(१)

प्रभुपदास नमित दास मंगलमात्रास्पदा । वरदा सदवनिं लव
यदवलंव न करि हरि दुरिता सौख्य वितरि ॥धृ॥

चरणकमल-। दलिं विहरत कविमंडल । दुर्लभ तें दिव्य स्थल ।
पंकनिरत । राम रत । धन्य तरी ॥१॥

(२)

नच संभव ज्या कांहीं होत अकारण तेंही । कालहि त्या नाहीं ॥धृ०॥
कलिका नाहीं खुलली, करपत तों अकालीं ।
हरपत मोहर कां वनिं बाई ॥१॥

(३)

शिशुपणाहूनि परिचित जनांसि वधुनि दुःखि हो स्वसुख असुखमय कठुतर वाटे । मोदहि विषसम ॥धृ०॥
मंद सदा आनंद विषादें । ह्रदयिं विरति खर वसवि निज धाम ॥१॥

(४)

व्याकुळ हें मन होई कां सतत कां त्यास छळ हा ॥धृ०॥
जगतिं न रंगेत विचारी परी तरंगे । नच त्या कांहि विसावा हा ॥
अनलज्वाल । जाळिते अशी जिवाला पसरी अंतरीं या दाहा ॥१॥

(५)

दशा आता अशापरी अजुनि जाईना । उपत्य कांहीं ना । मना तें साहीना ॥धृ०॥
प्रयास हा करि महा । योग तरी न पहा । तिळभर मान कसा तो राहीना ॥१॥

(६)

अनुकार जना ने कालान्तरिं थोर पदा । छळि विहास हा असला । आधी जरि त्या सदा ॥धृ०॥
हा निश्चय कधिं न ढळे । प्राणान्तहि आला जरि । न मन तिळमात्र चळे । ये त्याप्रति यश तोवरि । करिन यत्न परि । कल्पान्त घडला तरि । ही तापवीन तनु ॥१॥

(७)

फसवित पुरुषाप्रति स्त्री खनि कपटाची ॥धृ०॥
दोषमात्र पूर्ण गात्र । विश्वासा कधिं न पात्र । मोहपाश वागुराचि ॥१॥

(८)

प्रभुसम पतिपद अबलांना । न दैवत लोकीं तयांना । शुभगति पतिप्राणा ॥धृ०॥
निजपतिवांचुनि इतर जनांशी । दर्शन भाषण सुकृतासि नाशी । ईशपदीं रतिही पापचि त्यांसी । भयद खरविषसमाना ॥१॥

(९)

हालत वातें मृदु शान्ति ही । भासे हासे कीं चंद्रालोक तनुलकान्ति ॥धृ०॥
दशदिशा पुष्पपरागें दरवळुनि ह्सत जणुं असती ॥१॥

(१०)

दावी निजकान्ति । वियतीं । शीतलमाया शान्त निशापति ॥धृ०॥
शान्त वैभवा कोमल किरणां । वितरि तरलतर धवलावरणा । दाहि दिशाप्रान्तीं ॥१॥
विविध विरोधी भावांवरतीं । पसरी जणृं हा मुनि एकान्तीं । ज्ञानमया शान्ति ॥२॥

(११)

नाचत ना गगनांत । नाथा । तारांची बरसात ॥धृ०॥
आणित होती । माणिकमोती । वरतुनि राजस रात ॥१॥
नाव उलटली । माव हरपली । चंदेरी दरियांत ॥२॥
ती ही वरची । देवाघरची । दौलत लोक पहात ॥३॥

(१२)

विनाश कां सहगामीच सदा भोगसुखाला ॥धृ०॥
सुवास वाहात राही । नाश तदा पुष्पाचा । विचार हा करि आनंदकालिं खिन्न मनाला ॥१॥

(१३)

गौरवा प्रसरी प्रभूच्या भव्य पट हा नभाचा ।
जीवकोटिप्रचुर भू करि कुंठिता तेवि वाचा ॥धृ०॥
भ्रमति अवकाशांत अणु हे अलक्ष्यरूपें ।
पवन त्यांतुनि शीघ्र फिरतां नाद चाले तयाचा ॥१॥
विस्मयाकुल मनुजमतिला तदा भास होई ।
हुंकृतिध्वनि कोशवासी विश्व करि हाच साचा ॥२॥

(१४)

भुलूनिया खलजनालापा । जरि दिला ताप निष्पापा । तरि निरयनिरति न दुरापा ॥धृ०॥
या सदर्पा । बघुनी सर्पा । जात कोपा ॥१॥
तनु सकंप नय कुजनिं उचित जरि घडत न तरि मलिन करी सत्प्रतापा ॥२॥

(१५)

दुदैवें हेतु झाला तुम्हां द्याया ताप हा ॥धृ०॥
उपकार आजवरि केला । तो अकालिं विलया गेला । अपकारमात्रें याला । स्मरावें आतां पहा ॥१॥

(१६)

अंतरिं खेद भरे, दीनवदन बोलेना । शून्य़ आलोक शून्य जग शून्य़ हृदय डोलेना ॥धृ०॥
शुभदर्शन चरणाचें, नच आतां म्हणुनी । देह हा जड जाहला शोकविकल हालेना ॥१॥
व्यर्थ जीवित यावरी । वज्र पडेना कां शिरीं । हें अपयश आजि या प्राक्तनीं हत आलें ना ॥२॥

(१७)

करा करूणामया क्षमा । विषमा जरि गमे कृति हतकामा तरि सुखधामा सुपरिणामा ॥धृ०॥
क्षणचि हृदय हें भरतां विकारीं । मोदभरें तव कृति न स्वीकरी । विसरुनि तें; अघ हें सहाया दे या शमा ॥२॥

(१८)

प्रलयाची जी हतदशा । आली ती कां आतां ? ॥धृ०॥
रविकिरणां वाटे भय याया । बघुनिया ऐशा एकान्ता ॥१॥

(१९)

भारसंचय पहा नियमि चंचलपदा । जातमात्रास या कर्मबंधापदा ॥धृ०॥
शकटभर जड यथा । महोक्षहि पाहतां ॥ सुटत न कष्टतां । चक्रपद्धति कदा ॥१॥
पूर्वकृत संचिता । जीव हा ओढितां ॥ नियतिरेखांकिता । मात्र गति तापदा ॥२॥

(२०)

अघटित कृतिसी करिसी कां ॥धृ०॥
या पापातें कवण अशि । महती आशा वद करवि ॥
जाळि अंतरंग जें । तदुपरि आत्मनाश चिरन्तनचि करि सुकृत लव नुरवि ॥१॥

(२१)

कधि वदे प्रणय का कठोर बिकटहि वचना । रुचतसे तया मृदुरचना । ध्वनि तिथें कलह तो माना ॥धृ०॥
कळे न वळे न कुणासि जें । वच असेंहि वदतां लाजे । कुलीन त्याप्रति जग समजे । पतित इतर जन मनीं गणा ॥१॥

(२२)

सदा हृदयीं या रंगे । तरंगे । प्रसन्न अंतरंगे । कदा न भाव भंगे ॥धृ०॥
मूर्तिसुंदरा । मदनमदहरा । गुणां नटवि नटवरा । कुणा भुलवि न मधुरा । प्रणयरागें ॥१॥
प्रेमविव्हाला । हतबल अबला । प्रिया शंरण पदतला । प्रिया हृदयिं द्या स्थला । न तरि भागे ॥२॥

(२३)

अतिशय छळी दीन मनासि कां ? तापद असा हा ॥धृ०॥
विषमय गमे कां हृदयहि या संतत सुखाचा विहार ॥१॥

(२४)

रंग अहा भरला । सुबक भला । नाचत चंचल हा वरवरला ॥धृ०॥
भुलवुनि खुलवुनि हांसत खेळत । भारूनि केलें गुंग जीवाला ॥१॥
हंसवी फसवी नटवी माया । शोभत बाई ज्याची त्याला ॥२॥
बांधुनि नजरा जादूगारा । दाखवितां हा खेळ कुणाला ॥३॥

(२५)

चतुरा चातुरी । तुमची न्यारी । भुलावणी खरीखुरी ॥
परि मारी । जिव्हारीं । दुधारी सुरी ॥धृ०॥
भोळा भाव भुलाया टाकुनिया फांसा ।
केला डाव असा अवचित कां हो खासा ?
हा देव पावला आज कुणाच्या नवसा ?
रुसला कान्हा काय जिवाच्या रासा ?
तुटली सारी कां दिलदारी इतक्यावारी ?

(२‍६)

आतां न करी हा चाळा । टाकि छंद बाळा ॥धृ०॥
शान्तिसुखाची झोप कशाची । भीति मजसि ही जाची घाली आळा ॥१॥
धीर मला दे मंजुळ नादें । हास परतवी वीरा निर्दय काळा ॥२॥

(२७)

बोल ब्रिजलाला रे कांहीं हंसुनी बोल । भ्यालें जनाला । भ्यालें मनाला । सुटला माझा तोल ॥धृ०॥
करि उरिं धडपड रहा मनिंच तूं । हांसुनि भिरभिर वद नयनांनीं । नवलाखाचा बोल ॥

(२८)

रणवीर कुमारा निकट बिकट रण हो झणि सिद्ध तया । यदपि वय न तव, उघडि नयन निज, हरुनि भया मज दे अभया ॥धृ०॥
प्रसंग घोर पाहुनिया भीत माता । तुझाच एक धीर तिला आतां । तात तुझे त्यजुनि मला दूर जाता । प्रभुस्वरूप तूंच जगीं, तूंच त्राता ॥

(२९)

धिक् जगति शतघा शुभ्यशा । त्या वीरकर्मा या परि जरि नरवर कृति करिति अधमाधमा ॥धृ०॥
अनाथ अवलाजनालागिं छळितें जें । शिशुबरि शस्त्र धरूनि जें हुदयीं लवहि न लाजे । तरि त्या धिक् ॥१॥

(३०)

अनुचित वचनें ऐशीं । सतीतें व्यर्थ वदुनि अवगणुनि तिस जोडितसां का यापरि पातकराशी ॥धृ०॥
पतिव्रतेच्या मंगळधामा । पतिव्रतेच्या शुभ नामा । अभद्रवचनीं विषसम विषमा । विडंबितां  कां जोडोनिया पापासी ॥१॥

(३१)

जडताच गडे शोभते असा प्रसंग ये तदा । त्वरा, रुचे न तापदा । कुलीनतेसि ती कदा ॥धृ०॥
मंद पडत पद तरी । ओढ जिवा फार जरी । जड-पदाहि थोर पाहिं दाविती विषादा ॥१॥

(३२)

मार्ग दुजा नच जगांत । अतुल पातक ना तरी आतां । घडवित पितरां निरयपात ॥धृ०॥
थोर कुलीं जन्म ज्यास । सौख्यलेश नाही त्यास । कष्टदशा त्याला । अशिच नशिबाला । ना तरी कुल तें विलया जात ॥१॥

(३३)

निज बाळा रे गाणें गाते आई । करि आतां जो जो गाई ॥धृ०॥
तुज जन्म दिला बाळा त्यांची स्वारी । लाखांत शिपाई भारी ।
बघ गर्दी ही बुरुजांची तुजभंवती । दगडांची त्यांची छाती ॥
कळिकाळाशीं झगडणार खंबीर । हे तुझेच हिरवे वीर ॥
(चाल) जीवांच्या जळत्या ज्योती । आकाशीं तारा होती । मोलाची माणिकमोतीं ॥
त्या डोळ्यांनी देवराय तुज पाही करि आतां जो जो गाई ॥१॥
दो दिवसांची ही दुनियेची वसती । सारखीच असती नसती ॥
तुज ऐसा हा बाळ नऊ नवसाचा । हातचा कि रे जायाचा ॥
ऋणानुबंधाच्या तुटल्या आतां गांठी । मग कुठल्या भेटीगांठीं ॥
(चाला) हें देवाघरचें लेणें । नशिबानें देणें घेणें घेणें । कुणितरी कुणास्तव रडणें । तीं रडणारीं रडतील धाईधाई । करि आतां जो जो गाई ॥२॥

(३४)

नीज गुणी बाळ झणीं शान्त यावरी ।
गांऊ किती कुंठित मति नीज झडकरी ॥१॥
हृदयाचा केला हो पाळणा नवा ।
बांधाया ममतेचा पाश मग हवा ।
हृत्तरंग हलवि तया करुनि मृदुरवा ।
ब्रह्मसगुण बाळरूप रमत अंतरीं ॥२॥

(३५)

जिवास वसुनि हा धाय । दयाघना । घडि घडि छळित कसा अजुनि रुजत ना । हृदय करिल हें काय ॥धृ०॥
वसतिस्थिल एक तरी असती दशा विविध तयां । भिन्नकार्य जीवजात भिन्नगतिहि जगतीं या । खिन्नता न उचित विरहिं, दुर्जय जरि माया । फसवीत मोहजालें ॥

(३७)

पुण्यमया तव मूर्ति पहातां खनि जी केवल तेजाची ।
इंद्रहि झाकिल नेत्रसहस काय कथा मग इतरांची ? ॥
देवी त्रिपुरेश्वरी प्रतिष्ठा करि कां देहीं या साची ।
दर्शनमात्रें जाळुनिं टाकी विश्वें सारीं पापाचीं ॥

(३८)

प्राणनाश नच परि जन्म नवा । या मरणें मिळवी मिरवी तेविं जन दिव्य पुण्यप्रभवा ॥धृ०॥
हतलाभाहुनि त्याग सुखाचा शतपट बरवा ॥

(३९)

हृदय कापितसे तापद वच व्यापि तसें विप जिवासि ॥धृ०॥
देवि, उदार मनें दे आज्ञा या जनासि ॥

(४०)

नाथ भय न राहि । तिळहि कांहीं दुरित हरिल तो हरि लवलाही ॥धृ०॥
साक्ष नदीय पटुनि झणि अंतरिं । जरि संकट घन धीर ये तरिहि ॥

(४१)

अभागी जीवा शोक्र आतां पुरे हा ॥धृ०॥
नशिबीं आले । त्यापरी झालें । मन का वृथा हें मनाशीं झुरे ॥१॥
रडणें एकच जाणें नातें न आतां जगाशीं उरे ॥२॥

(४२)

निरोप द्यावा आतां बाळा । टाकुनि जाते माता ॥धृ०॥
माझें माझें म्हणुनि आजवर जें लेणें ल्यालें ।
बाळ गुणाचें हाय कुणाचें आज परी तें झालें ॥१॥
हे तारांनो, उचंबळूं द्या करुणारसरंगा ।
अखंड वाहो नवतेजाच्या पुण्याईची गंगा ॥२॥
घटकेचा संसार संपला लटका ठावठिकाणा ।
वनदेवींनो पदरीं घ्या हा माझा राजस राणा ॥३॥
अनाथ दुबळा देह पडे हा आई नाहीं त्याला ।
फुलत्या फुलवंतीची यावर मायापांखर घाला ॥४॥
भुतें जागतां उठतां दचकुनि हृदयींचा हा ठेवा ।
काळ्या रातीं जित्या फुलांचा खडा पहारा ठेवा ॥५॥
कळतें तुम्हां सारें कांहीं अहां फुलांच्या माता ।
लोभ असूं द्या इथून पुढतीं बोलत नाहीं आतां ॥६॥

(४३)

घडे नाथा प्रमाद जरी आतां क्षमाच तरी हो तया । झुरे देह म्हणुनियां नुरे धीरच हृदया । हा जीव शरण चरणीं या । भ्रमुनिया दमुनिया श्रमुनिया ॥धृ०॥
हा सतत असो प्रेमभर असा । शुभ आनंदलाभ तसा हा । दासी सदाची करी याचना । प्राण पहा वाही । अचल करुनि मति पदिं सदया । तरि दया । करूविला ॥

हे प्रभुवर धृतिबल वितरी लोकीं त्यागास्तव खरतर । सुखी तरी विहित शुभसमया ॥धृ०॥
आर्यावर्ती आर्या । मान्य गणाया । दे नयपर सुमति पुरुषां । विनवित सविनय ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP