कांबड नाचाची गाणी - पाटील पिसलला आहे

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


पाटील पिसलला आहे
-माझे जाग्यावं कोण रं नाचं?
-पाटला तुझा नार्‍या नाचं!

पाटील पिसलला आहे, लातां माराया
पाटलाचे ओटीवं जावं नको राया
पाटलीण पिसलली आहे, डोलं वासाया
पाटलाचे ओटीवं जावं नको राया

पाटील पिसाळला आहे
-माझ्या जागेवर कोण रे नाचतो?
-पाटला तुझा नार्या नाचतो!

पाटील पिसाळला आहे, मारेल लाथा
पाटलाच्या ओटीवर जाऊ नको राया
पाटलीण पिसाळली आहे, वटारेल डोले
पाटलाच्या ओटीवर जाऊ नको राया

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP