TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
नवरीला आणाय चालले

लग्नाची गाणी - नवरीला आणाय चालले

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


नवरीला आणाय चालले
नवरीला आणाय चालले
गाडी चालत चालत खलालते
तुम्ही कुठूनचे कुठूनचे राजे आले
आम्ही भिनारचे भिनारचे राजे आले
तुम्ही इकडे इकडे कुठे चालले
आम्ही नवरीला नवरीला आणाय चालले

गाडी चालत चालत खलालते
तुम्ही कुठूनचे कुठूनचे राजे आले
आम्ही खंबाळचे खंबाळचे राजे आले
तुम्ही इकडे इकडे कुठे चालले
आम्ही नवरीला नवरीला आणाय चालले
(भिनार, खंबाळा-ठाणे जिल्ह्यातील दोन लहान गावे)

नवरीला आणाण्यास
गाडी चालता चालता खळाळते
तुम्ही कोण्या गावचे राजे आलात?
आम्ही भिनार गावचे राजे आहोत आलो
तुम्ही या दिशेला इकडे कुठे निघालात?
आम्ही नवरीला आणण्यास आहोत निघालो

गाडी चालता चालता खळाळते
तुम्ही कोण्या गावचे राजे आलात?
आम्ही खंबाळ गावचे राजे आहोत आलो
तुम्ही या दिशेला इकडे कुठे निघालात?
आम्ही नवरीला आणण्यास आहोत निघालो

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:06.4200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

VIBHINDU(विभिन्दु)

  • A king who was very liberal. It is mentioned in [Ṛgveda, Maṇḍala 8], that this king had given Medhātithi a gift of fortysix thousand cows. 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.