मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
पत्रावल

गौरीची गाणी - पत्रावल

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


पत्रावल
वाटंवरले वडा तुझी मोरी मोरी पानां
तेही ग पानाच्या त्यानी शिवल्या पत्रावली

पहिली आंघोली ग माझे राम भरताराची
दुसरी आंघोली ग माझे लक्षुमण दिराची
तिसरी आंघोली ग माझे केगया मातेची
चवथी आंघोली ग माझे सीता ग मायेची

पहिली पत्रावल ग माझे राम भरताराची
दुसरी पत्रावल  ग माझे लक्षुमण दिराची
तिसरी पत्रावल  ग माझे केगया मातेची
चवथी पत्रावल  ग माझे सीता ग मायेची

पत्रावळ
वाटेवरच्या वडा, तुझी ठिपक्याठिपक्यांची पानं
त्याच ग पानांच्या त्यांनी शिवल्या पत्रावळी

पहिली आंघोळ ग माझ्या राम भ्रताराची
दुसरी आंघोळ ग माझ्या लक्ष्मण दिराची
तिसरी आंघोळ ग माझ्या कैकयी मातेची
चवथी आंघोळ ग माझ्या सीतामायेची

पहिली पत्रावळ ग माझ्या राम भ्रताराची
दुसरी पत्रावळ ग माझ्या लक्ष्मण दिराची
तिसरी पत्रावळ ग माझ्या कैकयी मातेची
चवथी पत्रावळ ग माझ्या सीतामायेची

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP