९१. सदस्यत्वाबाबत अपात्रता.
१९२. सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय.
१९३. अनुच्छेद १८८ खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल दंड.

राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती
१९४. विधानमंडळांची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी.
१९५. सदस्यांचे वेतन व भत्ते.

वैधानिक कार्यपद्धती
१९६. विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी.
१९७. धन विधेयकांहून अन्य विधेयकांसंबंधी विधानपरिषदेच्या अधिकारांवर निर्बंध.
१९८. धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती.
१९९. " धन विधेयके " यांची व्याख्या.
२००. विधेयकांना अनुमती.
२०१. विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके.

वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती
२०२. वार्षिक वित्तीय विवरणपत्र.
२०३. अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती.
२०४. विनियोजन विधेयके.
२०५. पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने.
२०६. लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने.
२०७. वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी.
२०८. कार्यपद्धतीचे नियम.
२०९. वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन.
२१०. विधानमंडळात वापरावयाची भाषा.
२११. विधानमंडळातील चर्चेवर निर्बंध.
२१२. न्यायालयांनी विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही.

प्रकरण चार - राज्यपालाचे वैधानिक अधिकार
२१३. विधानमंडळाच्या विरामकालात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राज्यपालाचा अधिकार.

प्रकरण पाच - राज्यांमधील उच्च न्यायालये
२१४. राज्यांसाठी उच्च न्यायालये.
२१५. उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये असणे.
२१६. उच्च न्यायालये घटित करणे.
२१७. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्या पदाच्या शर्ती.
२१८. सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विवक्षित तरतुदी उच्च न्यायलयांना लागू असणे.
२१९. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
२२०. स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध.
२२१. न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी.
२२२. न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात बदली.
२२३. हंगामी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती.
२२४. अतिरिक्त व कार्यार्थ न्यायाधीशांची नियुक्ती.
२२४ क. उच्च न्यायालयांच्या बैठकींमध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती.
२२५. विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता.
२२६. विवक्षित प्राधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयांचे अधिकार.
२२६ क. [ निरसित.]
२२७. उच्च न्यायालयाचा सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा अधिकार.
२२८. विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे.
२२८ क. [ निरसित.]
२२९. उच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च.
२३०. उच्च न्यायालयांच्या अधिकारितेचा संघ राज्यक्षेत्रांवर विस्तार करणे.
२३१. दोन किंवा अधिक राज्यांसाठी एका सामाईक उच्च न्यायालयाची स्थापना.
२३२. [ निरसित.]

प्रकरण सहा - दुय्यम न्यायालये
२३३. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती.
२३३ क. विवक्षित जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांनी दिलेले न्यायनिर्णय, इत्यादी विधिग्राह्य असणे.
२३४. जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती.
२३५. दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण.
२३६. अर्थ लावणे.
२३७. दंडाधिकार्‍यांच्या विवक्षित वर्गाला किंवा वर्गांना या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे.

भाग सात

पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मधील राज्ये
२३८. [ निरसित.]

भाग आठ

संघ राज्यक्षेत्रे
२३९. संघ राज्यक्षेत्रांचे प्रशासन.
२३९ क. विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळांची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती.
२३९ कक. दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी.
२३९ कख. सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद.
२३९ ख. विधानमंडळाच्या विरामकालात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा प्रशासकाचा अधिकार.
२४०. राष्ट्रपतीचा विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी विनियम करण्याचा अधिकार.
२४१. संघ राज्यक्षेत्रांसाठी उच्च न्यायालये.
२४२. [ निरसित.]

भाग नऊ

पंचायती
२४३. व्याख्या.
२४३ क. ग्रामसभा.
२४३ ख. पंचायती घटित करणे.
२४३ ग. पंचायतींची रचना.
२४३ घ. जागांचे आरक्षण.
२४३ ङ. पंचायतींचा कालावधी, इत्यादी.
२४३ च. सदस्यत्वाबाबत अपात्रता.
२४३ छ. पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदार्‍या.
२४३ ज. पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतींचे निधी.
२४३ झ. आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग घटित करणे.
२४३ ञ. पंचायतींच्या लेख्यांची लेखापरीक्षा.
२४३ ट. पंचायतींच्या निवडणुका.
२४३ ठ. संघ राज्यक्षेत्रांना लागू असणे.
२४३ ड. विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे.
२४३ ढ. विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे.
२४३ ण. निवडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध.

भाग नऊ क

नगरपालिका
२४३ त. व्याख्या.
२४३ थ. नगरपालिका घटित करणे.
२४३ द. नगरपालिकांची रचना.
२४३ ध. वॉर्ड समित्या घटित करणे व त्यांची रचना, इत्यादी.
२४३ न. जागांचे आरक्षण.
२४३ प. नगरपालिकांचा कालावधी, इत्यादी.
२४३ फ. सदस्यत्वाबाबत अपात्रता.
२४३ ब. नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदार्‍या.
२४३ भ. नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचे निधी.
२४३ म.  वित्त आयोग.
२४३ य. नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा.
२४३ यक. नगरपालिकांच्या निवडणुका.
२४३ यख. संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.
२४३ यग. विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे.
२४३ यघ. जिल्हा नियोजन समिती.
२४३ यङ. महानगर नियोजन समिती.
२४३ यच. विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे.
२४३ यछ. निवडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध.

भाग दहा

अनुसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे
२४४. अनुसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे यांचे प्रशासन.
२४४ क. आसाममधील विवक्षित जनजाति क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती.

भाग अकरा

संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध

प्रकरण एक - वैधानिक संबंध

वैधानिक अधिकारांची विभागणी
२४५. संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती.
२४६. संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय.
२४७. विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार.
२४८. विधिविधानाचे अवशिष्ट अधिकार.
२४९. राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार.
२५०. आणीबाणीची उदघोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार.
२५१. संसदेने अनुच्छेद २४९ आणि २५० खाली केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती.
२५२. दोन किंवा अधिक राज्यांकरता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार.
२५३. आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान.
२५४. संसदेने केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती.
२५५. शिफारशी व पूर्वमंजुरी यांसंबंधीच्या आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे.

प्रकरण दोन - प्रशासनिक संबंध

सर्वसाधारण
२५६. राज्ये व संघराज्य यांचे प्रतिदायित्व.
२५७. विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण.
२५७ क. [ निरसित.]
२५८. विवक्षित प्रकरणी राज्यांना अधिकार, इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार.
२५८ क. संघराज्याकडे कार्ये सोपवण्याचा राज्यांचा अधिकार.
२५९. [ निरसित.]
२६०. भारताबाहेरील राज्यक्षेत्रांसंबंधी संघराज्याची अधिकारिता.
२६१. सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही.

पाण्यासंबंधी तंटे
२६२. आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोर्‍यांतील पाण्यासंबंधीच्या तंटयांचा अभिनिर्णय.

राज्या - राज्यांमधील समन्वय
२६३. आंतरराज्यीय परिषदेबाबत तरतुदी.

भाग बारा

वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे

प्रकरण एक - वित्तव्यवस्था

सर्वसाधारण
२६४. अर्थ लावणे.
२६५. कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे.
२६६. भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोक लेखे.
२६७. आकस्मिकता निधी.

संघराज्य आणि राज्ये यांच्यामध्ये महसुलांचे वितरण
२६८. संघराज्याने आकारणी केलेली पण राज्यांनी उगराणी केलेली आणि विनियोजन केलेली शुल्के.
२६८ क. संघराज्याने आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी उगराणी केलेला व विनियोजन केलेला सेवा कर.
२६९. संघराज्याने आकारणी व उगराणी केलेले पण राज्यांना नेमून देण्यात आलेले कर.
२७०. आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर.
२७१. संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार.
२७२.  *    *    *
२७३. ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने.
२७४. राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणार्‍या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक.
२७५. विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने.
२७६. व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकर्‍या यांवरील कर.
२७७. व्यावृत्ती.
२७८. [ निरसित.]
२७९. " निव्वळ उत्पन्न ", इत्यादींची परिगणना.
२८०. वित्त आयोग.
२८१. वित्त आयोगाच्या शिफारशी.

संकीर्ण वित्तीय तरतुदी
२८२. संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागवण्याजोगा खर्च.
२८३. एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी.
२८४. लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा.
२८५. संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणीपासून सूट.
२८६. मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसवण्यासंबंधी निर्बंध.
२८७. विजेवरील करांपासून सूट.
२८८. पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट.
२८९. राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर - आकारणीपासून सूट.
२९०. विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन.
२९० क. विवक्षित देवस्वम्‍ निधींमध्ये वार्षिक भरणा.
२९१.  [ निरसित.]

प्रकरण दोन - कर्जे काढणे
२९२. भारत सरकारने कर्जे काढणे.
२९३. राज्यांनी कर्जे काढणे.

प्रकरण तीन - मालमत्ता, संविदा, हक्क, दायित्वे, प्रतिदायित्वे आणि दावे
२९४. विवक्षित बाबींमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्याबाबतचा उत्तराधिकार.
२९५. अन्य बाबींमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्याबाबतचा उत्तराधिकार.
२९६. सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता.
२९७. क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधनसंपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणे.
२९८. व्यापार, इत्यादी चालवण्याचा अधिकार.
२९९. संविदा.
३००. दावे आणि कार्यवाही.

प्रकरण चार - मालमत्तेचा हक्क
३०० क. कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे.

भाग तेरा

भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध
३०१. व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य.
३०२. संसदेचा व्यापार, वाणिज्य, आणि व्यवहारसंबंध यावर निर्बंध घालावयाचा अधिकार.
३०३. व्यापार आणि वाणिज्य यांविषयीच्या संघराज्याच्या व राज्यांच्या वैधानिक अधिकारांवर निर्बंध.
३०४. राज्या राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध.
३०५. विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावृत्ती.
३०६. [ निरसित.]
३०७. ३०१ ते ३०४ या अनुच्छेदांची प्रयोजने पार पाडण्याकरता प्राधिकार्‍याची नियुक्ती.

भाग चौदा

संघराज्य आणि राज्ये यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा

प्रकरण एक - सेवा
३०८. अर्थ लावणे.
३०९. संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणार्‍या व्यक्तींची भरती आणि त्यांच्या सेवाशर्ती.
३१०. संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणार्‍या व्यक्तींचा पदावधी.
३११. संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरुन दूर करणे किंवा पदावनत करणे.
३१२. अखिल भारतीय सेवा.
३१२ क. विवक्षित सेवांमधील अधिकार्‍यांच्या सेवाशर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार.
३१३. संक्रमणकालीन तरतुदी.
३१४. [ निरसित.]

प्रकरण दोन - लोकसेवा आयोग
३१५. संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग.
३१६. सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी.
३१७. लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरुन दूर करणे आणि निलंबित करणे.
३१८. आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तींबाबत विनियम करण्याचा अधिकार.
३१९. आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई.
३२०. लोकसेवा आयोगांची कार्ये.
३२१. लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार.
३२२. लोकसेवा आयोगांचा खर्च.
३२३. लोकसेवा आयोगांचे अहवाल.

भाग चौदा क

न्यायाधिकरणे
३२३ क. प्रशासकीय न्यायाधिकरणे.
३२३ ख. अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे.

भाग पंधरा

निवडणुका
३२४. निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित असणे.
३२५. कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरुन मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरुन तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही.
३२६. लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे.
३२७. संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार.
३२८. राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार.
३२९. निवडणूकविषयक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना आडकाठी.
३२९ क. [ निरसित.]

भाग सोळा

विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी
३३०. लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे.
३३१. लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व.
३३२. राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे.
३३३. राज्यांच्या विधानसभांमध्ये आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व.
३३४. राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व साठ वर्षानंतर समाप्त होणे.
३३५. सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क.
३३६. विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरता विशेष तरतूद.
३३७. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद.
३३८. अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग.
३३८ क. अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग.
३३९. अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अनुसूचित जनजातीसंबंधीचे कल्याणकार्य यांवर संघराज्यांचे नियंत्रण.
३४०. मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती.
३४१. अनुसूचित जाती.
३४२. अनुसूचित जनजाती.

भाग सतरा

राजभाषा

प्रकरण एक - संघराज्याची भाषा
३४३. संघराज्याची राजभाषा.
३४४. राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती.

प्रकरण दोन - प्रादेशिक भाषा
३४५. राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा.
३४६. राज्या - राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा.
३४७. राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणार्‍या भाषेविषयी विशेष तरतूद.

प्रकरण तीन - सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इत्यादींची भाषा
३४८. सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियम, विधेयके, इत्यादींकरता वापरावयाची भाषा.
३४९. भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती.

प्रकरण चार - विशेष निदेशके
३५०. गार्‍हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा.
३५० क. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.
३५० ख. भाषिक अल्पसंख्याक समाजांकरता विशेष अधिकारी.
३५१. हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक.

भाग अठरा

आणीबाणीसंबंधी तरतुदी
३५२. आणीबाणीची उदघोषणा.
३५३. आणीबाणीच्या उदघोषणेचा परिणाम.
३५४. महसुलांच्या वितरणासंबंधीच्या तरतुदी या आणीबाणीची उदघोषणा अंमलात असताना लागू असणे.
३५५. परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य.
३५६. राज्यातील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी.
३५७. अनुच्छेद ३५६ खाली प्रसृत केलेल्या उदघोषणेअन्वये वैधानिक अधिकारांचा वापर.
३५८. आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे.
३५९. आणीबाणीच्या कालावधीत भाग तीन अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे.
३५९ क. [ निरसित.]
३६०. आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी.

भाग एकोणीस

संकीर्ण
३६१. राष्ट्रपती, राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण.
३६१ क. संसद व राज्य विधानमंडळ यांच्या कामकाजवृत्तांच्या प्रकाशनास संरक्षण.
३६१ ख. लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता.
३६२. [ निरसित.]
३६३. विवक्षित तह, करार, इत्यादींतून उदभवणार्‍या तंटयांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास आडकाठी.
३६३ क. भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे.
३६४. मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी.
३६५. संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम.
३६६. व्याख्या.
३६७. अर्थ लावणे.

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP