मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
गौरीचा गण

गौरीची गाणी - गौरीचा गण

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


गौरीचा गण
गण ग गौरीचे नंदना
आरती घेऊन करू भोजना

पहिली करू हिरोबाला
नंतर करू हिमायीला
दुसरी करू गावदेवीला
नंतर करू वाघोबाला
तिसरी करू चेडोबाला
नंतर करू मारूतीला
चवथी करू गणपतीला
नंतर करू गवरायीला

गौरीचा गण
गण हा गौरीच्या नंदना तुला
आरती घेऊन नसू जेवायला

पहिली आरती करू हिरोबाची
नंतर ओवाळू हिमायीला
दुसरी आरती करू गावदेवीची
नंतर ओवाळू वाघोबाला
तिसरी आरती करू चेडोबाची
नंतर ओवाळू मारुतीला
चौथी आरती करू गणपतीची
नंतर ओवाळू गौराईला

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP