मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
घाण्याची ओवी

स्त्रीगीत - घाण्याची ओवी

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


प्रारंभी नमन । मंगल मुरतीला
आमुच्या कार्याला । सिध्दी द्यावी ॥१॥
नारळी तोरण । दारावरी लावा
शकून तो व्हावा । सौख्यदायी ॥२॥
पानांनी फुलांनी । मांडव सजवा ग
भाग्याचा दिवस ग । आज खरा ॥३॥
वरमाय आज । होतसे ----ताई
जाहली तिला घाई । सुन्मुखाची ॥४॥
----नवरदेव । बांधून मुंडावळ्या
लग्नासी जाहला । सज्ज आता ॥५॥
अहो ----ताई । कशाची एवढी घाई
आहे का काम काही । आज घरी ॥६॥
होय ग सखेबाई । येणार नवी सून
चालेल् कां बसून । सांग तरी ॥७॥
लगीन भावाचे । मुहूर्त आज करूं
नखोले, गव्हले वळूं । खिरीसाठी ॥८॥
मुगवडे घालूं । चला ग मुहूर्तानं
भावाचं लगीन । ----बाईच्या ॥९॥
कुर्डया पापड्या । कशासाठी केल्या
मामाच्या लग्नाला । ----ताईच्या ॥१०॥
गूळ साखरेच्या । गोण्या ह्या कशासाठी
मामाच्या लग्नासाठी । ----बाळाच्या ॥११॥
काकू नि आत्या आली । मावशी तशी मामी
कशांची नाही कमी । समारंभा ॥१२॥
सर्वांचे आशिर्वाद । सर्वांचे मिळॊ साह्य
निर्विघ्न होवो कार्य । गणराया ॥१३॥
तूंही अंबाबाई । समक्ष कार्या यावे
सिध्दिस कार्य न्यावे । ----बाळाचे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP