TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

होळीची गाणी - होलुबायला शिणगार

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


होलुबायला शिणगार
होलुबायला शिणगार
होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार कुंकवाचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार बांगड्यांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार नारलांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार पापड्यांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार चामट्यांचा ग केला

होळीबाईचा शृंगार
होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार कुंकवाने ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार बांगड्यांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार नारळांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार पापड्यांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार चामट्यांचानी ग केला

होळीच्या काठीला बांगड्या, नारळ,पापड्या,चामट्या अशा वस्तू बांधलेल्या असतात. हळदकुंकू,नारळ वाहून, पूजा करून होळी पेटवली जाते. चामट्या हा काकडी, गूळ व पीठ यांपासून बनवलेला पदार्थ होळीचा प्रसाद असतो.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:59:04.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ताळा

  • पु. १ ( हिशेब , भिन्नभिन्न हकीगती , गोष्टी , उपन्यास , साधने इ० कांतील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; अविरोध ; जुळतेपणा ; सुसंगतपणा . ( क्रि० घेणे ; पडणे ; पाहणे ; मिळणे ). कदापि नाही वचनास ताळा । - सारुह ३ . १३ . त्यांच्या कामांचे ताळे कसे घ्यावयाचे ह्या संबंधाने मोहनरावांनी माहिती करुन घेतली . - कोरकि ४५ . २ ( केलेल्या भाकिताशी नंतर घडून आलेल्या गोष्टीचा , आलेल्या अनुभवाचा ) मेळ ; जुळतेपणा ; प्रत्यय ; पडताळा ; दृकप्रत्यय ; प्रचीति ; प्रतीति . ( क्रि० येणे ; मिळणे ). म्हणोनि येळील न करावे । पाहाणे ते येथेचि पाहावे . । ताळा पडता राहावे । समाधान । - दा १९ . ५ . १७ . आपल्या उपपत्तीस ताळा मिळतो की नाही याचा फार विचार न करतां ... - नि ८१६ . २ एखाद्या गोष्टीचा खरेपणा इ० दुसर्‍या प्रमाणाने ताडून , अजमावून पाहण्याची वेगळी रीत . ४ सत्यत्वबुद्धि . - मनको . [ सं . ताल ] 
  • पु. ( माळवी . ) टाळा ; कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला ] 
  • ०घालणे मेळ बसविणे ; एकवाक्यता करणे . तुका म्हणे ताळा घातला आडाखी । ठावे होते सेकी आडविसी । - तुगा १२३८ . ( एखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टींशी - ह्याचा त्याचा ) ताळा पाहणे घेणे दोन गोष्टींची , वस्तूंची परस्परांशी तुलना करणे , परस्परांशी ताडून पाहणे . ताळ्यास ताळ्यावर येणे नीट मार्गाला लागणे ; स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गाने चालणे ; शुद्धीवर येणे . 
  • ०तोळा पु. ताळमेळ ; व्यापक अर्थाने ताळा शब्दाबद्दल वापरतात . ताळा पहा . [ ताळा द्वि . ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.