अमृतानुभव - वाचाऋणपरिहार

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


या बोधाचे गजरें । जीवात्म्याची झोप नुरे । तरि निद्रेचे ऋण न सरे । ती जागृतीचि निद्रा की ॥१॥

एरवी पराचि वाणी चौघी । जीवा मोक्षाच्या उपयोगी । जर अविद्येसवें आपणही अंगीं । नाशती साच ॥२॥

हातपाय देहासवे । जाती इंद्रिये मनासवे । जैसे जाई सूर्यासवे । किरणजाळ ॥३॥

नातरी निद्रा सरण्याआधी । स्वप्नांची सरे गर्दी । तैशा अविद्येसंबंधी । वाणी या नष्टती ॥४॥

लोहाचे भस्म होते । ते रसायनरूपें जगते । जळोनि इंधन येते । वन्हिदशेसी ॥५॥

लवण विरे अंगें । परि जळासि स्वाद लागे । नीज मरोनि निद्रा जगे । जागृतावस्थेत ॥६॥

तैशा अविद्येसवे । या चारी वाणी जाती जीवें । परि सोऽहं स्फुरणाचे नावें । उठतीचि त्या ॥७॥

हा तत्त्वजानदिवा । मरमरोनि यांनी । लावावा । तरि हा शीणचि आघवा । बोधरूप आत्म्यासी ॥८॥

येऊनि स्वप्नीं नेई । जाता जागृतावस्था दावी । दोन्ही स्थिती नांदवी । निद्रा जैसी ॥९॥

ऐशी अविद्या जिवंत झाली । मिथ्याबोधा शोधित आली । तीचि उठे मेलेली । यथार्थबोधीं ॥१०॥

परि जिती वा मेली । अविद्या बंध आवळी । देहबंधीं वा मोक्षीं घाली । बोधोनिया ॥११॥

मोक्षचि जर बंध होय । तर मोक्ष शब्दा अर्थ काय ? । म्हणोनि वायाचि यांसी ठाव । अज्ञानाघरीं ॥१२॥

बागुलबुवाचे मरणें । तोषावे की बालपणें । इतरां तो नसे, मग कोणें । मानावा मृत्यु तयाचा ? ॥१३॥

नसलाचि घट फुटला मानी । नागवलो म्हणे मी जनीं । अहो, तया का कोणी- । शहाणा म्हणे ? ॥१४॥

म्हणोनि बंधचि तर मिथ्या । मग मोक्ष कोठे कैसा जाणावा? । परि अविद्येने मरोनि तयां । नावारूपासि आणिले ॥१५॥

आणि बंधक ऐसे । शिवसूत्राचे मिषें । निश्चयें म्हटले असे । सदाशिवेंचि ॥१६॥

वैकुंठींच्या त्या सुजाणानेही । सत्त्वगुणाचे पाशें जीव बद्ध होई । ऐसे गीताशास्त्रादिकांचे ठायीही । बहुत सांगितले ॥१७॥

परि शिवें की श्रीवल्लभें । म्हटले जरि याचि लोभें । तरि न बोलताहि हे लाभे । ऐसेचि मानू आम्ही ॥१८॥

जो आत्माचि ज्ञान निखिल । तोही जर घे ज्ञानाचे बळ । तर सूर्य प्रकाशावया अन्य सबळ । चिंती काय ? ॥१९॥

आत्म्यासि ज्ञानें संतोषा होय- । तर ज्ञानित्व व्यर्थ जाय । दीप शोधी दिव्यासि अन्य । तर विसरेचि स्वतःसी ॥२०॥

आपुले तर आपणापाशी आहे । हे न जाणता देशोदेशीं जाये । आपणासि शोधित राहे- । हे कैसे होय ? ॥२१॥

परि बहुत की दिसांनी । स्वतःसीचि आठवुनी । म्हणे मज मी गवसुनी । कैसे रिझावे ? ॥२२॥

तैसे आत्म्याने ज्ञानरूप । सोऽहंवृत्तीचेचि ज्ञानें अमाप । स्वरूपनिश्चय करावा आपोआप । तर ते बंधनचि ॥२३॥

ज्ञानचि आत्मस्वरूपीं बुडे । म्हणोनि तेथ भार न पडे । ज्ञानेंही मोक्ष घडे । परि ते निमाल्याने ॥२४॥

म्हणोनि परादि ज्या चार वाचा । तो चौअंगाचा शृंगार देहाचा । ऐसा अविद्यामूलक जीवत्वाचा । अविद्या नाश करी ॥२५॥

अविद्या स्वतःशी उदास । करी ज्ञानाग्रींत प्रवेश । परि तेथ भस्मलेश । बोधाचा उरे ॥२६॥

अंगीं लाविता विभूती. । ते परमाणूही झडती । परि पांडूरत्वें कांती । राहे जैशी ॥२७॥

जळावेगळा जळीं । अंतीं कापूर न दिसे मुळी । परि उरे परिमळीं । जैसा की; ॥२८॥

ओघळल्या ओहळा जैसे । पाणी पाणीपणें नसे । तरि ओलाव्याचे मिषें । असेचि ते; ॥२९॥

नातरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी । ती राहे पायातळीं । शिरोनिया; ॥३०॥

तैसे ग्रासूनि दुसरे । स्वरूपीं स्वरूपाकारें । आपुलेपणे उरे । ज्ञान जे का; ॥३१॥

ते ऋणशेष वाचेने या । न फेडता ये मरोनिया । ते म्यां पडोनि पाया सोडविले ॥३२॥

म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा आणि वैखरी ती । या निस्तराव्या लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP