TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
सोनचाफा

गौरीची गाणी - सोनचाफा

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


सोनचाफा
सोनचाफा
पोरीनं वलवेल्या ग नेटाच्या चुंभल्यानी
पोरीनं घेतला ग पाण्याचा धस्कारा

पोर गेलीय ग बावडी पाण्याला
पोरीनं शिंपीला ग दारीचा सोनचाफ़ा

कोणा रांडेनी ग सरप येऊ दिला
माजा मारीला ग दारीचा सोनचाफ़ा
पोर निंगली ग दणाण सडकेला
तिकून आली ग बाराची ही गाडी
पोरीनं हात केला ग बाराच्या गाडीला
पोर बसली ग बाराच्या गाडीला
तिकीट काढलं ग वसई ठेसनाचं जाऊन
उतरली ग बसई ठेसनात.....

सोनचाफा
पोरीने वळवली ग नेटाने चुंबळ
पोरीने घेतलीय ग पाण्याची धास्ती

पोर गेलीय ग विहिरेवर पाण्याला
पोरीने शिंपले पाणी दारातील सोनचाफ़्याला

कोणा रांदेनी ग सर्प येऊ दिला
माझा मारला ग दारीचा सोनचाफ़ा
पोर निघाली सुसाट सडकेला
तिकडून आली ग बाराची गाडी
पोरीने हात केला ग बाराच्या गाडीला
पोर बसली ग बाराच्या गडीला
तिकीट काढलं ग वसई स्टेशनाचे
जाऊन उतरली ग वसई स्टेशनात.....

सोनचाफ़्यासारख्या वाढवलेल्या मुलीवर कुणीतरी भूल घातली आणि त्या सापासारख्या प्रियकरासोबत मुलगी घरातून पळून गेली असा अर्थ.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:58:19.2170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

फुलाचा वर्षाव

  • ( उप.) शिवीगाळ. पुष्पवृष्टि पहा. 
RANDOM WORD

Did you know?

Sarva namaskar havet.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site