मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
बाजाराला

लग्नाची गाणी - बाजाराला

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


बाजाराला
पोरी ग तुंगारच्या बाजाराला
पोरी ग साडी घे लगीनाला

पोरी ग तुंगारच्या बाजाराला
पोरी ग बांगड्या घे लगीनाला

पोरी ग तुंगारच्या बाजाराला
पोरी ग झांजरां घे लगीनाला

पोरी ग तुंगारच्या बाजाराला
पोरी ग जोडवी घे लगीनाला
(तुंगार-एक गाव)

बाजारात
पोरी ग तुंगारच्या बाजारात
पोरी ग साडी घे लग्नाची

पोरी ग तुंगारच्या बाजारात
पोरी ग बांगड्या घे लग्नाची

पोरी ग तुंगारच्या बाजारात
पोरी ग पैंजण घे लग्नाची

पोरी ग तुंगारच्या बाजारात
पोरी ग जोडवी घे लग्नाची

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP