TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
विंझना

लग्नाची गाणी - विंझना

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


विंझना
विंझना
सागू फ़ुलेला एकू सागावं
चंदनू फ़ुलेला एकू चंदनावं..

ये ग चंदनाची एखली भारजा
भारजा घाली विंझनवारा
हातीचा विंझना खाली पडेला
खाली पडेला धुलीने माखला
धुलीने माखला दुधाने धुवेला
दुधाने धुवेला सलदी ठेवेला
सलद ग सोन्याची ढापना रूप्याचा
ढापना रूप्याचा बिखना मोत्याचा
(विंझना-पंखा, सलद-पेटी, ढापना-खाकन, बिखना-कडी)

पंखा
मोहोर आला एका सागाच्या झाडाला
मोहोर आला एका चंदनाच्या झाडाला

या ग चंदनाची एकटी बायको
बायको पंख्याने वारा घाली
हातातला पंखा पडला खाली
पडला खाली, माखला धुळीने
माखला धुळीने, धुतला दुधाने
धुतला दुधाने, ठेवला पेटीत
सोन्याच्या या पेटीचे ग झाकण चांदीचे
झाकण हे चांदीचे ग कडी आहे मोत्यांची

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:08.6400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुत्रा

 • पु. १ श्वान ; सारमेय ; कुक्कुर ; अर्व चतुष्पाद प्राण्यामध्यें कुत्रा हें मनुष्यांशी संबंध असलेले एक महत्वाचें जनावर आहे . हा माणसाळलेला प्राणी आहे . कुत्रा चोर व परकी माणसे यांपासुन घराचें रक्षण कर्तो . शिकार करण्याच्या कामीं त्याचा उपयोग होतो . २ ( ल .) वाईट , हलकट माणुस . ३ चितारू नांवाचा एक मासा . ( प्रा . कुत्त - कुत्ती ) कुत्री - स्त्री . १ शुनी ; सारमेयी : कुत्र्याची मादी . २ एक औषधी वनस्पति व तिचें वोंड , हिच्या फुलास व पानास वाईट तास येतो . काम्हींच्या मतें लोखंडी नांवाची वनस्पति . कुत्रें - न . १ कुत्रा - त्री . २ ( ल .) भांडखोर व शिवराळ माणुस . ३ राहाट थांबविण्यासाठी केलेली योजना . याला दोन पट्ट्या असतात . एक चपटी असून तिचें एक टोंक रहाटच्या विरुद्ध बाजुस खिळ्यांत भक्कम बसवितात व दुसर्‍या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांब बसवितात . दुसर्‍या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांव बसवितात व दुसर्‍या टोकाला मध्यें एक खांचा असतो , तो खांचा रहाटांत टाकला कीं गति बंद होते . ४ गवताचा एक प्रकार व त्यांचें फुल , तुरा , बोंड , हें वस्त्रास लागलें असतां चिकटून बसतें . ५ लहान कुसळयुक्त रानटी वनस्पतीचें बीं . ६ दार , झडप लावलें असतां उघडू नये म्हनुन अडकविण्याचें एक अडकवण ; आडसर ; चक्राचें दांरो उलट फिरू नयेत म्हणुन दात्यांत अडकविण्याचा धातूचा तुकडा . ७ ( वरील कुत्र्यांच्या साम्यावरुन ) कोपर , खांदा , मनगट , गुड्या , घोठां , कंबरेचा खवाटा यांचा सांधा . ( वाप्र .) ( कुत्रा ) कोलटेकणी बसणें -( माण .) पुढील दोन पाय उभे करुन मागें ढुंगण टेकून बसणें . ( कुत्रा ) मुडा घालून बसणे -( माण ). कुत्र्यानें भांड्यांत तोंड घालुन बसणें . 
 • ०कुत्रा खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें . 
 • हाल खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें . 
 • ०शिवणे ( माण .) ( बायकी ) स्त्री विटाळशी होणें . ( लहान मुलांच्या भाषेंत ). कुत्रीसारखी होणें -( व .) रोड होणें . कुत्रें आपल्या पायाला डसलें म्हणुन काय आपण त्याला डसावें ? - शिवरळ माणसाच्या तोंडीं लागू नये या अर्थी . - कुत्र्यांचे पाय मांजरावर आणि मांजराचें पाय कुत्र्यावर घालणें - भलभलत्या लटपटी करणें ( आपलें काम साधण्यासाठीं , केवळ गमतीसाठी ). - च्या मोतीनें मरणें - हालहाल होऊन मृत्यु येणे . - ला तोंडीं लावला तर डोक्यावर चढतो -( व .) हलकट मनुष्यांशी स्नेह ठेवला तर तो डोईजवळ वनतो . - ला हाड म्हटलें म्हणजे हाडुक टाकतें - निगरमट्ट , कोडग्या माणसाबद्दल योजतात . कुत्र्यासारखें फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . म्ह० १ धर्माचें द्वरीं कुत्रें आडवें आले . २ ये रे कुत्र्या खा माझा पाय - नसतें भांडण उगाच आपल्या अंगावर ओढुन घेणें या अर्थी . ३ ( गो .) कुत्र्याक पालखेंत बैसलों तरी हाडुक देखून कुत्रें उडी मारतां = जन्मांची संवय परिस्थिती आल्यबारोबर उभी राहाते . सामाशब्द - कुत्र्याचा पाय - पु . रानतेरड्याचें फुल . - ची चार - स्त्री . एक प्रकारचें गवत . - चा झोंप - स्त्री . अत्यंत सावध झोंप . - ची वळ - वळ - स्त्री . कुत्र्यासारखी चळवळ , हालचाल . कुत्र्यांचेंकुवकुवणें - कुत्र्यांचें गुरगुरणें ; भुंकणें . - चे छत्र - न . कुत्र्याचे मत ; छत्री ; अळंवे ,- च जिणें - न . दैन्यावस्था ; हीन स्थिति ; निकृष्ट स्थिति . - चें झाड - न . एक कांटेरी झुडुप . यांचें फळ चकचकीत तांबडें व रसाळ असते . - वें तोंड - न . ( ल .) फटकळ माणुस ; निंदा करणारा , अश्लील भाषण करणारा माणुस . - चें दांत - पुअव . ( मुलांच्या भाषेंत ) दुध्या भोपळ्याच्या बिया . - चें पाय - मांजराचें पाय - पुअव . चिडविडीत अक्षर . - चे भोकभर - भोकावर - क्रिवि . कुत्र्याचें भुंकणे ऐकू जाईल एवध्या मजलीवर ( गांव इ० ). - चें मूत - १ न . कुत्र्याची छत्री ; अळंबे . २ ( ल .) एककल्ली , दुसर्‍याच्या अंगावर वस्कन येणारा , तुसडा चिरडखोर , सदा चिडचिड करणारा माणुस . म्ह० ( व .) कुत्र्यांचें मुत सड्यास ना सारवणास - चें विष - न . कुत्रा चावला असतां मनुष्य भांबावल्यासारखें करतो त्याला ज्वर येतो , डोळे व लघवी पिवळी होते . कालांतरानें उन्माद येऊन कुत्र्याप्रमाणें भुंकतो व चावतो . यावर उपायः - काळ्या उंबराचें मुळ व धोतर्‍याचें फळ ही दोन्हीं तांदुळाच्या धुवणांत वाटून पिणें . किंवा कस्तुरी व बाभळीच्या पानाचा रस गाईच्या तुपाशी घेणें अथवा शतावरीचा रस गाईच्या दूधांतून पिण्यास देणें . - योर २ . ७०८ . - चें शेपूट - चि शेपडी - नस्त्री . ( हें नेहमी वांकडें असतें , सरळ रहात नाहीं याव रून ल .) सुधारण्याचा किती हि यत्‍न केला तरी व्यर्थ जाऊन पुर्वीच्या वळणावर जाणारा , लतकोडगा , दुष्ट माणुस . म्ह० कुत्र्याचें शेपूट नळींत घातलें तरी वांकडें - मुर्खांच्या मनावर उपदेशांचा कांहिही परिणाम होत नाही , देहस्वभाव जात नाही . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.